आठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 ऑक्टोबर 2020

>> नीलिमा प्रधान

मेष – मुद्दा डावलला जाईल
मेषेच्या सप्तमेशात सूर्य राश्यांतर, गुरू-नेपच्यून लाभयोग होत आहे. यशासाठी संघर्ष करावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा डावलला जाऊ शकतो. नोकरीत एक पाऊल मागेच रहा. कुटुंबात वरिष्ठांचा मान ठेवा. शिक्षणात अडचणी येतील, पण चिकाटी सोडू नका.
शुभ दिनांक ः 13, 14

वृषभ – प्रगतीचा मार्ग लाभेल
वृषभेच्या षष्ठsशात सूर्य राश्यांतर, चंद्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. कामे रेंगाळत ठेवू नका. नवीन परिचय होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात आळस दूर ठेवा. प्रगतीचा मार्ग मिळेल. वेळेला महत्त्व द्या.
शुभ दिनांक ः 11, 12

मिथुन – महत्त्वाचा निर्णय घ्याल
मिथुनच्या पंचमेशात सूर्य राश्यांतर, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात जम बसेल. नोकरीत वर्चस्व सिद्ध कराल. समस्या कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्याल. किचकट प्रश्न मार्गी लावाल. आलेल्या संधीचा योग्य वापर करा.
शुभ दिनांक ः 11, 13

कर्क – नवीन परिचयाचा उपयोग होईल
कर्केच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात सुधारणा होईल. वाद कमी होऊन नवे काम मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे काम करून दाखवाल. तुमच्या क्षेत्रात नवीन परिचयाचा उपयोग करून घेता येईल.
शुभ दिनांक ः 13, 14

सिंह – कार्याला गती मिळेल
सिंहेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. क्षुल्लक तणाव होतील. कार्याला गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात रेंगाळत राहिलेला प्रश्न मार्गी लावाल. नोकरी, व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबातील तणाव कमी होतील. कलासाहित्यात प्रगती होईल. शुभ दिनांक ः 13, 17

कन्या – शिक्षणात दुर्लक्ष नको
कन्येच्या धनेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. व्यवसायात कोणालाही दुखवू नका. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मैत्री करताना सावध रहा. कुटुंबात जबाबदारी वाढेल. वाटाघाटीत गैरसमज होतील. शिक्षणात दुर्लक्ष नको. कला-साहित्यात चालना मिळेल.
शुभ दिनांक ः 11, 17

तूळ – गुंतवणुकीत सावध रहा
स्वराशीत सूर्य राश्यांतर, गुरू-नेपच्यून लाभयोग होत आहे. घटस्थापनेपासून कामाला गती मिळेल. व्यवसायात सुधारणा करा. गुंतवणूक करताना सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना पुढे नेता येईल. प्रसिद्धी लाभेल, अधिकार प्राप्ती होईल. कला, साहित्याला चालना मिळेल.
शुभ दिनांक ः 11, 13

वृश्चिक – वक्तव्य करताना सावध रहा
वृश्चिकेच्या व्ययेशात सूर्य राश्यांतर, गुरू-नेपच्यून लाभयोग होत आहे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घ्या. नोकरीत प्रभाव वाढेल. व्यावसायिक चर्चा होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मात्र कोणतेही वक्तव्य करताना सावध रहा.

धनु – वादाला महत्त्व नको
धनु राशीच्या एकादशात सूर्य राश्यांतर, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. किरकोळ वादाला जास्त महत्त्व देऊ नका. तुमच्या क्षेत्रात प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची थोडी पीछेहाट झाली असली तरी आता संधी मिळेल. व्यवसायात प्रगती होईल.
शुभ दिनांक ः 13, 17शेअर्समध्ये फायदा होईल. शुभ दिनांक ः 11, 12

मकर – खर्चावर आळा घाला
मकरेच्या दशमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समोरच्या पक्षावर तुमचा दबाव राहील. विरोधकांना शह देणं थोडं जड जाईल. व्यवसायात तडजोड करावी लागेल. खर्चावर आळा घाला. कला, साहित्यात चमकाल.
शुभ दिनांक ः 11, 12

कुंभ – मनोबल राखा
कुंभेच्या भाग्येशात सूर्य राश्यांतर, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. समस्या सोडवताना तारेवरची कसरत होईल. मनोबल राखा. नोकरीत व्याप सांभाळावे लागतील. कुटुंबात क्षुल्लक वाद होतील. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात अडचणींतून मार्ग काढा. शुभ दिनांक ः 13, 17

मीन – महत्त्वाची कामे उरकून घ्या
मीनेच्या अष्टमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. या आठवडय़ात महत्त्वाची कामे करा. व्यवसायातील वाद टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून मत व्यक्त करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामे रेंगाळत ठेवू नका. कला, साहित्य क्षेत्रात संमिश्र अनुभव येतील.
शुभ दिनांक ः 11, 12

आपली प्रतिक्रिया द्या