आठवड्याचे भविष्य

4771

>> मानसी इनामदार

मेष : महत्त्वाचा निर्णय
या आठवडयात देवदर्शनाला प्राधान्य द्याल. समाधानी वातावरण राहील. गणेशाची उपासना करा. महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील. त्यावेळी जांभळा रंग जवळ ठेवा. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका.
शुभ परिधान – रेशमी साडी, नथ

वृषभ : नवी जबाबदारी
तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत तुम्ही बराच फेरबदल कराल. तो सकारात्मक असेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविण्यात येईल. त्यामुळे कामाचा वेळ वाढेल. आकाशी रंग लाभदायी.
शुभ परिधान – आभूषण, ठेवणीतील कपडे

मिथुन : बढतीचा योग
नवीन उद्योग सुरु करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीच्या ठिकाणीही अनुकूल वातावण असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. बढतीचा योग आहे. दररोज गणपतीची आरती करा. आत्मविश्वास वाढेल. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – अत्तर, सोनसाखळी

कर्क : मोकळा वेळ
एखाद्या छान कलाकृतीचा आस्वाद घ्याल. हातात बराच मोकळा वेळ मिळेल. चांगले साहित्य वाचनात येईल. त्यामुळे तुमची विचारप्रक्रिया सुरु होईल. त्याचा तुमच्या कामावर सकारात्मक परिणाम होईल. मोतिया रंग जवळ ठेवा जोडीदाराला साथ द्या.
शुभ परिधान – सुती वस्त्र, अंगठी

सिंह : मानसिक समाधान
घरातील वातावरण तुमच्यामुळे प्रसन्न राहणार आहे. कुटुंबाच्या केंद्रस्थानी तुम्ही असाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धीचा वापर मानसिक समाधान देणारा असेल. काही प्रलोभने खुणावतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अबोली रंग तुमचे मनोबल वाढवेल.
शुभ परिधान – भरजरी साडी, प्रसाधन

कन्या : मन रमेल
घरातील महिलावर्गास थोडाफार कामाचा ताण जाणवेल. त्याचा मनस्थितीवर परिणाम संभवतो. पण आवडत्या गोष्टीत मन गुंतवा. त्यांच्यामध्ये तुमचे मन रमेल. विरंगुळा मिळेल. हिरवा रंग तुमच्या साठी नेहमीच शुभ राहिला आहे..
शुभ परिधान – लाल कुंकू, अष्टगंध

तूळ : अथर्वशीर्षाचा प्रभाव
हा आठवडा आर्थिक लाभाचा आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. जमिनीचे व्यवहार याच आठवडयात करण्याचा प्रयत्न करा. त्यात फायदा होईल. त्यावेळी पांढरा रंग जवळ ठेवा. दिवसातून एकदा अथर्वशीर्ष म्हणण्याचा नेम ठेवा.
शुभ परिधान – पैठणी, रेशमी उपरणे

वृश्चिक : सतर्क राहा
जगण्याला एकनवीन आयाम मिळणार आहे. त्याला सामोरे जा. कामाची एखादी नवीन संधी चालून येईल. बाप्पाची उपासना सुरु ठेवा. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. आणि स्वतःहि भक्षण करा. राखाडी रंग फलदायी.
शुभ परिधान – आवडीचे वस्त्र, दागिने

धनु : प्रसन्न वातावरण
कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारात यश तुमचेच आहे. पण दुसऱयावर विसंबू नका. चंदेरी रंग जवळ बाळगा. हातून धार्मिक कार्य घडेल. त्यामुळे उमेद वाढेल. छोटीशी सहल घडून येईल.
शुभ परिधान – चांदीचे आभूषण, जोडवी

मकर : आनंदी आनंद
बाप्पाच्या उत्सवाचा मनापासून आस्वाद घ्याल. परदेशगमनाचा योग आहे. घरात विवाहयोग आहे. विशेषतः अविवाहित तरुणींसाठी. याच आठवडय़ात आवडती व्यक्ती मिळेल. गुलाबी रंग परिधान करा. देवीची उपासना करा.
शुभ परिधान – सुगंध, नवी केशरचना

कुंभ : संगीत सुख
आवडत्या व्यक्तीचा विरह सहन करावा लागेल. कामाच्या ठिकाणी हितशत्रूंचा त्रास संभवतो. अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. एखादा चांदीचा अलंकार किंवा वस्तू जवळ बाळगा. उष्ण पदार्थांचे सेवन करू नका. भगवा रंग शुभ.
शुभ परिधान – घडय़ाळ, कुर्ता

मीन : यश तुमचेच
उत्तमोत्तम कल्पना सुचतील. त्यामुळे वेळ मजेत जाईल. कामाचा ताण घेऊ नका. यश तुमचेच आहे. सोनेरी रंग एकदा तरी परिधान करा. आईला वेळ द्या. तिच्या सल्ल्याने चला. तुमचा फायदा असेल.
शुभ परिधान – नवे कपडे, बाजूबंद

आपली प्रतिक्रिया द्या