साप्ताहिक भविष्य 30 जून ते 6 जुलै 2019

1198

>> नीलिमा प्रधान

मेष
संधी मोलाची ठरेल
चंद्र-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. तुम्ही केलेली मैत्री जेवढी दृढ असते तसेच शत्रुत्वही निश्चयाचे असते. व्यवसायात दगा, फटका करण्याचा प्रयत्न होईल. सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता व प्रतिष्ठा वाढवता येईल. पुढील संधी तुमच्यासाठी मोलाची ठरेल. प्रगतीचा आलेख तयार होईल.
शुभ दिनांक – 30,1

वृषभ
प्रश्न मार्गी लागतील
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र शुक्र युती होत आहे. प्रत्येकाच्या मनात तुम्ही स्थान निर्माण करू शकाल. रेंगाळत राहिलेला प्रश्न लवकर मार्गी लावा. प्रत्येक दिवस यश देईल. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. वैयक्तिक संबंध वाढतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात हाती दिलेले काम निष्ठsने करून प्रतिष्ठा वाढवा. शुभ दिनांक – 2,3

मिथुन
प्रतिष्ठा वाढेल
चंद्र-शुक्र युती, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. तुमची राहून गेलेली सर्व कामे करा. धंद्यात-नोकरीत चांगला फायदा होईल. समस्या कमी होईल. बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता व प्रतिष्ठा मिळेल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात आत्मविश्वास वाढेल. परिचय प्रेरणादायी ठरेल. शुभ दिनांक – 3,4

कर्क
योग्य निर्णय घ्या
चंद्र-मंगळ युती, चंद्र गुरू त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी तुमचे विचार पटवून देताना नम्रता ठेवा. व्यवसायात संधी मिळेल. व्यक्तीची पारख करून योग्य निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर दबाव राहील. आरोपांना उत्तरे देताना प्रसंगाचे भान ठेवा. स्पर्धा सोपी नाही. शुभ दिनांक – 5,6

सिंह
वर्चस्व वाढेल
चंद्र-नेपच्यून त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. तुमच्या प्रत्येक कार्याला योग्य दिशा देण्यात यश मिळेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. व्यवसायात भागीदाराबरोबर वाद होईल. आर्थिक लाभ होईल.
शुभ दिनांक – 1,2

कन्या
कलाटणी देणारी घटना
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-शुक्र युती होत आहे. व्यवसायात जम बसवा. मागील येणे वसूल करा. गुंतवणुकीत फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नोकरीत बदल करू शकाल. लोकप्रियतेत वाढ होईल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात नवा मार्ग मिळेल. शुभ दिनांक – 1,2

तूळ
अधिकारांचा योग्य वापर
चंद्र-मंगळ युती, चंद्र- शुक्र लाभयोग तुमच्या प्रत्येक कार्याला नवी दिशा देणार आहे. ग्रहांची साथ असताना प्रयत्नांचा वेग वाढवा. नोकरी-व्यवसायात चांगला जम बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिकाराचा वापर योग्य कामासाठी करा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात दर्जेदार कार्य होईल.
शुभ दिनांक – 4,5

वृश्चिक
चुका सुधारण्याचा प्रयत्न करा
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. कोणताही प्रश्न सोडवताना प्रतिष्ठा पणाला लावू नका. समोरच्या व्यक्तीचे मुद्दे राजकीय-सामाजिक क्षेत्रात ऐकून घ्या. नकळत झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात संधी मिळेल. मित्रांपासून सावध रहा. कायदेशीर कामात प्रत्यक्ष लक्ष.
शुभ दिनांक – 1,4

धनु
योजनांना गती द्या!
चंद्र-मंगळ, युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात वादाचे प्रसंग येतील. तुमच्याकडून स्वतःचा फायदा करून घेणारे स्वार्थी लोक तुमच्या एखाद्या निर्णयावर नाराज होतील. मनातून द्वेष करतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात दिग्गज लोकांचे सहाय्य मिळेल. योजनेला गती. प्रवासात घाई नको. शुभ दिनांक – 2,3

मकर
निर्णयात सावधगिरी बाळगा
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. साडेसातीमध्ये माणसाला व्यक्ती ओळखणे कठीण जाते. कोणताही निर्णय निश्चित करताना सावधपणे निर्णय घ्या. व्यवसायात मोठी संधी मिळेल. प्रगतीच्या शिडय़ा चढताना अनेक पायऱया असतात, परंतु पायउतार होण्यास मात्र एकच पायरी पुरेशी असते याचे भान ठेवा.
शुभ दिनांक – 30,1

कुंभ
प्रगतीकारक काळ
ग्रहांची साथ असते तेव्हा विरोधकसुद्धा आपले कौतुक करतात, परंतु ग्रहांची साथ नसल्या उलट स्थिती असते. चंद्र-गुरू त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. प्रत्येक प्रयत्न प्रगतीच्या दिशेने जाईल. व्यवसायात मात्र सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रगतीची संधी सोडू नका.
शुभ दिनांक – 2,3

मीन
ध्येयावर लक्ष द्या!
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. इतरांच्या बरोबर तुलना करण्यापेक्षा हातात असलेले कार्य वेगाने पुढे न्या. यशस्वी व्हाल. नव्या कार्याचे चिंतन करा. व्यवसायात प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सावध रहा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात परिचय हेतील.
शुभ दिनांक – 3,4

आपली प्रतिक्रिया द्या