आठवड्याचे भविष्य – रविवार 10 ते शनिवार 16 मे 2020

10705

>> नीलिमा प्रधान

मेष – ग्रहांची उत्तम साथ
मेषेच्या धनेशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरु त्रिकोणयोग होत आहे. ग्रहांची उत्तम साथ असताना योग्य प्रयत्न यशस्वी होतात. तुमचे वर्चस्व वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात ठरवलेले काम करून दाखवाल. लोकप्रियता वाढेल. नव्या पद्धतीने काम करण्याचा विचार करा.
शुभ दिनांक : 10, 14

वृषभ – अहंकार दूर ठेवा
स्वराशीत सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरु युती होत आहे. अतिशयोक्ती आणि अहंकार दूर ठेवा. व्यवसायात तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप सहन करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरि…ांचा सल्ला घ्या. कुटुंबात नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.
शुभ दिनांक : 14, 15

मिथुन – मतभेद होतील
मिथुनच्या द्वादशेत सूर्य राश्यांतर, बुध मंगळ केंद्रयोग होत आहे. चुकांकडे दुर्लक्ष नको. गुप्त कारवायांचा त्रास होईल. प्रत्येक ठिकाणी कायदा पाळा. सामाजिक व राजकीय मतभेद होतील. न पटणारे काम इतरांच्या सांगण्यावरून करू नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
शुभ दिनांक : 10, 11

कर्क – जनहिताचा विचार करा
कर्केच्या एकादशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरु त्रिकोणयोग होत आहे. किरकोळ अडचणी येतील. संयम बाळगा. व्यवसायात नवे धोरण पाळल्यास पुढे जाल. वादाचे प्रसंग येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जनहिताचा विचार करून उत्तम योजना राबवा. कामाचा व्याप वाढेल.
शुभ दिनांक : 13, 14

सिंह – क्रोधाला आवर घाला
सिंहेच्या दशमेशात सूर्य राश्यांतर, सूर्य नेपच्यून लाभयोग. राजकीय-सामाजिक वर्चस्व वाढेल. विरोधक चूक शोधण्याचा प्रयत्न करतील परंतु क्रोध आवरून परिस्थिती हाताळा. प्रवासात सावध राहा. कोणतेही काम करताना घाई नको. कलाक्षेत्रात मन रमेल.
शुभ दिनांक : 10, 11

कन्या – तणाव दूर होतील
कन्या राशीच्या भाग्येषात सूर्य राश्यांतर बुध-गुरु त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात आरोप होतील. सहनशीलता बाळगा. बुद्धिचातुर्याने परिस्थिती हाताळा. व्यवसायात सुधारणा होईल. कुटुंबातील तणाव दूर करता येतील. कला-साहित्यात नावीन्य आणाल.
शुभ दिनांक : 10, 14

तूळ – निर्णयात सावधगिरी बाळगा
तुळेच्या अष्टमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र मंगळ लाभयोग होत आहे. महत्त्वाच्या विषयावर चिंतन कराल. व्यवसायातील समस्या संयमाने सोडवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योग्य निर्णय घ्या. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. कुटुंबात सावध राहा.
शुभ दिनांक : 10, 11

वृश्चिक – सकारात्मक काळ
वृश्चिकेच्या सप्तमेशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरु त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात नवा विचार कराल. ओळखीतून काम वाढवता येईल. संमिश्र वातावरण राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. उत्साह वाढेल. कठीण कामात यश मिळेल.
शुभ दिनांक : 14, 15

धनु – कुठेही अतिशयोक्ती नको
धनुच्या ष…sशात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरु युती होत आहे. साडेसाती सुरु आहे. क्षेत्र कोणतेही असो कुठेही अतिशयोक्ती नको. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात उतावळेपणा न करत निर्णय घ्या. शारीरिक-मानसिक दडपण येईल.
शुभ दिनांक : 10, 11

मकर – प्रगतीची संधी मिळेल
मकरेच्या पंचमेशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरु त्रिकोणयोग होत आहे. प्रतिक्रिया सावधपणे द्या. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. कठीण प्रसंगावर मात कराल. सुखद समाचार मिळतील. मुलांचे मोलाचे सहकार्य लाभेल. कलासाहित्यात नवनिर्मिती कराल.
शुभ दिनांक : 14, 15

कुंभ – व्यवसायात गैरसमज होतील
कुंभेच्या सुखेशात सूर्य राश्यांतर, सूर्य नेपच्यून लाभयोग होत आहे. साडेसातीचे पर्व सुरू आहे. व्यवसायात गैरसमज होतील. भागीदार नाराज होण्याची शक्यता. संयमाने प्रश्न सोडवा. अहंकाराची भाषा, स्पष्टवत्तेपणा यामुळे वाद ओढवून घ्याल. कुटुंबात मतभेद होतील.
शुभ दिनांक : 10, 11

मीन – महत्त्वाची भूमिका पार पाडाल
मीनेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, बुध-गुरु त्रिकोणयोग होत आहे. क्रोधापेक्षा चातुर्याची भाषा वापरणे योग्य ठरेल. व्यवसाय-नोकरीत प्रगती होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडाल. विचारांना चालना मिळेल.
शुभ दिनांक : 10, 12

आपली प्रतिक्रिया द्या