आठवड्याचे भविष्य – रविवार 9 ते शनिवार 15 डिसेंबर 2018

95

>> नीलिमा प्रधान

मेष- नोकरीत टिकून रहा
चंद्र-मंगळ लाभयोग, चंद्र-शनि युती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अडचणीदूर करून तुमचे मुद्दे प्रभावी करण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास, मनोधैर्य महत्त्वाचे ठरेल. कुटुंबात वयस्कर व्यक्तीची चिंता वाटेल. नोकरीत टिकून रहा. व्यवसायात परिस्थिती बदलण्याची जिद्द ठेवा.
शुभ दि. 11, 13

वृषभ – कुटुंबात, मैत्रीत तणाव
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-गुरू केंद्रयोग होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबात, मैत्रीत तणाव होईल. व्यवसायात काम मिळविण्याच्या मागे लागा. योग्य व्यक्तीच्या सहाय्याने योजना पूर्ण करा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
शुभ दि. 11, 12

मिथुन – सावध रहा
चंद्र-मंगळ लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, परिस्थितीचा नीट अभ्यास करा. निर्णय घेता येईल. बुद्धिचातुर्य वापरा. मंगळवार, बुधवार तणाव सहन करावा लागेल. व्यवसायात गैरसमज निर्माण होतील. तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा.
शुभ दि. 9, 10

कर्क – स्वभाव चिडचिडा होईल
चंद्र-गुरू लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. व्यवसायात वादाचा प्रसंग येईल. एखाद्या बाबतीत तडजोड करण्याची वेळ येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची भेट घेऊन महत्त्वाचा निर्णय घ्या. तारेवरची कसरत सर्वच ठिकाणी करावी लागल्याने स्वभाव चिडचिडा होईल.
शुभ दि. 11, 12

सिंह- मित्रांसाठी धावपळ कराल
चंद्र-मंगळ लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. समस्या किंवा वाद हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतल्यास प्रगती करता येईल. व्यवसायात सुधारणा करा. गोड बोलून काम करून घ्या. आप्तेष्ट, मित्रांसाठी धावपळ कराल. नोकरीत काम वाढेल.
शुभ दि. 9, 13

कन्या- कलाटणी देणारी घटना
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करा. व्यवसायात मोठी उलाढाल करता येईल. परदेशात व्यवसाय वाढवू शकाल. गुरुवार-शुक्रवार वादाचा प्रसंग येईल. नोकरीत बदल होईल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल.
शुभ दि. 11, 12

तूळ- मानसन्मान वाढेल
चंद्र-गुरू लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. ठरवलेल्या कामाला गती मिळेल. दौऱयात, लोकांना भेटण्यात यश मिळेल. मानसन्मान वाढेल. कामांची गर्दी होईल. नवीन परिचय होईल. कुटुंबात सुखद वातावरण राहींल. ग्रहांची साथ असताना प्रयत्नांचा वेग नेहमी वाढवावा लागतो.
शुभ दि. 9, 10

वृश्चिक- मनोधैर्यच उपयुक्त ठरेल
बुध-हर्षल षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होईल. स्पष्ट बोलणे नेहमीच जाचक वाटते. कौटुंबिक समस्येत तुमचे योग्य मत मांडल्यास इतरांच्या मनात चलबिचल होईल. योजना पूर्ण करण्याचा ध्यास ठेवा. भिडस्तपणा ठेवू नका. मनोधैर्यच उपयुक्त ठरेल. नोकरीत कायदा पाळा.
शुभ दि. 11, 13

धनु – दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल
चंद्र-मंगळ लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. अनेक कामे डोळय़ांसमोर असतील. दुसऱयांवर अवलंबून राहावे लागेल. कायद्याच्या चौकटीत राहून सावधपणे कागदपत्रे सांभाळा. मानसिक शक्ती राहील. कोर्ट-केससंबंधित कामे विचारपूर्वक करा. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवाल.
शुभ दि. 11, 13

मकर- शुभ घटना घडेल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. मंगळवारपासून तुमच्या कार्याला अधिक वेग येईल. व्यवसायात दूरदृष्टिकोनातून मोठे कंत्राट मिळवा. भागीदार गुंतवणुकीसाठी तयार होतील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. शेअर्सचे अंदाज बरोबर येतील. शुभ घटना घडेल.
शुभ दि. 13,14

कुंभ – कोर्ट केस संपेल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. विचारांना चालना देणारी घटना घडेल. त्यामुळे हाती घेतलेल्या कामाला योग्य दिशेने पुढे नेता येईल. लोकप्रियतेत वाढ करता येईल. घर, जमीन खरेदी करू शकाल. कोर्ट केस संपेल. फायदेशीर योजना हाती घेता येईल. व्यवसायातील अडचणी सुटतील.
शुभ दि. 9, 10

मीन – वाद वाढवू नका
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. आठवडय़ाच्या शेवटी धंद्यात, मैत्रीत, घरात किरकोळ तणाव होईल. वाद जास्त वाढवू नका. उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. सहनशीलता ठेवल्यास तुमच्या प्रयत्नांना यश येईल. प्रवासात घाई करू नका. दुखापत संभवते.
शुभ दि. 11, 12

आपली प्रतिक्रिया द्या