आठवड्याचे भविष्य – रविवार 26 एप्रिल ते शनिवार 2 मे 2020

8031

>> नीलिमा प्रधान
मेष – कार्याला दिशा मिळेल
सूर्य, हर्षल युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. अडचणीत आलेली कामे करून घ्या. व्यवसायातील तणाव कमी होईल. कार्याला नवी दिशा मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. कल्पनाशक्तीचा वापर कराल. लिखाणाला प्रेरणा देणारी घटना घडेल.
शुभ दिनांक : 26, 28

वृषभ – व्यवसायात लाभ होईल
चंद्र, सूर्य युती,चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. नोकरीत चूक करू नका. वरि…ांचा दबाव राहील. व्यवसायात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टिका होईल. प्रति…ा पणास लागेल. परंतु कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 28, 29

मिथुन – वर्चस्व वाढेल
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. व्यवसायात कायदा पाळा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वरि…ांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. गुप्त कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. घटनांची शहानिशा करा.
शुभ दिनांक : 29, 30

कर्क – रागावर ताबा ठेवा
सूर्य, हर्षल युती, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. मनावरील दडपण कमी होईल. नव्या व्यवसायाचा विचार कराल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रति…ा लाभेल. रागावर ताबा ठेवा. कठीण प्रश्नावर मात कराल.
शुभ दिनांक : 26, 30

सिंह – लोकप्रियता लाभेल
सूर्य, हर्षल युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायातील समस्या कमी होतील. नव्या विचाराने वागावे लागेल. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. आर्थिक साहाय्य जमा कराल. कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल.
शुभ दिनांक : 26, 27

कन्या -अतिशयोक्ती त्रासदायक ठरेल
चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो अतिशयोक्ती त्रासदायक ठरेल. अहंकारास दूर ठेवा. व्यवसायात कायदा पाळा. वादाच्या प्रसंगापासून दूर रहा. तुमच्या परोपकारी स्वभावाचा इतरांना फायदा होईल.
शुभ दिनांक : 26, 30

तूळ – कामाचा व्याप वाढेल
सूर्य, हर्षल युती, चंद्र, नेपच्युन केंद्रयोग होत आहे. आठवडयाच्या सुरुवातीला समस्या येतील. नोकरीत वर्चस्वासोबत कामाचा व्यापही वाढेल. व्यवसायात कायद्याचे पालन करा. ऐकावे जनाचे करावे मनाचे हा सल्ला लक्षात ठेवा.
शुभ दिनांक : 29, 01

वृश्चिक – अडचणींवर मात कराल
बुध, हर्षल युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात अडचणींवर मात करावी लागेल. कुटुंबात वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. इतरांना मदत करण्यात वेळ जाईल. कलेमध्ये मन रमवाल.
शुभ दिनांक : 26, 30

धनु – विचारांची दिशा बदला
सूर्य, हर्षल युती, सूर्य, चंद्र, लाभयोग होत आहे. साडेसाती सुरु आहे. व्यापक दृष्टिकोनातून केलेला विचार सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी ठरेल. त्यानुसार स्वत:त बदल करा. व्यवसायात गोड बोलणाऱया लोकांपासून सावध रहा. नोकरीत काम वाढेल.
शुभ दिनांक : 28, 2

मकर – जबाबदारीचे भान राखा
चंद्र, गुरु प्रतियुती राश्यांतर, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरु आहे. व्यवसायात कोणता बदल करता येईल याचा विचार करा. कुटूंबात एकजूट ठेवणे महत्त्वाचे ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारीने वागावे लागेल. क्षुल्लक कारणाने तुमच्यावर टिका होईल.
शुभ दिनांक : 26, 30

कुंभ – मनोबल राखा
सूर्य, चंद्र, लाभयोग बुध, हर्षल युती होत आहे. साडेसाती सुरु आहे. जेवढा व्याप तेवढा संताप वाढेल हे लक्षात असू द्या. कुटुंबात वरि…ांचा सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा विचार प्रभावी ठरेल. अध्यात्मिक शक्तीचा अनुभव घ्याल.
शुभ दिनांक : 28, 29

मीन – अधिकारांचा वापर करा
सूर्य, हर्षल युती चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात गती मिळेल. नाकारीत कामात वर्चस्व राहील. कुटुंबात तुमचा आधार वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य कराल. अधिकारांचा वापर गरजूंच्या मदतीसाठी करा. आर्थिक साहाय्य मिळवता येईल.
शुभ दिनांक : 26, 27

आपली प्रतिक्रिया द्या