साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 ते शनिवार 18 मे 2019

>> नीलिमा प्रधान

मेष
धाडसी निर्णय घ्यावा
मेषेच्या धनेशात सूर्य, बुध राश्यांतर आणि शुक्र-मंगळ लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सहकारी, नेते मदत करतील. एखादा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. नवे कंत्राट मिळेल. कंपनीद्वारा परदेशवारी होईल.
शुभ दिनांक ः 13, 17

वृषभ
अधिकारप्राप्तीचा योग
स्वराशीत सूर्य, बुध राश्यांतर आणि चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोपांना उत्तर देता येईल. अधिकारप्राप्तीचा योग येईल. जवळचे लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. बजेटमध्ये बसेल असाच धंदा करा. जीवनसाथीची मर्जी राखा. खरेदी-विक्रीत फायदा होईल.
शुभ दिनांक ः 14, 15

मिथुन
कामाचा व्याप वाढेल
मिथुनेच्या व्ययेषात सूर्य, बुधाचे राश्यांतर आणि शुक्र-मंगळ लाभयोग होत आहे. उद्योग-धंद्यात महत्त्वाचे काम याच आठवडय़ात करण्याचा प्रयत्न करा. कायद्याचे पालन करा. वरिष्ठांचा दबाव राहील. प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वक्तव्य करताना सावध रहा.
शुभ दिनांक ः 12, 13

कर्क
रागावर नियंत्रण ठेवा
कर्केच्या एकादशात सूर्य, बुधाचे राश्यांतर फायदेशीर ठरेल. चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. उद्योग-धंद्यातील समस्या सोडवा. कामगारांच्या अटी मान्य कराव्या लागण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधक तहाची भाषा करतील. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल.
शुभ दिनांक ः 14, 15

सिंह
नव्या विषयाची प्रेरणा
सिंह राशीच्या दशमेशात सूर्य, बुध राश्यांतर आणि शुक्र-मंगळ लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला उत्साह आणि आत्मविश्वास देणारा असेल. क्षुल्लक तणाव जास्त वाढू देऊ नका. व्यवसायात फायदा होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. साहित्यात नव्या विषयाची प्रेरणा मिळेल.
शुभ दिनांक ः 16, 17

कन्या
व्यसनाने नुकसान होईल
कन्या राशीच्या भाग्येशात सूर्य, बुधाचे राश्यांतर होत आहे. तुमच्या महत्त्वाच्या कामात सप्ताहअखेरीस शुभ समाचार मिळेल. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. कुटुंबात तणाव व समस्या होईल. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहा. मैत्रीमध्ये वैर उत्पन्न होऊ शकते. व्यसनाने नुकसान होईल.
शुभ दिनांक ः 17, 18

तूळ
प्रेरणादायी घटना
तुळेच्या अष्टमेशात सूर्य, बुधाचे राश्यांतर आणि चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. व्यवसायात काम वाढेल, परंतु छोटय़ा समस्या येतील. कामगारांची कमतरता भासू शकते. कामासंबंधी चर्चा होईल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. नोकरीत कायद्यानुसार निर्णय घ्या. प्रेरणादायी घटना घडेल.
शुभ दिनांक ः 12, 13

वृश्चिक
कोर्टकामात सावधान
वृश्चिकेच्या सप्तमेशात सूर्य, बुधाचे राश्यांतर आणि सूर्य-गुरू त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायातील चिंता कमी होईल. जुने लोकदेखील कामे देण्यास तयार होतील. पुन्हा भेट घ्या. गुप्त कारवाया होतील. कोर्टाच्या कामात सावधानी बाळगा. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक ः 15, 16

धनु
महत्त्वाची कामे उरका
धनुच्या षष्ठेशात सूर्य, बुधाचे राश्यांतर आणि शुक्र-मंगळ लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, याच आठवडय़ात महत्त्वाची कामे उरका. समस्या वाढू शकतात. आरोप, टीका यांचा मारा होऊ शकतो. वाहनापासून त्रास संभवतो. तुमचा शिथिलपणा आम्हाला त्रासदायक ठरेल असा आरोप कुटुंबात होईल. शुभ दिनांक ः 12, 13

मकर
कल्पनेला चालना
मकरेच्या पंचमेशात सूर्य, बुधाचे राश्यांतर आणि चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या प्रारंभी अडचणी येतील. नंतर मात्र कार्याला गती मिळेल. व्यवसायात मनाप्रमाणे बदल, सुधारणा करता येतील. प्रतिष्ठा व पदाधिकार वरिष्ठांकडून मिळेल. कुटुंबात क्षुल्लक गैरसमज होऊ शकतो. विचारांना व कल्पनेला चालना मिळेल.
शुभ दिनांक ः 16, 17

कुंभ
तडजोडीची वेळ येईल
कुंभ राशीच्या सुखेशात सूर्य, बुधाचे राश्यांतर आणि शुक्र-मंगळ लाभयोग होत आहे. व्यवसायात भागीदाराशी तसेच गिऱहाईकाबरोबर मतभेद होऊ शकतो. बुधवार-गुरुवार तडजोड करण्याची वेळ येईल. वरिष्ठांचा दबाव राहील. मुद्दे पटवून देणे सोपे असले तरी समोरच्या व्यक्तीला ते मान्य होणे कठीण असेल. शुभ दिनांक ः 12, 13

मीन
गुप्त शत्रूंचे कटकारस्थान
मीनेच्या पराक्रमात सूर्य, बुधाचे राश्यांतर प्रगतिकारक ठरेल. चंद्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. नव्या अडचणेंना तोंड द्यावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा, वाटाघाटी करताना तटस्थ भूमिका घ्यावी. गुप्तशत्रूचे कटकारस्थान होईल, मात्र तुमच्या प्रगतीवर परिणाम होणार नाही.
शुभ दिनांक ः 15, 16