आठवड्याचे भविष्य- 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2019

>> नीलिमा प्रधान

मेष – योजना कार्यान्वित करा
चंद्र-बुध प्रतियुती, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. प्रत्येक प्रश्नावर चांगल्या प्रकारे उत्तर शोधता येईल. राजकीय क्षेत्रात कार्याला महत्त्व द्या. नवीन योजनांच्या मागे लागा. सामाजिक लोकप्रियता टिकवणे सोपे नाही. व्यवसायात जास्त मोह न ठेवता व्यवहार करा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल.
शुभ दिनांक – 17, 18.

वृषभ – यश संपादन कराल
बुध-नेपच्यून युती, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. प्रगती करण्याची कोणतीही संधी सोडू नका. राजकीय क्षेत्रात मिळालेले अधिकार चांगल्या कामासाठी वापरा. सामाजिक क्षेत्रात समस्या समजून घ्या. या आठवडय़ात सर्वच ठिकाणी यश संपादन करता येईल.
शुभ दिनांक – 18, 19.

मिथुन – सावध भूमिका घ्या
सूर्य-चंद्र षडाष्टक योग, शुक्र-शनी युती होत आहे. राजकीय क्षेत्रात सावध भूमिका घ्या. तुमच्यावर जबाबदारी टाकून वरिष्ठ तुमची परीक्षा घेतील. सामाजिक कार्यात जवळचे लोक तुमचा विश्वासघात करतील. गुप्त कारवायांचा अभ्यास करा. कुटुंबात तणाव होईल. तुमचे मनोबल मात्र टिकून राहील.
शुभ दिनांक – 19, 20.

कर्क – वर्चस्व सिद्ध कराल
सूर्य-हर्षल लाभयोग, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी बुद्धिचातुर्य राजकारणात वापरता येईल. जवळचे लोक उत्तम सहकार्य करतील. कुटुंबातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करू शकाल. कलाक्षेत्रांत नव्याने वर्चस्व सिद्ध करू शकाल. स्वतःची मर्यादा तपासा.
शुभ दिनांक – 20, 21.

सिंह – संयम राखा
सूर्य-चंद्र षडाष्टक योग, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत घाईगर्दीत कोणतेच निर्णय निश्चित करू नका. मत व्यक्त करण्यात उतावळेपणा नको. प्रश्न सोडवताना प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य ठरणार नाही. प्रवासात सावध राहा. कुटुंबात मतभेद होऊ शकतो. प्रसंगावधान ठेवा. शुभ दिनांक – 17, 18.

कन्या – लोकप्रियता वाढेल
बुध-नेपच्यून युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाची कामे लवकर उरका. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. राजकारणात वरिष्ठ तुमची जबाबदारी वाढवतील. व्यवसायात जम बसेल. नवी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जमिन, घर यांची खरेदी कराल. शुभ दिनांक – 18, 19.

तूळ – प्रगतीचा मार्ग मिळेल
शुक्र-नेपच्यून लाभयोग, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. व्यवसायात किरकोळ समस्या येईल. शेअर्सचा अंदाज जपून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्री वाढवतील. दर्जेदार लोकांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक प्रश्न सोडवण्यात लोकांचे सहकार्य मिळेल. कामाचा व्याप राहिल.
शुभ दिनांक – 19, 21.

वृश्चिक – तणाव दूर होतील
शुक्र-नेपच्यून लाभयोग, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ वाढेल. राजकीय क्षेत्रातील तणाव व गैरसमज दूर करू शकाल. सर्व काही सोपे आहे असे मात्र समजू नका. सातत्य ठेवा. तत्परता ठेवा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत वर्चस्व दिसेल. प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक – 20, 21.

मकर – रागावर नियंत्रण ठेवा
सूर्य-हर्षल लाभयोग, शुक्र-शनी युती होत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. जवळचे लोक समस्या निर्माण करतील. त्यांची नाराजी होईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल पुढे पडेल. प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक क्षेत्रात लोकांची मते जाणून घ्या. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ दिनांक – 22, 23.

कुंभ – बुद्धिचातुर्याने निर्णय घ्या
शुक्र-नेपच्यून लाभयोग, बुध नेपच्यून युती होत आहे. कठीण प्रसंग गुप्त हितशत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर करतील. तुम्ही आत्मविश्वासाने बुद्धिचातुर्याने त्याचा सामना करू शकाल. राजकारणात महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. सामाजिक प्रश्न जटील करण्याची तयारी विरोधक करतील.
शुभ दिनांक – 20, 23.

मीन – व्यवसायात सावध राहा
चंद्र-प्लुटो प्रतियुती, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तुम्हाला येणाऱया अडचणींचाच विचार करीत राहिल्यास मार्ग शोधता येणार नाही. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा अवमान करण्याचा प्रयत्न होईल. अनुभव व्यक्तीचा सल्ला घ्या. खरेदी-विक्रीत सावध रहा.
शुभ दिनांक – 17, 18.

आपली प्रतिक्रिया द्या