आठवड्याचे भविष्य – 19 एप्रिल ते 25 एप्रिल 2020

4847

>> नीलिमा प्रधान

मेष – दूरदृष्टिकोन बाळगा
स्वराशीत बुधाचे राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. आठवडयाच्या सुरुवातीला एखादे विधान चुकण्याची शक्यता. सावधपणे बोला. कायद्याचे पालन करा. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. प्रभाव वाढेल. सामाजिक कार्याला गती येईल. आर्थिक साहाय्य जमा कराल. दूरदृष्टीकोन बाळगा. नावलौकिक लाभेल.
शुभ दिनांक 24, 25

वृषभ – सुसंवाद प्रभावी ठरेल
वृषभेच्या व्यवेषात बुधाचे राश्यांतर, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात तुमचे महत्त्व वाढेल. मात्र अरेरावीशिवाय गोड बोलणे प्रभावी ठरेल. राजकीय क्षेत्रात सावध भूमिका घ्या. प्रसंगाचे गांभीर्य ओळखा. सामाजिक कार्यात लोकांना सामावून घ्या. स्पर्धा करण्यापेक्षा ध्येयावर लक्ष ठेवा.
शुभ दिनांक 19, 20

मिथुन – कर्तव्याला प्राधान्य द्या
मिथुनच्या एकदशात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र केंद्रयोग होत आहे. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. हिशेब नीट करा. नोकरीत प्रतिष्ठत व्यक्तीची कार्ये तुमच्याकडे दिली जातील. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल.
शुभ दिनांक 19, 24

कर्क – सेवाभावी वृत्ती राखा
कर्केच्या दशमेषात बुध राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायात बदल करून परिस्थितीवर मात करा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय – सामाजिक कार्यात सेवाभावी वृत्ती ठेवा. अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी करा. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.
शुभ दिनांक 19, 20

सिंह – महत्त्वाची जबाबदारी येईल
सिंहेच्या भाग्येषात बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. आठवडयाच्या सुरुवातीला समस्या जाणवतील. मात्र उपायही मिळेल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची नियुक्ती होईल. सामाजिक कार्यात स्वतःचा अभ्यास सुरु ठेवा. दिशाभूल होऊ देऊ नका. प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिनांक 24, 25

कन्या – अतिउत्साह दूर ठेवा
मेषेच्या अष्टमेषात बुध राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायात नियमाचे पालन करा. ओळखीने काम होत नाही हे लक्षात असू द्या. अतिउत्साही स्वभाव बाजूला ठेवा. राजकीय क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. सामाजिक कार्यात लोकांना सहकार्य करा. त्याचा लाभच होईल.
शुभ दिनांक 20, 21

तूळ – रागावर ताबा ठेवा
तुळेच्या सप्तमेषात बुध राश्यांतर, बुध, प्लूटो केंद्रयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी दडपण येईल. परिस्थितीचा अंदाज घेताना फाजील आत्मविश्वास बाळगू नका. व्यवसायात वाद होतील. राजकीय – सामाजिक क्षेत्रात रागावर ताबा ठेवा. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक 19, 24

वृश्चिक – लोकप्रियता लाभेल
वृश्चिकेच्या षष्ठsशात बुध राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. आठवडयाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. व्यवसायात, नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. आर्थिक साहाय्य करताना सतर्क राहा. बोलताना संयम राखा.
शुभ दिनांक 20, 21
धनु
खंबीरपणे कार्य कराल
धनुच्या पंचमेषात बुध राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायात सुसंवाद राखून व्यवहार करा. राजकीय क्षेत्र वरिष्ठ महत्त्वाची जबाबदारी देतील. तुम्ही खंबीरपणे उत्तम कार्य कराल. जवळचे लोक स्पर्धा करतील. कठोर बोलणे टाळा. कायदा पाळा.
शुभ दिनांक 19, 24

मकर – जनतेच्या उपयोगी पडाल
मकरेच्या सुखस्थानात बुध राश्यांतर, बुध, मंगळ लाभयोग होत आहे. साडेसाती सुरु आहे. कायद्याचे पालन करूनच व्यवसाय सुरु ठेवा. नोकरीत महत्त्वाची भूमिका निभावाल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. जनतेच्या उपयोगी पडाल. वेळ सत्कारणी लावा.
शुभ दिनांक 19, 20

कुंभ -संयम बाळगून निर्णय घ्या
कुंभेच्या पराक्रमात बुध राश्यांतर,चंद्र, नेपच्यून युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो संयम ठेऊन निर्णय घ्यायचा आहे. राजकीय – सामाजिक क्षेत्रात सौम्य शब्दात मत प्रदर्शन करा. अन्यथा पुढे त्रासदायक ठरेल. व्यवसायात नफा-तोटा विचार न करता वागा.
शुभ दिनांक 19, 20

मीन -अधिकारांचा योग्य वापर करा
मीनेच्या धनेशात बुध राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. कठीण प्रसंगावर आत्मविश्वासाने मात कराल. व्यवसाय, नोकरीत किचकट प्रश्न सोडवाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिकारांचा योग्य वापर करा. गरजूंना आर्थिक साहाय्य कराल. नवे परिचय होतील.
शुभ दिनांक 24, 25

आपली प्रतिक्रिया द्या