साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 26 जानेवारी ते शनिवार 1 फेब्रुवारी 2020

5506

>> नीलिमा प्रधान

मेष
लाभदायक घटना घडतील
मेषेच्या एकादशात बुध राश्यांतर शुक्र-नेपच्यून युती होत आहे. कोणतीही कठीण समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. धंद्यात लाभदायक घटना घडेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया ओळखा. दूरदृष्टीतून यश मिळेल.
शुभ दिनांक – 26, 27

वृषभ –
व्यवसायातील समस्या सोडवाल
वृषभेच्या दशमेशात बुध राश्यांतर चंद्र-शुक्र युती होत आहे. व्यवसायातील गुंता सोडवता येईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील असे काम कराल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योजना गतीमान करा. कुटुंबात इतरांना सहाय्य करावे लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस संपवा. शुभ दिनांक – 28, 29

मिथुन
कठीण प्रसंगावर मात कराल
मिथुनेच्या भाग्येशात बुध राश्यांतर शुक्र-नेपच्यून युती होत आहे. कठीण प्रसंगावर मात करण्याची मानसिक शक्ती तुमच्याकडे राहील. अरेरावी करू नका. नम्रपणे, प्रेमाने बोलून कामे करून घ्या. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात दबाव राहील. वरिष्ठ कोंडीत पकडतील.
शुभ दिनांक – 28, 29

कर्क
नोकरीत वर्चस्व राहील
कर्केच्या अष्टमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात मोठे काम मिळेल, परंतु नोकरवर्गाची कमतरता होऊ शकते. खर्च वाढेल. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे काम होईल. कलाक्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. मौल्यवान वस्तू सांभाळा.
शुभ दिनांक – 30, 31

सिंह
मनोबल राखा
सिंहेच्या सप्तमेशात बुध राश्यांतर, शुक्र-नेपच्यून युती होत आहे. क्षेत्राला चालना देणारी घटना घडेल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. धंद्यात तडजोड करावी लागेल. नोकरीत समस्या वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव राहील. आरोप, टीका यांचा सामना करावा लागेल.
शुभ दिनांक – 27, 1

कन्या
गुंतवणुकीबाबत सावध रहा
कन्येच्या षष्ठेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अंदाज नीट घ्या. गुंतवणूक घाईने करू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सावध रहा. प्रतिष्ठत व्यक्तीचा सहवास मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
शुभ दिनांक – 26, 29

तूळ
उतावळेपणा नको
तुळेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, शुक्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. व्यवसायात संयमाने बोला. उतावळेपणा करू नका. नोकरीत दुसऱ्यांनी केलेल्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. राजकीय – सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. वरिष्ठांच्या मदतीला जावे लागेल. कौतुक होईल. शुभ दिनांक – 27, 28

वृश्चिक
परदेशी जाण्याचा योग
वृश्चिकेच्या सुखेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात नवा पर्याय, विचार करता येईल. नोकरीत चमक दिसेल. परदेशात जाण्याचा योग येईल. वाहन, घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात यश मिळेल.
शुभ दिनांक – 26, 29

धनु
प्रेरणादायी काळ
धनुच्या पराक्रमात बुध राश्यांतर शुक्र-नेपच्यून युति होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. व्यवसायात जम बसवण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीमध्ये लाभदायक घटना घडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मानप्रतिष्ठा वाढवण्यासाठी योग्य ते कार्य करा. लोकसंग्रह वाढवा. महत्त्वाच्या संधी प्राप्त होतील.
शुभ दिनांक – 26, 28

मकर
आत्मविश्वास वाढेल
मकरेच्या धनेशात बुध राश्यांतर, शुक्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. आत्मविश्वास भर पडेल अशी घटना घडेल. स्थैर्य राहील. किचकट काम करून घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चर्चा, सभा यात यश मिळेल. लोकांच्या गरजांना त्यांना मदत करा. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. कलाक्षेत्रात प्रगतीचे नवे दालन खुले होईल.
शुभ दिनांक – 26, 28

कुंभ
नवीन कार्याचा आरंभ करा
स्वराशीत बुध राश्यांतर, शुक्र-नेपच्यून युति होत आहे. रविवारी मन अस्थिर होईल. व्यवसायात बदल किंवा सुधारणा करायची याचा विचार करून ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा समोर ठेवा. आग्रही भूमिका घेऊ नका. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात परिचयात वाढ होईल. नवीन कार्याचा आरंभ करा.
शुभ दिनांक – 28, 30

‘मीन
ताणतणावाचे नियोजन करा
मीनेच्या व्ययेशात बुध राश्यांतर सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. मनाविरुद्ध काम करण्याची वेळ येईल. मनावर दडपण येईल. संसारात तणाव होऊ शकतो. व्यवसायात वाढ करताना करार नीट करा. पैशाची गुंतवणूक सावधपणे करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्या.
शुभ दिनांक – 31, 1

आपली प्रतिक्रिया द्या