साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 15 ते शनिवार 21 मार्च 2020

7900

>> नीलिमा प्रधान

मेष – इतरांना सांभाळून घ्या
चंद्र-बुध लाभयोग, मंगळ गुरू युती होती आहे. राजकारणात प्रत्येकानेच स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला तर मुख्य प्रश्न सोडवणे बाजूला राहते. आपापसांत वाद वाढतात. तारतम्याने वागण्याची गरज भासेल. विरोधक अंतर्गत वादाचा फायदा उठवेल याकडे लक्ष ठेवा. इतरांना सांभाळून घ्या.
शुभ दिनांक – 18, 19

व़ृषभ – संवाद साधा
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. अचानक खर्च निर्माण होईल. व्यवसायात तणाव न करता संवाद साधा. नोकरीत सहकारी वर्गाला कमी लेखू नका. जीवनसाथी, मुले यांच्या विचारांचा आग्रह मनावर दडपण आणू शकतो. विरोधकांच्या प्रश्नावर समाधानकार उत्तर द्यावे लागेल.
शुभ दिनांक – 15, 19

मिथुन – अर्धवट कामे पूर्ण करा
सूर्य-चंद्र लाभयोग, मंगळ-गुरू युती होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यवसाय-नोकरीत उत्तम प्रगती होईल. फायद्याचा नवा फंडा शोधाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अर्धवट राहिलेल्या कामांना प्रथम प्राधान्य द्या. नाटय़-चित्रपटक्षेत्रात उत्कर्षाची वाट मिळेल. शुभ दिनांक – 17, 18

कर्क – लोकसंग्रह वाढेल
सूर्य-चंद्र लाभ योग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. शारीरिक, मानसिक दडपण कमी होईल. एखादा प्रश्न सुटलेला नसला तरी त्यावर मार्ग शोधता येईल. व्यवसायात प्रयत्नाने यश मिळवाल. नोकरीत तणाव कमी होईल. लोकसंग्रह वाढेल. विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा योजना पूर्ण करा.
शुभ दिनांक – 19, 20

सिंह – वरिष्ठ दबाव टाकतील
चंद्र-शुक्र त्रिकोण योग, मंगळ-गुरू युती होत आहे. राजकीय वातावरण लाभेल. त्यामुळे त्याच्या झळा तुमच्या प्रतिष्ठेपर्यंत पोहोचतील. व्यवसायात संधी मिळेल. नोकरीत धावपळ होईल. कामच्या ठिकाणी वरिष्ठ दबाव टाकतील. कुटुंबातील समस्या सोडवाल. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल.
शुभ दिनांक – 17, 18

कन्या – कार्याचा प्रभाव पडेल
सूर्य-शनी लाभयोग, मंगळ-गुरू युती होत आहे. मानसिक दडपण येईल. एखाद्या प्रश्नावर चर्चा करताना वाद होईल. जवळच्या लोकांची नाराजी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी होईल. तुमच्या कार्याचा प्रभाव पडेल. जवळचे लोकच तुमच्यावर कट-कारस्थानाचा प्रयत्न करतील.
शुभ दिनांक – 15, 19

तूळ – व्यवसायात वाढ
चंद्र-शुक्र त्रिकोण योग, चंद्र-गुरू युती होत आहे. तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या तणावाचा परिणाम तुमच्यावर होईल. वृद्ध व्यक्तीबरोबर मतभेद होतील. चिंताही वाटेल. व्यवसायात वाढ होईल. अहंकार दिसेल असे वागणे टाळा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात परिचय वाढेल. आवडत्या क्षेत्रात उत्साह वाढेल. शुभ दिनांक – 15, 16

वृश्चिक – मैत्रीत तणाव
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-गुरू युती होत आहे. व्यवसाय, कुटुंबात वाद टाळा. खर्चावर बंधन घालणे कठीण होईल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नोकरीत तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. अपरिचित परिचित व्यक्तींचा सहवास वादग्रस्त ठरेल. मैत्रीत तणाव होईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शुभ दिनांक – 19, 20

धनु – प्रेमाला चालना मिळेल
सूर्य-चंद्र लाभ योग, मंगळ-गुरू युती होत आहे. रविवारनंतर तणाव, चिंता कमी होईल. प्रत्येक दिवस तुम्हाला यशापर्यंत नेईल. प्रकृतीची काळजी घ्या. सुधारणा होईल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. प्रेमाला चालना मिळेल. चित्रपट-नाटय़क्षेत्रात अपेक्षित संधीचा लाभेल. शुभ दिनांक – 17, 18

मकर – रागावर ताबा ठेवा
सूर्य-चंद्र लाभ योग, चंद्र-बुध युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. वादविवादाचा प्रसंग पटकन निर्माण होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. यश खेचून आणता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधक, गुप्त हितशत्रू तुमच्या मनाचे, व्यक्तीचे खच्चीकरण करतील. खंबीर रहा. ध्येयाने प्रेरित व्हा. कला क्षेत्रात लोकप्रियता मिळेल.
शुभ दिनांक – 15, 21

कुंभ – संधीचे सोने करा
सूर्य-चंद्र लाभयोग, मंगळ-गुरू युती होत आहे. व्यापक स्वरूपाचे कार्य तुमच्या क्षेत्रात तुम्ही करा. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करा. जिद्द, मेहनत तुम्हाला व्यवसाय-नोकरीत उच्च प्रतीचे यश देईल. कंपनीद्वारे परदेशात जाल. व्यापक जनहिताचा प्रश्न रेंगाळत ठेवू नका. वेळकाढू धोरण कुठेही वापरू नका. शुभ दिनांक – 15, 16

मीन – नोकरी मिळेल
चंद्र-गुरू युती, सूर्य-शनी लाभयोग होत आहे. रेंगाळत राहिलेली कामे वेगाने मार्गी लावा. धंद्यात क्षुल्लक समस्या येईल. परिचयातून तुम्हाला फायदेशीर काम मिळेल. दिग्गज लोकांच्या परिचयाने उत्साहात भर पडेल. नोकरी मिळेल. नवे काम मिळेल. तुमचे ध्येय विसरू नका.
शुभ दिनांक – 17, 18

आपली प्रतिक्रिया द्या