साप्ताहिक राशिभविष्य- 20 एप्रिल ते 26 एप्रिल 2019

60

>> मानसी इनामदार

मेष – तणावमुक्त रहाल
गाण्याने श्रम होतात हलके..या उक्तीचा प्रत्यय तुम्हाला या आठवडयात येईल. आठवडा जरी ताण तणावाचा असला तरी संगीतामुळे तो कमी होण्यास मदत होईल. नोकरी-व्यवसायात काही कटू प्रसंग उद्भवतील. पण त्यातून बाहेर याल. पिवळा रंग फलदायी.
शुभ परिधान-अंगठी, खादीचे वस्त्र

वृषभ – कौतुक पुरस्कार
मानसन्मान प्राप्त होण्याचा आठवडा आहे. केलेल्या कामाबद्दल छोटासा पुरस्कार मिळेल. घरातील ज्येष्ठांकडून कौतुक होईल. पांढरा परिधान करा वादविवादांपासून लांब राहा. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्या. शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होईल.
शुभ परिधान- डिझायनर गाऊन, झब्बा

मिथुन – सुख-समाधान
व्यवसायात उज्वल यश मिळेल. अंघोळ करून सकाळी स्वच्छ पाण्याचा तांब्याचा कलश देवाजवळ ठेवावा. त्याची पूजा करावी. घरात सुख-समाधान राहील. खेळाडूंसाठी चांगला आठवडा. प्रयत्न करीत राहा. यश मिळेल. निळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान- निळे उपवस्त्र, जॅकेट

कर्क – घरात एकी
विद्यार्थी वर्गासाठी फार उत्तम आठवडा आहे. आवडीच्या गोष्टी गांभीर्याने करा. यश तुमचेच आहे. एखादा छंद जोपासा. घरातील मोठय़ांचे ऐका. घरातील तुम्हा दोन पिढयांचा ताळमेळ तुमच्या घरातील एकी दाखवेल. मोतिया रंग लाभेल.
शुभ परिधान- डिझायनर बटवा, मोगऱयाचा गजरा

सिंह – मदत करा
कणखर स्वभावाची तुमची रास आहे. या तुमच्या स्वभावाचा फायदा दुसऱयांसाठी जरूर करून द्या. या आठवडय़ात कोणालातरी मदत करण्याचा योग तुम्हाला येईल. अबोली रंग शुभ ठरणार आहे. जेवल्यानंतर एखादे तुळशीपत्र तोंडात टाका. मनाप्रमाणे घडेल.
शुभ परिधान – हातावर मेंदी, सुती वस्त्र

कन्या – नवी जबाबदारी
प्रवासाला जाण्यासाठी उत्तम काळ. घरातल्यांशी नातेसंबंध दृढ होतील. पांढरा रंग उत्तम. देवघरात शंख असेल तर त्याची नियमित पूजा करा. शक्यतो गुरुवारी. लक्ष्मी येईल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. कामाचा ताण जाणवेल.
शुभ परिधान – साडी, लीननचा कुर्ता

तूळ – वरिष्ठांची मर्जी
या आठवडयात काळ्या रंगाचे प्राबल्य तुमच्या राशीवर आहे. तो आवर्जून जवळ बाळगा. रखडलेली न्यायालयीन कामे मार्गी लागतील. जोडीदाराला विश्वासात घ्या. गोड पदार्थांचे सेवन कमी करा. नोकरी वरिष्ठांची मर्जी सांभाळा. डोके शांत ठेवा.
शुभ परिधान- प्लॅटीनमचा दागिना, घडय़ाळ

वृश्चिक – मानसिक शांतता
विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात लक्ष द्यावे. खेळाडूंसाठी यशाचा आठवडा आहे. लाल रंग महत्वाचा ठरेल. हरिपाठाचे अभंग किमान एकदा तरी कानावर पडुदेत. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता. घरात खूप पैसे ठेवू नका. जरुरीपुरतेच ठेवा.
शुभ परिधान- आरामदायी पोशाख, सोन साखळी

धनु – चांगले वातावरण
हातून चांगले काम होईल. व्यवसायात यश संभवते. जुनी येणी वसूल होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. बाहेर खाणे कमी करा. तब्येतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. आकाशी रंग जवळ बाळगा. घरात वातावरण चांगले राहील.
शुभ परिधान- रेघांचा शर्ट, काळी साडी

मकर – ताठ कणा
राखाडी रंगाचे कपडे परिधान करा. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पार पडतील. मानसिक त्रास देणाऱया अनेक घटना घडतील, पण तुम्ही त्यावर मात कराल. तुमचा ताठ कणा तुम्हाला यशाकडे नेणारा असेल. रोज रात्री घराबाहेर एक कापराची वडी जाळा. सर्व क्लेश दूर होतील.
शुभ परिधान- मोत्याच्या कुडय़ा, ब्लेझर

कुंभ – नवी कामे
आहारात आंब्याचा समावेश आवर्जून करा. हिरवा रंग यश देईल. हितशत्रूंच्या कारवायांना वचक बसेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नव्याने काही कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. सकारात्मकता वाढेल. आवडत्या व्यक्तीचे मन सांभाळा.
शुभ परिधान- नवा चष्मा, तांब्याचे कडे

मीन – आनंदी सोहळा
स्वतःला आवडीच्या कामात गुंतवून घ्या. त्यात नेत्रदीपक यश मिळेल. भगवा रंग जवळ बाळगा. मेहनतीत कसूर नको. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. घरात एखादा लहानसा सोहळा होईल. मन आनंदी होईल.
शुभ परिधान – सोन्याच्या बांगडया, नेलपेंट

  • समस्या – माझे बाळ 3 महिन्याचे आहे, रात्री सतत रडते, डॉक्टरना दाखविले. पण काही उपयोग नाही. -नेहा दीक्षित, ठाणे
  • तोडगा – रोज संध्याकाळी घरातील देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून 11 वेळेला मारुती स्तोत्र म्हणा. बाळाची फुलाने दृष्ट काढा. फरक पडेल.
आपली प्रतिक्रिया द्या