भविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 फेब्रुवारी 2020

9381

>> नीलिमा प्रधान

मेष – परदेशी जाण्याचा योग
स्वराशीत शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. या आठवडय़ात जवळच्या लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी धावपळ होईल. व्यवसायात – नोकरीत धाडसी निर्णय घेऊन प्रगतीकडे जाता येईल. कंपनीद्वारे परदेशात जाण्याचा योग येईल. खरेदी-विक्री करता येईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रांत पुरस्कार लाभतील. शुभ दिनांक ः 24, 29

वृषभ – धाडसी निर्णय घ्याल
वृषभेच्या व्ययेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. आठवडय़ाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करा. व्यवसायात मोठे काम मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी पूर्ण कराल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत स्पष्ट, सडेतोड बोलणे विरोधकांना झोंबणारे असेल. शुभ दिनांक ः 24, 25

मिथुन – चौफेर प्रगती कराल
मिथुनेच्या एकादशात शुक्र राश्यांतर, बुध-मंगळ लाभयोग होत आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात वेगाने चौफेर प्रगती कराल. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. व्यवसायात फायद्याचे कंत्राट मिळेल. नोकरीत वर्चस्व सिद्ध होईल. कामाचे कौतुक होईल. लोकप्रियता मिळेल.कलाक्षेत्रांत चमचमते यश मिळेल. शुभ दिनांक ः 24, 26

कर्क – संयमाने प्रश्न सोडवा
कर्केच्या दशमेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-शनी लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला व्यवसाय, नोकरीत तणाव होईल. संयमाने प्रश्न सोडवा. कर्जाच्या बाबतीत गुंता वाढेल. कामगार त्रस्त करतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत लगेच प्रतिक्रिया व्यक्त करू नका. कडवट बोलणे कलह निर्माण करील. शुभ दिनांक ः 26, 27

सिंह – तुमचा प्रभाव वाढेल
सिंहेच्या भाग्येशात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, निर्णयाचे बुद्धिचातुर्य सर्वच ठिकाणी प्रभावी ठरेल. धंद्यात जम बसवा. भविष्यासाठी गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील कारवाया ओळखाल. यशाच्या वाटेवरील माणूस उत्साही असतो. शुभ दिनांक ः28,29

कन्या – तारेवरची कसरत
कन्येच्या अष्टमेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-हर्षल युती होत आहे. कसोटीचा आठवडा आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल. सहनशीलता ठेवा. कौटुंबिक चिंता वाढेल. धावपळ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तटस्थ रहा. दुसऱयाच्या काठीने साप मारण्याची राजनीती लक्षात ठेवा. शुभ दिनांक ः 26, 27

तूळ – नवी संधी मिळेल
तुळेच्या सप्तमेशात शुक्र राश्यांतर, बुध-मंगळ लाभयोग होत आहे. रेंगाळत राहिलेले काम करा. घरातील समस्या कमी होईल. व्यवसायात नवी संधी मिळेल. नोकरीत कठीण प्रश्न मार्गी लावा. राजकीय-सामाजिक कार्याला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत योग्य मार्गदर्शन मिळेल. शुभ दिनांक ः 28, 29

वृश्चिक – कामांचा प्राधान्यक्रम ठरवा
वृश्चिकेच्या षष्ठsशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या. व्यवसाय-नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. इतरांनी केलेल्या चुका सुधाराव्या लागतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवाया वाढतील. जवळचे लोक फितूर होतील. तुमची स्पर्धा वाढेल. शुभ दिनांक ः 26, 27

धनु – लोकप्रियता वाढेल
धनुच्या पंचमेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-बुध युती होत आहे. तुम्ही असाल त्या क्षेत्रात वेगाने प्रगती कराल. व्यवसाय-नोकरी या ठिकाणी मोलाची संधी मिळेल. थोरामोठय़ांच्या परिचयाचा फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका निभावून न्याल. लोकप्रियतेत भर पडेल. वाद मिटेल. शुभ दिनांक ः 24, 29

मकर – रागावर नियंत्रण ठेवा
मकरेच्या सुखस्थानात शुक्र प्रवेश, सूर्य-बुध युती होत आहे. न होणारे काम करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवल्यास बरीच समस्या कमी होईल. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रत्येक थरावर कार्य करा. लोकांचा विश्वास संपादन करू शकाल. इतरांच्या सांगण्यावरून तुमचे मन बदलू नका. शुभ दिनांक ः 24, 25

कुंभ – कार्याला दिशा मिळेल
कुंभेच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, सूर्य-मंगळ लाभयोग होत आहे. खंबीरपणे मोठा निर्णय घेता येईल. तुमच्या कार्याला दिशा द्या. साडेसाती सुरू आहे. त्यामुळे आता जी प्रगतीची संधी मिळेल ती घ्या. जिद्दीने पुढे जा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत दिग्गज लोकांचा सहवास मिळेल. स्पर्धेत तुम्ही उज्ज्वल यश मिळवाल. शुभ दिनांक ः 26, 27

मीन – प्रसिद्धीपासून दूर रहा
मीनेच्या धनेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. क्षुल्लक अडचणींचा मोठा बाऊ करता संयमाने वागा, बोला. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रसिद्धीचा हव्यास न धरता राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कार्य करा. वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका. बुद्धिमत्तेचा उपयोग करा. शुभ दिनांक – 28, 29

आपली प्रतिक्रिया द्या