साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 जुलै ते शनिवार 27 जुलै 2019

1241

>> नीलिमा प्रधान

मेष – सावध रहा
मेषेच्या सुखस्थानात शुक्र राश्यांतर, मंगळ-गुरू त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात समोरची व्यक्ती दिलेला शब्द मोडण्याची शक्यता आहे. नोकरीत कायद्याचे पालन करा. सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमचा डाव उलटवण्याचा प्रयत्न करतील. प्रवासात सावध रहा. कुटुंबात नाराजी होऊ शकते.
शुभ दि. 21, 25

वृषभ – संधीचा लाभ घ्या
वृषभेच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. व्यवसायात प्रत्येक संधीचा उपयोग करा. आठवडय़ाच्या शेवटी क्षुल्लक अडचणी येतील. राजकीय- सामाजिक क्षेत्रात नव्या उत्साहाने योजना बनवा. वरिष्ठांचा सल्ला घेता येईल. नोकरीत प्रभाव पडेल. कलाक्षेत्रांत उच्च प्रतीचे यश मिळेल.
शुभ दि. 21, 22

मिथुन – नवीन जबाबदारी लाभेल
मिथुनेच्या धनेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. व्यवसायात मोठी वाढ होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. योग्य गुंतवणूक करा. नोकरीत उत्तम प्रगती कराल. राजकीय- सामाजिक क्षेत्रात नवीन जबाबदारी स्वीकारता येईल. मनावरील दडपण कमी झाल्याने नवी झेप घ्याल.
शुभ दि. 21, 22

कर्क- योजना मार्गा लावा
स्वराशीत शुक्र प्रवेश, सूर्य-बुध युती तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. शारीरिक, मानसिक, दडपण कमी होईल. उत्साहाने नव्या कार्याचा आरंभ करा. व्यवसाय-नोकरीत अपेक्षित यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात झालेली चूक सुधारता येईल. योजना मार्गी लावा. कलाटणी देणारी घटना घडेल.
शुभ दि. 22,23

सिंह – प्रसंगावधान ठेवा
सिंहेच्या व्ययेशात शुक्र राश्यांतर, मंगळ-गुरू त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला प्रसंगावधान ठेवावे लागेल. व्यवसायात काम फिसकटण्याची शक्यता आहे. रागापेक्षा बुद्धिचातुर्य वापरा. प्रसंगावधान राखा. राजकीय, क्षेत्रांत विरोध होण्याची शक्यता आहे. अतिरेक कुठेही करू नका. शुभ दि. 25, 26

कन्या – आत्मविश्वास वाढेल
कन्येच्या एकादशात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. व्यवसायाला कलाटणी देता येईल. मोठय़ा प्रमाणात कॉन्ट्रक्ट मिळवता येईल. स्वतःचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी वेगाने सूत्रं हलवा. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमी राहता येईल. दर्जेदार परिचयाने उत्साह, आत्मविश्वास वाढेल. शुभ दि. 22, 23

तूळ – सकारात्मक काळ
तुळेच्या दशमेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात जम बसेल. कर्जाचे काम होईल. नोकरीत प्रगतीकारक बदल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याला योग्य दिशा मिळेल. यशासाठी कार्य वेगाने सुरू करा. उज्ज्वल यश मिळेल. मान-सन्मान प्राप्त होईल. व्यवहारात फायदा होईल. शुभ दि. 21, 25

वृश्चिक – वर्चस्व सिद्ध कराल
वृश्चिकेच्या भाग्येशात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. व्यवसायातील तणाव कमी होईल. नवे काम मिळेल. नोकरीत बदल करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध कराल. पुढील यश संपादन करण्यासाठी वेगाने कार्याची मांडणी करा. नाटय़, चित्रपट क्षेत्रात कर्तबगारी दाखवाल. शुभ दि. 22, 23

धनु – मनोबल राखा
धनु राशीच्या अष्टमेशात शुक्र राश्यांतर, शुक्र-प्लुटो प्रतियुती होत आहे. व्यवसायात दुर्लक्ष करू नका. व्यवहारात सावध रहा. कामगार वर्गाकडून त्रास होऊ शकतो. राजकीय, सामजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात बोलले जाईल. कुटुंबात मनावर दडपण आणणारी घटना संभवते. प्रवासात, नोकरीत अडचण येईल. शुभ दि. 21, 22

मकर – परदेशात जाण्याची संधी
मकरेच्या सप्तमेशात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती होत आहे. सर्व क्षेत्रांतील कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. नोकरीत परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका निभावता येईल. ताणतणाव कमी होऊन वर्चस्व वाढेल. योजना रेंगाळत ठेवू नका. दिग्गज लोकांचा परिचय होईल.
शुभ दि. 22, 23

कुंभ – कामाचा व्याप वाढेल
कुंभेच्या षष्ठेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. मन खंबीर राहील, परंतु व्यवसायात समस्या येईल. वाद होईल. नोकरीत कामाचा व्याप नकोसा वाटेल. कामात चूक होऊ देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होईल. कलाक्षेत्रात मतभेदाची शक्यता आहे.
शुभ दि. 22, 23

मीन – चांगल्या योजनांचा आरंभ
मीनेच्या पंचमेशात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती होत आहे. धंद्याला कलाटणी मिळेल. नोकरीत प्रमोशन व फायदेशीर घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेळकाढू धोरण न ठेवता चांगल्या योजनांचा आरंभ करा. उज्ज्वल यश संपादन कराल. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल.
शुभ दि. 26, 27

आपली प्रतिक्रिया द्या