साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 30 जून ते शनिवार 6 जुलै 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – नवे धोरण कौतुकास्पद

मेषेच्या चतुर्थेशात शुक्र, बुध प्लुटो प्रतियुती. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. मेहनत घ्या. चर्चा करा. नोकरीत बढती, बदल होईल. प्रशंसा होईल. धंद्यात नवे धोरण कौतुकास्पद ठरेल. कर्जाचे करून घ्या. मागील थकबाकी मिळवा. कोणताही किचकट प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. कायदेशीर कामात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.

शुभ दिनांक : 1, 6

वृषभ – रागावर नियंत्रण ठेवा

वृषभेच्या पराक्रमात शुक्र, बुध, नेपच्युन त्रिकोणयोग. रागावर नियंत्रण ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. यश मिळेल. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा नको. नवीन परिचय तपासून पहा. फायदा होईल. धंद्यात जम बसवा. आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने मेहनत घ्या. वरिष्ठांचे, सहकारी वर्गाचे साहाय्य लाभेल.

शुभ दिनांक : 4, 6

मिथुन – महत्त्वाच्या वस्तू जपा

मिथुनेच्या धनेषात शुक्र, बुध हर्षल लाभयोग. चिकाटी ठेवल्यास यश मिळवता येईल. नम्रता, स्मितहास्य ठेवा. नोकरीत प्रभाव वाढेल. भावनेच्या आहारी जाऊन मैत्री करू नका. धंद्यात वाढ. महत्त्वाच्या वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांना मदत करून स्वतचे कामही करून घ्या. तत्परता व तडजोड ठेऊन स्थान टिकवा.

शुभ दिनांक : 30, 1

कर्क – कामात चूक टाळा

स्वराशीत शुक्र, चंद्र, गुरू प्रतियुती. तारतम्य, प्रसंगावधान ठेवल्यास यश मिळेल. नोकरीत नम्रता ठेवा. कामात चूक टाळा. धंद्यात वाद, संघर्ष नको. मोह, नुकसानकारक. नविन ओळख फसवी ठरू शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मत व्यक्त करण्याची घाई नको. अपमान होईल. तटस्थ धोरण ठेवा. कुटुंबात तणाव, गैरसमज होतील.

शुभ दिनांक : 30, 1

सिंह – नावलौकिक मिळेल

सिंहेच्या व्ययेषात शुक्र. सूर्य चंद्र लाभयोग. कठीण, महत्त्वाची कामे करून घ्या. तुमच्या क्षेत्रात जम बसवा. नावलौकिक मिळेल. नोकरीत प्रभाव राहील कौतुक होईल. धंद्यात नवे काम मिळेल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामांची योग्य रचना करून प्रगती करा. दौऱ्यात, भेटीत यश मिळेल. लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत पुढे राहाल.

शुभ दिनांक : 30, 1

कन्या – कामे मार्गी लागतील

कन्येच्या एकदशात शुक्र, सूर्य, चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, चिंता, अस्थिरता जाणवेल. त्यानंतर कामे मार्गी लागतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव राहील. चांगला बदल शक्य. धंद्यात नवे काम हाती घेता येईल. आर्थिक साहाय्य मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील.

शुभ दिनांक : 2, 6

तूळ – निर्णयात सावध रहा

तुळेच्या दशमेषात शुक्र, सूर्य, चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर चुकीचा निर्णय घेऊ नका. रागावर ताबा ठेवा. नोकरीत वर्चस्व ठेवता येईल. कुणालाही कमी लेखू नका. धंद्यात उधारी ठेऊ नका. नविन परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाद, गैरसमज मिटवून नव्याने कामास सुरूवात करता येईल. भलत्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका.

शुभ दिनांक : 30, 1

वृश्चिक – ताणतणाव सांभाळा

वृश्चिकेच्या भाग्येषात शुक्र, बुध, नेपच्यून त्रिकोणयोग. उतावळेपणा, अतिरेक, अहंकार यामुळे मनस्ताप व तणाव निर्माण होईल. दूरदृष्टीकोनातून प्रश्न सोडवा. कुणालाही कमी लेखू नका. नोकरी टिकवा. चूक टाळा. धंद्यात फसगत, नुकसान होऊ शकते. व्यसन, मोहापासून दूर रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. तणावही जाणवेल.

शुभ दिनांक : 23, 29

धनु – समतोल राखा

धनुच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य, चंद्र लाभयोग. कोणताही शब्द कुठेही वापरू नका. गैरसमज, तणाव होईल. नोकरीच्या कामात प्रभाव टिकवता येईल. समतोल राखा. धंद्यात अरेरावी नको. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कठीण महत्त्वाची कामे रेंगाळत ठेऊ नका. वरिष्ठांची भेट घेऊन पेचप्रसंग मार्गी लावा. कौटुंबिक वाटाघाटीत सतर्क रहा.

शुभ दिनांक : 30, 1

मकर – अहंकार दूर ठेवा

मकरेच्या सप्तमेषात शुक्र, बुध नेपच्यून त्रिकोणयोग. संयम, नम्रता ठेवल्यास यश खेचता येईल. प्रवासात सावध रहा. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत तडजोड करावी लागेल. धंद्यात राग, अहंकार नको. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोध, तणाव जाणवेल. प्रतिष्ठा पणाला लावून कोणताही प्रश्न सोडवू नका. व्यवहारात घाई नको.

शुभ दिनांक : 2, 3

कुंभ – बोलण्यात चूक नको

कुंभेच्य षष्ठस्थानात शुक्र, सूर्य, चंद्र लाभयोग. महत्त्वाची , कठीण कामे करून घ्या. बोलण्यात चूक करू नका. नोकरीत प्रभाव, चातुर्य दिसेल. धंद्यात करार, गुंतवणूक करताना विचार करा. घाई नको. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींची भेट घडेल. डावपेच ठरवता येतील. कौटुंबिक     कामे वेळीच करा.

शुभ दिनांक : 30, 1

मीन –प्रसंगानुरूप निर्णय घ्या

मीनेच्या पंचमेषात शुक्र, चंद्र, बुध लाभयोग. क्षुल्लक कारणाने प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करू नका. कामामध्ये सावध रहा. नविन ओळख आकर्षित करेल. नोकरीच्या कामात वरिष्ठांचा सल्ला घ्या. धंद्यात व्यवहार सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे त्वरित स्वीकारले जातील असे गृहित धरू नको. प्रसंगानुरूप निर्णय घ्या. कौटुंबिक खर्च वाढेल.

शुभ दिनांक :  30, 1