आठवड्याचे भविष्य : रविवार 23 ते शनिवार 29 जून 2019

229

>> नीलिमा प्रधान

मेष
प्रगतीची संधी मिळेल
मेष राशीच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. नोकरी, उद्योगधंद्यात प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्या पद्धतीने वर्चस्व तयार करा. जनहिताचा प्रश्न हाती घेऊन सोडवा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी होतील. प्रगतीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – 23, 24

वृषभ
जम बसेल
वृषभेच्या धनेषात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरु त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या आरंभापासून महत्त्वाची कामे सर्वच क्षेत्रात करा. व्यवसायात चांगला जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळाल्याने उत्साह वाढेल. किचकट प्रश्न मार्गी लावा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात पुरस्कार मिळेल.
शुभ दिनांक – 24, 25

मिथुन
लोकप्रियता वाढेल
स्वराशीत शुक्र राश्यांतर, सूर्य-हर्षल लाभयोग होत आहे. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. मिळालेले अधिकार चांगल्या कार्यासाठी वापरा. व्यवसायात वाढ होईल. नवे संबंध तयार होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. चित्रपट, क्रीडा क्षेत्रात लोकप्रियता जास्त मिळेल.
शुभ दिनांक – 28, 29

कर्क
सहनशीलता बाळगा
कर्केच्या व्ययेषात शुक्र प्रवेश, चंद्र-गुरु त्रिकोणयोग होत आहे. कसोटीचा आठवडा आहे. नम्रता व सहनशीलता प्रत्येक ठिकाणी ठेवा. प्रश्न सोडवता येईल. व्यवसाय, नोकरीत समस्या येतील. राजकीय क्षेत्रात अरेरावी करण्यापेक्षा चुका सुधारून चांगले कार्य करा. वादात प्रतिष्ठा पणास लावू नका.
शुभ दिनांक – 25, 26

सिंह
परदेशगमनाची संधी
सिंहेच्या एकादशात शुक्र राश्यांतर, चंद्र-शनि लाभयोग होत आहे. याच आठवडय़ात महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. जमीन, व्यवसाय यातील तणाव दूर करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वक्तव्य करताना सावध राहा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी वाढेल. परदेशात जाण्याचा योग येईल.
शुभ दिनांक – 24, 27

कन्या
मन अस्थिर होईल
कन्येच्या दशमेषात शुक्र राश्यांतर चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. ग्रहांची साथ असली तरी मन अस्थिर होईल. परिणामांचा त्रासदायक होईल. व्यवसायात प्रगतीचा मार्ग मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. किचकट प्रश्न लवकर मार्गी लावा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात भव्य दिशेने वाटचाल होईल. शुभ दिनांक – 25, 26

तूळ
खरेदी व्यवहारात लाभ
तुळेच्या भाग्येषात शुक्र राश्यांतर, सूर्य-हर्षल लाभयोग होत आहे. तुमच्या प्रयत्नाला भव्यदिव्य यश येईल. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळाल्याने उत्साह वाढेल. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. नोकरीत बदल करा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात चमकाल.
शुभ दिनांक – 28, 29

वृश्चिक
कामे मार्गी लागतील
वृश्चिकेच्या अष्टमेषात शुक्र प्रवेश, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. आर्थिक उलाढालीत फायदा होईल. व्यवसायात रेंगाळलेले काम मार्गी लागेल. नोकरीत दबाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. कोर्ट केस सोपी नाही. बेसावध राहू नका.
शुभ दिनांक – 25, 26

धनु
सावध भूमिका हवी
धनुच्या सप्तमेषात शुक्र राश्यांतर, सूर्य-हर्षल लाभयोग होत आहे. कुटुंबातील ताणतणाव वाढू देऊ नका. आठवडय़ाच्या शेवटी त्याला कलाटणी मिळेल. व्यवसायात सावध भूमिका घ्या. यांत्रिक बिघाडावर खर्च होऊ शकतो. मोठय़ा यशासाठी तयारी करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नवे परिचय होतील. शुभ दिनांक – 24, 25

मकर
निर्णयात उतावळेपणा नको
मकरेच्या षष्ठमेषात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरु त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी तुमचा आत्मविश्वास, उत्साह टिकून राहील. कोणत्याही निर्णयात उतावळेपणा नको. कायद्याचे पालन करा. व्यवसायात मोठी संधी मिळेल. नोकरीत डावपेच टाकणारे लोक तुम्हाला अडचणीत आणतील. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक – 23, 24

कुंभ
नव्या कार्याचा आरंभ
कुंभेच्या पंचमेषात शुक्र राश्यांतर, सूर्य-हर्षल लाभयोग होत आहे. संततीच्या प्रगतीचा आनंद मिळेल. व्यवसायात समस्या येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व राहील. पद्धतशीर कार्य करा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नवे कार्य आरंभ करता येईल. प्रत्येक संधीचे सोने करण्याची हीच वेळ आहे. शुभ दिनांक – 25, 26

मीन
महत्त्वाची जबाबदारी लाभेल
मीनेच्या सुखस्थानात शुक्र राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायाला मिळालेली कलाटणी यशाच्या शिखरावर नेईल. प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. पुढच्या यशासाठी उत्तम कार्य नियोजन करा.
शुभ दिनांक – 27, 28

आपली प्रतिक्रिया द्या