साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 28 जुलै ते शनिवार 3 ऑगस्ट 2019

1228

>> नीलिमा प्रधान

मेष
अडचणींवर मात कराल
बुध मिथुनेत वक्री होऊन पुन्हा कर्केत राश्यांतर करीत आहे. अडचणींवर मात करून व्यवसायात ठाम उभे रहा. जुना अनुभव गाठीशी असतो त्याचा उपयोग सर्वच क्षेत्रांत करा. राजकारणात तुमचा डाव उधळण्याचा प्रयत्न होईल. मनाचे सामर्थ्य साथ देईल. कौटुंबिक प्रश्न हुशारीने सोडवा.
शुभ दिनांक – 28, 29

वृषभ
संधीचा लाभ घ्या
वृषभेच्या पराक्रमात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र युती होत आहे. व्यवसायात चातुर्याने प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. संधीचा उपयोग करा. राजकीय – सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव दिसेल. लोकप्रियतेत वाढ करणारी योजना बनवा. यशासाठी पाया मजबूत करा. तुमच्या क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवाल.
शुभ दिनांक – 30, 1

मिथुन
विचारांना चालना मिळेल
स्वराशीत दोन दिवसांसाठी बुध वक्री होत आहे, पुन्हा कर्क राशीत जात आहे. चंद्र – मंगळ लाभयोग होत आहे. व्यवसायात अचानक प्रभावी बदल होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात बरेच नवे शिकावयास मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विचारांना चालना देणारी घटना तुमच्या क्षेत्रात घडेल.
शुभ दिनांक – 1, 2

कर्क
वादाचे प्रसंग निर्माण होतील
मिथुनेत वक्री होणारा बुध पुन्हा तुमच्याच राशीत येत आहे. मंगळ – नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. व्यवसायात नवा फंडा उपयोगी पडेल. वादाचा प्रसंग निर्माण होईल. तुम्ही काही प्रश्न तटस्थ राहून सोडवा. सामाजिक क्षेत्रात स्वतःचे स्थान प्रस्थापित करा. वाटाघाटी, वादविवाद असे प्रश्न रेंगाळत ठेवू नका.
शुभ दिनांक – 1, 3

सिंह
सावध भूमिका राखा
सिंहेच्या व्ययेशात बुध राश्यांतर, चंद्र-मंगळ युती होत आहे. व्यवसायात समस्या उद्भवेल. भागीदारी तुटण्याची शक्यता आहे. राजकीय – सामाजिक क्षेत्रात योजनांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत कायद्याचे पालन करा. कोर्टाच्या कामात अभ्यास करून सल्ला घ्या. चौफेर सावध रहा.
शुभ दिनांक – 28, 29

कन्या
सकारात्मक काळ
कन्येच्या एकादशात बुध राश्यांतर, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो महत्त्वाची कामे प्रत्येक दिवसाला करता येतील. व्यवसायात जम बसवा. राजकीय – सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायी घटना घडेल. योजनांना वेग द्या. दूरदृष्टिकोन ठेवूनच बस्तान बसवा. नोकरीत लाभ, नावलौकिक होईल.
शुभ दिनांक – 28, 29

तूळ
गौरवास्पद काम कराल
तुळेच्या दशमेशात बुधाचे राश्यांतर, चंद्र-शुक्र युती होत आहे. व्यवसायातील अडचणी दूर होतील. कर्जाचे काम मार्गी लागेल. प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. राजकीय-सामाजित क्षेत्रात यशस्वी व्हाल. जबाबदारीने वागल्याचे कौतुक वरिष्ठ करतील. नाटय़ – चित्रपट – क्रीडा क्षेत्रात गौरवास्पद काम कराल.
शुभ दिनांक – 30, 1

वृश्चिक
नव्या योजना बनवाल
मिथुनेत वक्री होणारा बुध लगेच कर्केत येत आहे. त्यामुळे तुमच्या धंद्यातील समस्या कमी होईल. नव्या दिशेने मार्गक्रमण करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव पाडाल. कुटुंबासाठी चांगली योजना बनवाल. नाटय़ – चित्रपट – क्रीडा क्षेत्रात चमकाल. परदेशात जाण्याचा योग येईल.
शुभ दिनांक – 28, 1

धनु
मनोबल राखा
धनुच्या अष्टमेशात बुध राश्यांतर, मंगळ-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. वेगळय़ाच अडचणींचा सामना करावा लागेल. ताणतणाव सहन करावा लागेल. दुखापत संभवते. सावधपणे कामे करा. राजकीय क्षेत्रात अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल. मनाचे खच्चीकरण केले जाईल.
शुभ दिनांक – 29, 30

मकर
लोकप्रियता लाभेल
मकरेच्या सप्तमेशात बुधाचे राश्यांतर, चंद्र-बुध युती होत आहे. व्यवसायात सुधारणा करण्याची संधी मिळेल. कोणताही प्रश्न संयमाने सोडवा. म्हणजे तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. लोकप्रियता मिळेल. नोकरीत चांगला बदल करता येईल. कलेच्या क्षेत्रात नावलौकिक व लाभ मिळेल.
शुभ दिनांक – 28, 1

कुंभ
भागीदारासह मतभेद होतील
कुंभेच्या षष्ठय़स्थानात बुध प्रवेश, मंगळ-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. व्यवसायात खर्च वाढेल. भागीदाराबरोबर मतभेद होईल. राजकीय – सामजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा विरोधक मोडून काढतील. नोकरीत वरिष्ठांच्या मनात गैरसमज होईल. नाटय़ – चित्रपट – क्रीडा क्षेत्रात आपापसात वाद होऊ शकतो.
शुभ दिनांक – 29, 30

मीन
प्रेरणादायी घटना घडेल
मीनेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र युती होत आहे. घर, जमिनीसंबंधी कामे होतील. राजकीय – सामाजिक क्षेत्रात वेळेला महत्त्व द्या. लोकांच्या समस्येवर उपाय शोधा. लोकप्रियता मिळवा. नोकरीत फायदा होईल. नाटय़ – चित्रपट – क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी घटना घडेल. नवी वाटचाल कराल.
शुभ दिनांक – 28, 1

आपली प्रतिक्रिया द्या