अक्षय्य सुखाचा आठवडा! साप्ताहिक राशिभविष्य 4 मे ते 10 मे 2019

>>मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – आनंदाची बातमी
हा आठवडा एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरेल. नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध सर्वच बाबतीत गोष्टी मार्गी लागतील. पण काही पथ्ये पाळावी लागतील. गणपती आणि शिवोपासना सुरू ठेवा. रोज देवपूजा करा. हिरवा रंग फलदायी ठरेल.
शुभ परिधान – मोगऱयाचा गजरा, रेशमी रुमाल.

वृषभ – भरपूर यश
धडाडीचा, पण सरळमार्गी स्वभाव हे तुमचे वैशिष्टय़. या आठवडय़ातही तुमची धडाडी एखादा नाजूक निर्णय घेण्यात कामी येणार आहे. भरपूर यश त्यात आहे. स्तुती करणाऱयांवर फार विश्वास ठेवू नका. गुलाबी रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – स्फटिकाची माळ, हातात कडे.

मिथुन – आंबा खा
घरातील कामे तुमच्या शिस्तीच्या बडग्याने मार्गी लावाल. आंब्याचा आनंद पुरेपूर घ्याल. एखादी लहानशी सहल काढाल. मित्र-मैत्रिणींचा पाठिंबा मिळेल. महत्त्वाचे निर्णय तुम्ही एकटय़ाने घेणे घातक ठरू शकतात. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – कानातील कुडय़ा, कपाळाला चंदन.

कर्क – सर्जनशील आठवडा
सुखांची बरसात होणार आहे. घरातील उद्योग-धंद्यात भरपूर यश मिळेल. त्यात तुम्हीही लक्ष घाला. कदाचित आर्थिक तोटा होऊ शकतो. धार्मिक साहित्याचा आनंद घ्याल. सर्जनशील आठवडा आहे. पांढरा रंग परिधान करा. जोडीदाराची साथ महत्त्वाची.
शुभ परिधान – डिझायनर ओढणी, पैंजण.

सिंह – प्रश्न सुटतील
संकटाचे मेघ आहेत, पण त्याची चिंता नको. विनायकी मनःपूर्वक साजरी करा. बरेचसे प्रश्न सुटतील. पूर्ण दिवस उपास करा. मोदकाचा स्वयंपाक घरात करून पाच विद्यार्थ्यांना जेवायला बोलवा. लाल रंग तुमच्या राशीचा. अर्थातच लाभदायक.
शुभ परिधान – शिंपल्याचा दागिना, पांढरा ड्रेस.

कन्या – कौतुक होईल
साहित्य क्षेत्रात मोठी कामगिरी घडेल. मानमरातब प्राप्त होईल. नवनिर्मिती करण्यात कसूर नको. निळा रंग महत्त्वाचा. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. घरात पूजा झाल्यानंतर देवासमोर कर्पुरार्ती करा.
शुभ परिधान – सुवर्ण आभूषण, कुर्ता.

तूळ – संकटे संपतील
जेव्हा गृहलक्ष्मी घरातील व्यवसाय हातात घेते तेव्हा त्यात अमाप यश मिळते. तसेच काहीसे स्त्रीवर्गाबाबत होणार आहे. येणारी संकटेही आपसूकच नष्ट होतील. विनायकीला गणपतीच्या देवळात जा. पिवळा रंग सोबत बाळगा.
शुभ परिधान – बकुळीची फुले, सुगंध.

वृश्चिक – काम तडीस
घरातील लोकांची साथ सध्या खूप महत्त्वाची आहे. त्यांचे ऐका. लहानांचा शब्द महत्त्वाचा ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या. साईबाबांची उपासना करा. पांढरा रंग परिधान करा. नवीन काम हाती घ्याल आणि ते तडीस न्याल. संतांची उपासना लाभदायक.
शुभ परिधान – आरामदायी वस्त्र, खणाचे कापड.

धनु – धनप्राप्ती होईल
शस्त्र कधीही म्यान करू नका. त्याची तुम्हाला या आठवडय़ात वारंवार गरज भासेल. घरात धान्य भरून ठेवा. त्यामुळे समृद्धी वाढेल. एखादा चांदीचा दागिना खरेदी करा. देवघरात ठेवून त्याची पूजा करा, धनप्राप्ती होईल. चंदेरी रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – ब्रॅण्डेड कपडे, गळय़ात साखळी.

मकर – संधी मिळेल
उत्साही आठवडा. उन्हाळी सहल आयोजित कराल. स्वतःच्या मूळ गावी आवर्जून जा. काळा रंग परिधान करा. पोटाचे विकार संभवतात. सात्विक खाण्यावर भर द्या. नवीन उद्योगांच्या संधी प्राप्त होतील. गाणी ऐका. मन शांत राहील.
शुभ परिधान – हलका मेकअप, सुगंध.

कुंभ – वातावरण चांगले
जल तत्त्वाची रास. वाहत्या पाण्यासारखा निर्मळ स्वभाव हे तुमचे वैशिष्ठय़. धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ मिळेल, त्याचा आवर्जून फायदा घ्या. निळा रंग महत्त्वाचा. त्याने मन शांत राहील. विनायकी महत्त्वाची ठरेल. घरातील वातावरण चांगले राहील.
शुभ परिधान – ठेवणीतील कपडे, घडय़ाळ.

मीन – मन शुद्ध तुझं…
अत्यंत बुद्धिमान आणि दूरदर्शी स्वभावाची तुमची रास. पण तुमचा सरळ स्वभाव नुकसान देतो. पटकन एखाद्यावर विश्वास ठेवू नका. उद्योग-धंदा सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचला. मारुतीची उपासना सुरू ठेवा. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रुद्राक्ष, नासिका अलंकार.

समस्या – माझी नोकरी टिकत नाही. कामाच्या ठिकाणी वारंवार अपमानास तोंड द्यावे लागते. त्यामुळे निराशा येते. – संतोष बेन्द्रे, पुणे
तोडगा – सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम करदर्शन घ्या. कामाच्dया ठिकाणी जाताना खिशात नेहमी पाच लवंगांची पुडी ठेवा.

समस्या, प्रश्न, अडचणी मानवी जगण्याचा भाग… थोडी उपायांची दिशा मिळाली की प्रश्नही आपसूकच सुटतात. आपल्या समस्या, प्रश्न ‘bhavishyafulora1234 @gmail.com’ या ईमेल आयडीवर किंवा दै. ‘सामना’च्या पत्त्यावर आपल्या छायाचित्रासह पाठवा.

manasijyotish@gmail.com