साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 7 जुलै ते शनिवार 13 जुलै 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – अनाठायी खर्च होईल

मेषेच्या धनेषात मंगळ, सूर्य, चंद्र लाभयोग. डोळ्यांची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावध रहा. अनाठायी खर्च होतील. नोकरीत धावपळ, क्षुल्लक वाद, पण प्रभाव दिसेल. धंद्यात भागीदारासोबत समजूतदारपणा दाखवावा लागेल. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपसात गैरसमज, नाराजी दिसेल.

शुभ दिनांक : 9, 11

वृषभ – कामाचे कौतुक होईल

शुक्र, नेपच्युन त्रिकोणयोग, स्वराशीत मंगळ. आत्मविश्वास, उत्साह वाढवणाऱया घटना घडतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नव्या बदलाची शक्यता. धंद्यात नवे धोरण स्वीकारावे असे वाटेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शक वाढतील. कार्याला गती मिळेल.

शुभ दिनांक : 12, 13

मिथुन – तणाव दूर होईल

चंद्र, बुध युती, व्ययेषात मंगळ. कोणतीही महत्त्वाची, किचकट कामे करून घ्या. नोकरीतील गैरसमज, तणाव दूर करून टाका. धंद्यात वाढ, लाभ किंवा वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढण्याची शक्यता. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. योजनांचा पाठपुरावा करण्याकडे लक्ष द्या. घरगुती वाटाघाटीत यश मिळेल.

शुभ दिनांक : 7, 9

कर्क – कामात चूक टाळा

बुध, गुरू लाभयोग, कर्केच्या एकादशात मंगळ. परिस्थितीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या. कायदा पाळा. गैरसमज टाळा. यश खेचता येईल. नोकरीत वरिष्ठांना काटशह देऊ नका. नवीन परिचय उत्साह वाढवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतिरेक कोणत्याही बाबतीत करू नका. तटस्थ रहा. तुमच्याबद्दलचे मत दूषित करण्याचा प्रयत्न होईल.

शुभ दिनांक : 11, 12

सिंह – फसगत टाळा

सिंहेच्या दशमात मंगळ, सूर्य, शनि त्रिकोणयोग. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. जवळच्या व्यक्ती विश्वासघात करतील. सावध रहा. नोकरीत वाद टाळा. वरिष्ठांना मदत करावी लागेल. धंद्यात व्यावहारिक चर्चा जपून करा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया लक्षात येतील. योग्य व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल.

शुभ दिनांक : 12, 13

कन्या – नव्याने प्रगती साधाल

कन्येच्या भाग्येषात मंगळ, बुध, गुरू लाभयोग. सर्वत्र प्रभाव राहील. गैरसमज दूर करून नव्याने प्रगती साधता येईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. बढती होईल. तणाव कमी होईल. व्यवसायाला कलाटणी देणारी घटना घडेल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडून वर्चस्व सिद्ध कराल. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवता येईल.

शुभ दिनांक : 7, 13

तूळ – वाद वाढवू नका

तूळेच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य, शनि त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. नोकरीत प्रभाव राहील. प्रवासात सावध रहा. कोणताही वाद वाढवू नका. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ओळखी वाढतील. ज्ञानात भर पाडणारे संवाद होतील. योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. खरेदी-विक्रीत फायदा होईल.

शुभ दिनांक : 7, 9

वृश्चिक – प्रत्येक दिवस प्रेरणादायी

वृश्चिकेच्या सप्तमेषात मंगळ, शुक्र हर्षल लाभयोग. कौटुंबिक जीवनात महत्त्वाची घटना घडेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कोणताही तणाव विकोपाला जाऊ देऊ नका. प्रत्येक दिवस प्र्रेरणादायी ठरवण्याची जिद्द ठेवा. अहंकार नको. तडजोडीची भाषा उपयुक्त ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल.

शुभ दिनांक : 11, 12

धनु – व्यवहारात चूक नको

धनुच्या षष्ठेशात मंगळ, सूर्य, शनि त्रिकोणयोग. खाण्यापिण्याची काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊन व्यवहारात चूक करू नका. नोकरीच्या कामात नीट लक्ष द्या. नवीन परिचय, जवळच्या व्यक्ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपता येईल. मानसिक ताण वाढेल.

शुभ दिनांक : 11, 12

मकर – रागावर ताबा ठेवा

मकरेच्या पंचमेषात मंगळ, शुक्र नेपच्युन त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर रागावर ताबा ठेवा. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना कमी लेखू नका. धंद्यात संधी मिळेल. अधिकार गाजवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही व्यक्ती तुमचा विश्वासघात करतील. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी उघड करून प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील.

शुभ दिनांक : 7, 12

कुंभ – प्रवासात सावध रहा

कुंभेच्या चतुर्थात मंगळ, सूर्य, शनि त्रिकोणयोग. सप्ताहात अडचणी, तणाव यावर मात करून कामे करावी लागतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या बाजूने असले तरी इतर व्यक्ती गैरसमज पसरवतील.

शुभ दिनांक : 9, 10

मीन – अहंकार बाळगू नका

मीनेच्या पराक्रमात मंगळ, बुध, गुरू लाभयोग. तुमच्या हिताचा निर्णय होण्यासाठी बुद्धिचातुर्य वापरा. अहंकार ठेऊ नका. नोकरीत कठीण कामे करावी लागतील. धंद्यात वाढ होईल. नवे परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक त्रास होईल.  दगदग, धावपळ वाढेल. प्रेमाची भाषा महत्त्वाची ठरेल. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य घ्यावे लागेल.

शुभ दिनांक :  7, 12