साप्ताहिक राशिभविष्य – 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2019

4349

>> मानसी इनामदार

मेष – महत्त्वाची गुंतवणूक

अत्यंत कणखर स्वभावाची तुमची रास आहे. त्या स्वभावानुसार तुमची प्रकृतीही काटक आणि लवचीक असते. पण या आठवडय़ात वाढत्या थंडीचा परिणाम थोडा तब्येतीवर जाणवेल. महत्त्वाची गुंतवणूक कराल, पण सावध निर्णय घ्या. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – जोडवी, शेंदूर.

वृषभ – अचानक धनलाभ

सुदृढ शरीरयष्टी हे तुमचे वैशिष्टय़. खेळाडूंसाठी हा आठवडा खूप महात्त्वाचा असेल. खेळाडूंसकट सामान्यांनीही व्यायामात खंड पडू देऊ नये. हाडांच्या विकारांपासून सावध राहावे. अचानक धन लाभ संभवतो. घरातील सगळी मंडळी एकत्र याल. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – काळा शर्ट, झुमके.

मिथुन – उत्साही राहाल

कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढणार आहे. विरोधकांच्या विरोधाची तीक्रता आपसूक कमी होईल. बढती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता. त्यामुळे उत्साह वाढेल. सकाळी लवकर उठण्याचा नेम ठेवा. पिवळा रंग जवळ ठेवा. सुरक्षा करेल.
शुभ परिधान – जानवे, पैंजण.

कर्क – जमीन खरेदी

प्रकृतीस दगदग जाणवेल. आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवा. लिंबू पाणी, कोकम सरबत इ. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होईल. महत्त्वाच्या कामासाठी कर्ज त्वरित मिळेल. जमीन खरेदीचा व्यवहार कराल. लिंबाचा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – लखनवी साडी, पलाझो.

सिंह – येणे वसूल
तुमच्या विस्मरणातून गेलेले खूप जुने येणे वसूल होईल. त्यामुळे ध्यानीमनी नसताना आर्थिक लाभ होईल. ते पैसे आपल्या आरोग्यात गुंतवा. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांचे मत विचारात घ्या. लाल रंग तुमच्यासाठी नेहमीच शुभ ठरतो.
शुभ परिधान – फॅन्सी दागिने, कुर्ता.

कन्या – मनासारखे घडेल
सर्वच दृष्टीने अत्यंत चांगला आठवडा. आपली प्रकृती उत्तम असणार आहे. सकस आहाराला व्यायामाची जोड द्या. सकाळी चालण्याचा नेम ठेवा. बचतीतून आर्थिक लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. सोनेरी रंग जवळ बाळगा. त्यातून शुभ घडेल.
शुभ परिधान – रुद्राक्ष, सोन्याची अंगठी.

तूळ – यश मिळेल

कामाच्या ठिकाणी खूप चांगला आठवडा असेल. कोणत्याही कामात यश मिळेल. तब्येतीची हेळसांड नको. बाहेरील खाणे संपूर्ण वर्ज्य करा. पायांची काळजी घ्या. तिळाच्या तेलाचे मर्दन गुणकारी ठरेल. घरातील व्यक्तींचा पाठिंबा लाभेल. जांभळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – जॉर्जेटची साडी, ब्रेसलेट.

वृश्चिक – प्रवासाचा योग

चिवट असणे हा तुमचा स्थायी भाव. आता हाच स्वभाव आपल्या प्रकृतीतही दिसू दे. सुयोग्य आहार घेणे सुरू करा. कारण लवकरच प्रवासाचा योग येणार आहे. त्यावरून बऱयाच मनोवंचित गोष्टी मिळतील. पण सर्दी-खोकल्यापासून सावध राहा. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – चुडीदार, कुर्ता.

धनु – शांत राहा

जवळच्या व्यक्तीचा सल्ला खूप महत्त्वाचा ठरेल. त्यातूनच अडथळय़ातून वाट काढाल. हा आठवडा तसा थोडा फार अडथळय़ांचा आहे. पौष्टिक आहारावर भर द्या. पैसे हातात येतील, पण खर्चही होतील. मन शांत ठेवा. फिकट हिरवा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – शाल, उपरणे.

मकर – छान आठवणी

जुने सहकारी भेटतील. चांगल्या आठवणींना उजाळा मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. नव्या जबाबदाऱया सोपविल्या जातील. व्यायाम आणि वेळेवर झोप या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिखट खाणे टाळा. काळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रुमाल, सुगंध.

कुंभ – वाहवा होईल

कामाच्या ठिकाणी दोन्ही अर्थांनी जिभेवर नियंत्रण ठेवा. खाणे आणि बोलणे. जवळच्या व्यक्तीचे मन तुमच्या कृतीतून दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. तेलकट, तामसी आहार वर्ज्य करा. तुमच्या कामाची वाहवा होईल. अबोली रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – खादीचा कुर्ता, डेनिम.

मीन – लक्ष्मीची उपासना

घरातील वातावरण चांगले राहील. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. व्यायामात खंड पडू देऊ नका. नियमित व्यायाम हा तुमच्या प्रकृतीचा पाया आहे. त्वचा चांगली राहील. प्रबळ विवाहयोग आहे. जोडीदाराचा शोध पूर्ण होईल. सोनेरी रंग जवळ बाळगा. लक्ष्मीची उपासना करा.
शुभ परिधान – शेवंतीचे फूल, सुगंध.

 

आपली प्रतिक्रिया द्या