आठवड्याचे भविष्य : रविवार 25 ते शनिवार 31 ऑगस्ट 2019

7464

>> नीलिमा प्रधान

मेष : यशस्वी वाटचाल कराल
मेषेच्या पंचमेषात बुध प्रवेश, सूर्य – हर्षल त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक दिवस तुम्ही वेगाने प्रगती करून तुमचा ठसा उमटवा. व्यवसाय-नोकरीत यशस्वी वाटचाल कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्थान प्रस्थापित करा. कौटुंबिक समस्या व तणाव कमी होईल. शुभ दिनांक ः 25, 26

वृषभ : मनाप्रमाणे घटना घडतील
वृषभेच्या सुखेषात बुध प्रवेश, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. कठीण, महत्त्वाची कामे लवकर करा. प्रसंगाला, वेळेला महत्त्व द्या. व्यवसाय-नोकरीत उच्च प्रतीचे यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामे रेंगाळत ठेवू नका. कुटुंबात मनाप्रमाणे घटना घडतील. कलाक्षेत्रात चमकाल. शुभ दिनांक ः 26, 27

मिथुन : मानसन्मान वाढेल
मिथुनेच्या पराक्रमात बुध प्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत सुधारणा होईल. नवा बदल करण्याचा विचार यशस्वी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठत लोकांचा सहवास मिळेल. मानसन्मान वाढेल. दौऱयात लोकप्रियता मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. शुभ दिनांक ः 28, 29

कर्क : परदेशी जाण्याची संधी
कर्केच्या धनेषात बुध प्रवेश, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्व वाढेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची स्तुती करतील. अधिकारात वाढ होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात मोठय़ांच्या मोठे कंत्राट मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. शुभ दिनांक ः 30, 31

सिंह : अडचणींवर मात कराल
स्वराशीत बुध प्रवेश, सूर्य-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. सर्व कार्यातील अडचणीवर मात करून तुम्ही तुमच्या क्षेत्रात नवे स्थान निर्माण कराल. व्यवसाय-नोकरीतील कामे होतील. रेंगाळलेले व्यवहार पूर्ण करा. राजकीय-सामाजिकक्षेत्रात दौऱयात यश मिळेल. दिग्गजांचे सहकार्य मिळेल. शुभ दिनांक ः 25, 26

कन्या : सावध रहा
कन्या राशीच्या व्ययेषात बुध प्रवेश, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. या आठवडय़ात तुमच्या कार्यपद्धतीत वागण्या, बोलण्यात बदल करावा लागेल. नाही तर प्रत्येक ठिकाणी वादाचे कारण तयार होईल. नोकरी-व्यवसायात सावध भूमिका घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध भूमिका घ्या. जबाबदारी वाढेल. शुभ दिनांक ः 25, 26

तूळ : व्यवसायाला कलाटणी मिळेल
तुळेच्या एकादशात बुध प्रवेश, सूर्य-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्याला योग्य न्याय देता येईल. सहकार्य मिळेल. अपेक्षित व्यक्तीची भेट होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करा. नोकरी, व्यवसायाला कलाटणी मिळेल. शेअर्समधील नुकसान भरून काल. शुभ दिनांक ः 26, 27

वृश्चिक : नोकरीत सुधारणा होईल
वृश्चिकेच्या दशमेषात बुध प्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा वापर होतो का नाही याची पाहणी करा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. शुभ दिनांक ः 25, 31

धनु : गैरसमज दूर होतील
धनूच्या भाग्येषात बुध प्रवेश, सूर्य-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात चांगली सुधारणा होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज, तणाव दूर कराल. तुमचे विचार प्रभावाने मांडा. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात लोकांकडून आश्वासन मिळेल. शुभ दिनांक ः 26, 27

मकर: कामाचा व्याप वाढेल
मकरेच्या अष्टमेषात बुध प्रवेश, चंद्र-गुरू त्रिकोण योग होत आहे. व्यवसायात मोठी संधी मिळाली तरी सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कायद्याच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. जबाबदारी वाढेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात मेहनत जास्त होईल. शुभ दिनांक ः 28, 29

कुंभ : विचारांना चालना मिळेल
कुंभेच्या सप्तमेषात बुध प्रवेश. सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. प्रत्येक क्षेत्रात थोडी पीछेहाट झाली होती ती भरून काढता येतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रत्येक मुद्दा प्रभावी ठरेल. विचारशक्तीला चालना देणारी घटना घडेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा स्पर्धेत पुरस्कार मिळेल. शुभ दिनांक ः 26, 31

मीन : सहनशीलता बाळगा
मीनेच्या षष्ठेशात बुध प्रवेश, सूर्य-गुरू त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीपासून कामे करा. नोकरी-व्यवसायात नमते धोरण घेण्याची वेळ येईल. वादविवादामुळे मनःस्ताप होईल. सहनशीलता ठेवा. राजकीय क्षेत्रात महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिनांक ः 25, 26

आपली प्रतिक्रिया द्या