साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 5 जुलै ते शनिवार 11 जुलै 2020

5512

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रगतीची संधी मिळेल

चंद्र-गुरू युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग तुमच्या प्रत्येक कार्याला गती देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. विरोधाचा सामना करावा लागेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. कुटुंबातील समस्या कमी होतील. कला-साहित्यात प्रेरणादायी घटना घडतील.
शुभ दिनांक – 7, 9

वृषभ – व्यवसायाला कलाटणी मिळेल

चंद्र, बुध त्रिकोणयोग चंद्र, मंगळ युती होत आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तत्परता दाखवा. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. परिचयात वाढ होईल. कठीण काम मार्गी लागेल. कला-साहित्यात प्रसिद्धी मिळेल.
शुभ दिनांक – 7, 8

मिथुन – समस्या कमी होतील

चंद्र-गुरू युती, चंद्र, मंगळ लाभयोग तुमच्या क्षेत्रातील समस्या कमी करेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर प्रगती होईल. तुम्हाला नाउमेद करण्याचा प्रयत्न होईल. व्यवसाय, नोकरीत चांगला बदल घडण्याची अपेक्षा आहे. कायद्यासंबंधी कामे लवकर संपवा. साहित्यात चालना मिळेल.
शुभ दिनांक ः 9, 10

कर्क – सहनशीलता बाळगा

चंद्र, मंगळ लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. तुमच्या मुद्याला महत्त्व दिले जाणार नाही. व्यवसाय, नोकरवर्गाची चिंता वाढेल. कायद्यासंबंधित कामात बेसावध राहू नका.
शुभ दिनांक – 7, 11

सिंह – वरिष्ठांची मर्जी लाभेल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग तुमच्या क्षेत्रातील कार्याला वेगाने प्रगतीपथाकडे नेईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तुमचा उत्साह विरोधकांना सहन होणार नाही. तुमच्या कार्याने प्रतिष्ठा वाढेल. प्रवासात सावध रहा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी लाभेल. कोणत्याही कामाची जिद्द बाळगा.
शुभ दिनांक – 9, 10

कन्या – कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती तुमच्या व्यवसायाला कलाटणी देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा बदल घडेल. अधिकारात वाढ होईल. कायद्याच्या कामात प्रगती होईल. कला-साहित्यात बुद्धिचातुर्य दिसेल. कौटुंबिक जबाबदारी
पूर्ण कराल. वाहन जपून चालवा.
शुभ दिनांक – 7, 11

तूळ – वर्चस्व सिद्ध कराल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व नव्याने सिद्ध कराल. योजनांना गती द्या. व्यवसायात वाद वाढवू नका. नोकरीत महत्त्व वाढेल. वरिष्ठांसोबत एकमत होईल. कायद्यासंबंधित काम पूर्ण करा. साहित्यात प्रगती होईल.
शुभ दिनांक – 9, 10

वृश्चिक – संधीचा लाभ घ्या

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, गुरू युती होत आहे. चांगली संधी कमी वेळा असते, तिचा लाभ घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीका होईल. नोकरवर्गाची कमी जाणवेल. संयम व जिद्दीने यश मिळेल. नोकरीत प्रतिष्ठा सांभाळा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. कलाक्षेत्रात नावीन्य जाणवेल.
शुभ दिनांक – 7, 8

धनु – प्रगतीचा नवा मार्ग मिळेल

चंद्र-गुरू युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. चौफेर वर्चस्व सिद्ध कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नियोजनबद्ध कार्यक्रम करा. व्यवसायात सुधारणा करण्यात यश मिळेल. नवीन परिचयात सावध राहा. साहित्याला उत्तम विषय मिळेल.
शुभ दिनांक – 7, 8

मकर – कायद्याचे पालन करा

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. प्रत्येक कृती विचारपूर्वक करा. कायद्याचे काटेकोर पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रक्षोभक मुद्दे मांडताना उतावळेपणा नको. इतरांच्या चुका सुधाराव्या लागतील. कलाक्षेत्रात विशेष कलाकृती कराल.
शुभ दिनांक – 9, 10

कुंभ – विचारशक्ती प्रेरणादायी ठरेल

चंद्र-गुरू युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. तुमची विचारशक्ती इतरांना प्रेरणादायी ठरेल. व्यवहारात भावनांचा गुंता करू नका. साहित्याला नवा विषय मिळेल.
शुभ दिनांक – 10, 11

मीन – अधिकारप्राप्ती होईल

चंद्र-गुरू युती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसाय, नोकरीत सुधारणा होईल. वादाचा मुद्दा चर्चा करताना सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारप्राप्ती होईल. लोकसंग्रह वाढेल. कला-साहित्यात प्रगती होईल. नवे परिचय मिळतील.
शुभ दिनांक – 6, 7

आपली प्रतिक्रिया द्या