साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 ऑगस्ट 2019

2527

>> नीलिमा प्रधान

मेष – अडचणी कमी होतील
मेषेच्या पंचमेषात शुक्र-सूर्याचे राश्यांतर सप्ताहाच्या शेवटी होत आहे. व्यवसायातील अडचणी कमी होतील. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल अशी घटना घडेल. सामाजिक क्षेत्रांत रेंगाळलेली कामे होतील. दिग्गजांचा सहवास मिळेल. नव्या उमेदीने कार्य आरंभ होईल.
शुभ दिनांक – 14, 15

वृषभ – रागावर ताबा ठेवा
वृषभेच्या सुखस्थानात शुक्र-सूर्य राश्यांतर तुमच्या कार्याला दिशा देणारे ठरेल. व्यवसायात मोठे काम ओळखीतून मिळेल. मानसिक दडपण येईल. अडचणींवर मात करून यश मिळवायचे आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मान-प्रतिष्ठा मिळेल. जवळचे लोक अडचणी वाढवतील. रागावर ताबा ठेवा. शुभ दिनांक – 13, 14

मिथुन – परदेशी जाण्याची संधी लाभेल
मिथुन राशीच्या पराक्रमात शुक्र-सूर्य राश्यांतर होत आहे. चंद्र-बुध प्रतियुती व्यवसायात अधिक फायदेशीर ठरेल. कामे वाढतील. ओळखी होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठsचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. परदेशात जाण्याची संध्यी मिळेल.
शुभ दिनांक – 11, 12

कर्क – कार्याला दिशा मिळेल
कर्केच्या धनेषात शुक्र-सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. अनाठाई खर्च वाढेल. मनावर दडपण येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. प्रगतीचा, लोकप्रियतेचा मार्ग मिळेल. परंतु संतापावर ताबा ठेवा. दौऱयात धावपळ होईल. वाहन जपून चालवा.
शुभ दिनांक – 13, 14

सिंह – आत्मपरीक्षण करा
स्वराशीत शुक्र-सूर्य राश्यांतर होत आहे. व्यवसायातील-नोकरीतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विचारवंतांचा सल्ला घ्या. चर्चा करा. त्यामुळे योग्य नियोजनाद्वारे कार्यक्रम करा. कौटुंबिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.
शुभ दिनांक – 16, 17

कन्या – विचारपूर्वक निर्णय घ्या
कन्या राशीच्या व्ययेषात शुक्र-सूर्य राश्यांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला नोकरी-व्यवसाय यातील महत्त्वाची कामे करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या. शुक्रवार, शनिवार तुमच्या विरोधात कट-कारस्थान होईल. मनाविरुद्ध वातावरणामुळे उद्विग्नता येईल.
शुभ दिनांक – 11, 12

तूळ – प्रगतीकारक काळ
तुळेच्या एकादशात शुक्र-सूर्य राश्यांतर तुमच्या प्रत्येक कार्यात यश देणारे असेल. व्यवसाय-नोकरीत वेगाने प्रगती करता येईल. मोठे काम मिळवता येईल. नवीन मातब्बर लोकांचा परिचय तुम्हाला आत्मविश्वास देणारा ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांना भेट द्या. चौफेर प्रगतीची घोडदौड करा.
शुभ दिनांक – 11, 12

वृश्चिक – योजनांना गती मिळेल
वृश्चिकेच्या दशमेषात शुक्र-सूर्य राश्यांतर होत आहे. व्यवसायात रेंगाळलेले काम पूर्ण होईल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. प्रगतीच्या मार्गावर वाटचाल होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा वाढेल. योजनांना गती मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल.
शुभ दिनांक – 13, 14

धनु – मनोधैर्य जपा
धनुच्या भाग्येषात शुक्र-सूर्य राश्यांतर होत आहे. व्यवसाय-नोकरीत झालेला गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. तुमचे मनोधैर्य उपयोगी येईल. ताण-तणावातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न जिद्दीने करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत उत्साह वाढेल. खंबीरपणे कार्याला सुरुवात करा. नव्या योजनांची मांडणी करा.
शुभ दिनांक – 16, 17

मकर – संमिश्र घटनांचा काळ
मकरेच्या अष्टमेषात शुक्र-सूर्य राशांतर, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. व्यवसाय-नोकरीत तुमचे परिश्रम व मुद्देसूद बोलणे प्रभावी ठरेल. प्रवासात सावध राहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. तुमच्या मनातील सुप्त प्रेमाची, मदतीची भावना ओळखणारे लोक तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत.
शुभ दिनांक – 14, 15

कुंभ – आर्थिक व्यवहारात लक्ष द्या
कुंभेच्या सप्तमेषात शुक्र-सूर्य राश्यांतर होत आहे. व्यवसायातील गुंता सोडवता येईल. नोकरीत स्थिर मनाने काम करा. कोणत्याही निर्णयाची घाई नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नवे डावपेच तयार करा. योजनांची आखणी करा. परंतु कार्यारंभ करण्यासाठी योग्य संधी शोधा. आर्थिक व्यवहारात लक्ष द्या. शुभ दिनांक – 16, 17

मीन – वर्चस्व वाढेल
मीन राशीच्या षष्ठेशात शुक्र-सूर्य राश्यांतर होत आहे. चंद्र-बुध प्रतियुती जास्त महत्त्वाची ठरेल. व्यवसाय-नोकरीत चातुर्याचा वापर करा. वाद वाढवू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे वर्चस्व राहील. प्रतिस्पर्धी तणाव करू शकतात. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नवीन परिचय होईल.
शुभ दिनांक – 12, 13

आपली प्रतिक्रिया द्या