साप्ताहिक भविष्य 02 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2020

7328

>> नीलिमा प्रधान

मेष
परदेशी जाण्याचा योग
मेषेच्या व्ययेशात शुक्र, भाग्येशात मंगळ राश्यांतर हे तुमच्या कार्याला नवा उजाळा देणार आहे. व्यवसायात फायदा होईल. व्यवहार आणि भावना यांची गल्लत करू नका. राजकीय क्षेत्रात नवीन डावपेच तयार करा. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, पैसा मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल.
शुभ दिनांक – 2, 4

वृषभ
कल्पनाशक्तीला चालना मिळेल
वृषभेच्या एकादशात शुक्र, अष्टमेशात मंगळ राश्यांतर होत आहे. कलाक्षेत्रात विशेष कामगिरी कराल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. व्यवसायात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रवासात सावध रहा. सुखद समाचार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.
शुभ दिनांक – 4, 6

मिथुन
दूरदृष्टीने निर्णय घ्या
तुमच्या बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा कस लागणार आहे हे लक्षात ठेवा. मिथुनेच्या दशमेशात शुक्र, सप्तमेशात मंगळ राश्यांतर होत आहे. कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. नोकरी-धंद्यात दूरदृष्टी ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात परीक्षेचा कालावधी ठरू शकतो. कोर्टाच्या कामात चौकस बुद्धी वापरा.
शुभ दिनांक – 7, 8

कर्क
रागावर ताबा ठेवा
कर्केच्या भाग्येशात शुक्र, षष्ठेशात मंगळ राश्यांतर तुम्हाला दिलासा देणारे ठरेल. व्यवसायात कामगारांच्या बरोबर तडजोड करण्याची वेळ येईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. नोकरीत तडकाफडकी रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. राजकारणात प्रतिष्ठा राहील. प्रवासाचा बेत ठरवाल.
शुभ दिनांक – 2, 8

सिंह
मनावर दडपण येईल
सिंहेच्या अष्टमेशात शुक्र, पंचमेशात मंगळ राश्यांतर होत आहे. व्यवसायात, खरेदी-विक्रीत आर्थिक लाभ मिळेल. आठवडय़ाच्या शेवटी राजकीय क्षेत्रात मनावर दडपण येईल. चर्चा, संवादात सरशी होईल. सर्वच ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात कष्ट पडतील.
शुभ दिनांक – 2, 4

कन्या
कार्याला कलाटणी मिळेल
कन्येच्या सप्तमेशात शुक्र, सुखेशात मंगळ राश्यांतर तुमच्या कार्याला कलाटणी देणारे ठरेल. आत्मविश्वासात भर पडेल. कायद्याच्या संबंधित समस्या सोडवाल. नोकरी- व्यवसायात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवा परिचय होईल. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. प्रेमाला चालना मिळेल.
शुभ दिनांक – 4, 8

तूळ
जबाबदारी वाढेल
तुळेच्या षष्ठेशात शुक्र, पराक्रमात मंगळ राश्यांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला ठरवलेल्या कामात अचानक बदल करावा लागल्यामुळे मन विचलित होईल. नोकरीत जबाबदारीने काम करावे लागेल. राजकारणात वरिष्ठांचा दबाव नकोसा होईल. खंबीर नेतृत्वामुळे काम कौतुकास्पद ठरेल.
शुभ दिनांक – 7, 8

वृश्चिक
महत्त्वाची खरेदी होईल
वृश्चिकेच्या पंचमेशात शुक्र, धनेशात मंगळ राश्यांतर होत आहे. मीन राशीत शुक्र उच्चीचे फल देतो. अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घर, वाहन इ. मौल्यवान खरेदी कराल. प्रभाव वाढेल. राजकीय, अस्थिरता कमी करण्याचा प्रयत्न करा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात सुसंवाद महत्त्वाचा.
शुभ दिनांक – 4, 8

धनु
वर्चस्व सिद्ध कराल
धनुच्या सुखेशात शुक्र, स्वराशीत मंगळ राश्यांतर होत आहे. साडेसाती सुरू असली तरी अडचणीवर मात करून तुम्ही तुमचे वर्चस्व राजकीय, सामाजिक क्षेत्रात सिद्ध कराल. कुटुंबातील अस्थिरता दूर करून सौख्याचे क्षण अनुभवाल. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत बढतीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – 2, 6

मकर
प्रसंगावधान राखा
मकरेच्या पराक्रमात शुक्र, व्ययेशात मंगळ राश्यांतर होत आहे. साडेसाती सुरू आहे. इतरांच्या सांगण्यावरून मत तयार करू नका. राजकारणात मैत्री वाढेल. प्रसंगावधान ठेवा. गुरुस्थानी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. शेवटी प्रत्यक्ष अनुभवाशिवाय माणूस तयार होत नाही. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रवासात सावध रहा.
शुभ दिनांक – 4, 8

कुंभ
टीकेचा सामना करावा लागेल
कुंभेच्या धनेशात शुक्र, एकादशात मंगळ राश्यांतर होत आहे. साडेसाती नुकतीच सुरू झाली आहे. नोकरीत अचानक कामात बदल होऊ शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खंबीरपणे नामोहरम करू शकाल. प्रतिष्ठsवर टीका होईल. दिग्गज लोकांचा परिचय वाढेल. कला- क्षेत्रात नवे दालन खुले होईल. शुभ दिनांक – 2, 6

मीन
विचारांना चालना मिळेल
स्वराशीत शुक्र, दशमेशात मंगळ राश्यांतर तुमची प्रतिमा उजळणारे ठरेल. प्रत्येक दिवस कार्याला वेगाने पुढे नेणार आहे. बोलण्यात नम्रता ठेवा. व्यवसायात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्या कार्यपद्धतीने वागून प्रभाव पाडाल. विचारांना चालना मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
शुभ दिनांक – 2, 4

आपली प्रतिक्रिया द्या