साप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021

>> नीलिमा प्रधान

मेष : तणाव होईल

मेषेच्या पंचमेशात मंगळ राशांतर, बुध-हर्षल लाभयोग होत आहे. व्यवसायात क्षुल्लक तणाव होईल. अहंकाराने वागू नका. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. प्रकृतीची काळजी घेऊन कामे करा. नोकरीत स्पष्ट बोलण्याने तणाव होईल. आठवडय़ाच्या शेवटी नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल.

शुभ दिनांक : 18, 22

वृषभ : खाण्याचे तंत्र सांभाळा

वृषभेच्या सुख स्थानात मंगळ राशांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या भावनांची कदर होणार नाही. इतरांनाच सांभाळून घ्यावे लागेल. प्रवासात कायदा पाळा. खर्च वाढेल. प्रतिष्ठा सांभाळा. संसारात अडचणी येतील. खाण्याचे तंत्र सांभाळा.

शुभ दिनांक : 20, 21

मिथुन : प्रतिष्ठा वाढेल

मिथुनेच्या पराक्रमात मंगळ राशांतर, शुक्र-गुरू प्रतियुती होत आहे. कोणतेही काम करताना अडचणी येतील. पण तुम्ही यश मिळवाल. कायद्याला झुगारू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढविणारी घटना घडेल. चांगले लोक सहवासात येतील. तुमच्या कार्याची स्तुती होईल.

शुभ दिनांक : 22, 23

कर्क : ताळमेळ ठेवा

कर्केच्या धनेशात मंगळ राशांतर, शुक्र-गुरू प्रतियुती होत आहे. व्यवसायात मोठी कामे मिळविण्यात यश मिळेल. चर्चा करताना ताळमेळ ठेवा. दिग्गज व्यक्तींशी मैत्रीचे संबंध जोडले जातील. त्यातील धोकासुद्धा लक्षात घ्या. स्पर्धा जिंकाल. गुरुवार, शुक्रवार कायद्याचे पालन करून मुद्दे मांडा.

शुभ दिनांक : 20, 21

सिंह : जुने येणे वसूल करा

स्वराशीत मंगळ राशांतर, शुक्र-गुरू प्रतियुती होत आहे. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अडचणीतून मार्ग काढून काम करावे लागेल. अहंकाराची वृत्ती ठेवल्यास अधिक समस्या निर्माण होतील. जुने येणे वसूल करा. सहकारी वर्ग मदत करेल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाढेल.

शुभ दिनांक : 18, 22

कन्या : रागावर नियंत्रण ठेवा

कन्येच्या व्ययेशात मंगळ राशांतर, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. रागावर नियंत्रण ठेवा. गोड बोलून कामे करून घ्या. अपरिचिताबरोबर सलगीने वागू नका. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. मैत्रीत गैरसमज होईल. स्पर्धेत नावलौकिक वाढेल.

शुभ दिनांक : 18, 20

तूळ : चांगली घटना घडेल

तुळेच्या एकादशात मंगळ राशांतर, शुक्र-गुरू प्रतियुती होत आहे. किचकट कामे वेळीच पूर्ण करा. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास देणारा आहे. उद्योगधंद्याला नवी दिशा मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. लोकसंग्रह, लोकप्रियता यात भर पडणारी चांगली घटना घडेल.

शुभ दिनांक : 20, 21

 

वृश्चिक : प्रकृतीत सुधारणा

वृश्चिकेच्या दशमेशात मंगळ राशांतर, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या  क्षेत्रातील महत्त्वाची कामे मंगळवारपासून मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. शब्द जपून वापरा. नोकरीत वरिष्ठ कामाची स्तुती करतील. प्रकृतीत सुधारणा होईल.

शुभ दिनांक : 21, 22

धनु : चौफेर सावध राहा

धनूच्या भाग्येशात मंगळ राशांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवल्यास तुमची कामे होतील. गर्वाच्या भाषेत बोलणे टाळा. नवे काम मिळविता येईल. चौफेर सावध राहा. कोणतीही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात होऊ द्या. जिद्द ठेवा.

शुभ दिनांक : 18, 19

मकर : खंबीर निर्णय घ्या

मकरेच्या अष्टमेशात मंगळ राशांतर होत आहे. सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. टीकात्मक भाष्य तुमच्या विरोधात झाल्याने तुमचा राग वाढेल. मैत्रीत वाद होईल. खर्च होईल. भावनेच्या आहारी न जाता खंबीर निर्णय घ्या. व्यसन करू नका. पोटाची काळजी घ्या. स्पर्धेत चमकाल.

शुभ दिनांक : 18, 20

कुंभ : कुटुंबात जबाबदारी वाढेल

कुंभेच्या सप्तमेशात  मंगळ राशांतर, शुक्र-चंद्र  षडाष्टक योग होत आहे. उद्योगधंद्यात वाढ होईल. नफा वाढेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुम्हाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतील. विरोधक संधीचा फायदा घेतील. कुटुंबात जबाबदारी वाढेल.

शुभ दिनांक : 18, 20

मीन : मेहनत घ्या

मीनेच्या षष्ठेशात मंगळ राशांतर, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात तणाव होईल. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा. अनाठायी खर्च वाढेल. गोड बोलण्यावर भाळून जाऊ नका. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. पैशांच्या व्यवहारात सावध राहा. मोहाला बळी पडू नका. मेहनत घ्या.

शुभ दिनांक : 20, 21

आपली प्रतिक्रिया द्या