साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 ते शनिवार 18 जुलै 2020

5510

>>  नीलिमा प्रधान

मेष – व्यवसायात प्रगती होईल

मेषेच्या सुखेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. डावपेच टाकताना सावध राहा. व्यावसायात प्रगती होईल. कोणतीही चर्चा करताना संयम बाळगा. कला क्षेत्रात नवा परिचय होईल. तुमच्या शब्दाचा मान ठेवला जाईल. प्रवासात घाई नको.
शुभ दिनांक – 13, 16

वृषभ – महत्त्वाचा निर्णय घ्याल

वृषभेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे कार्य प्रशंसनीय होईल. आठवडय़ाच्या सुरुवातीला किरकोळ तणाव जाणवेल. नोकरीत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. कोर्टकचेरीच्या कामाला वळण मिळेल. कौटुंबिक समस्या कमी होतील.
शुभ दिनांक – 12, 16

मिथुन – वर्चस्व निर्माण कराल

मिथुनच्या धनेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने वर्चस्व निर्माण कराल. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जवळचे लोक कार्यात अडचणी निर्माण करतील. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. साहित्याला नवी दिशा मिळेल. शुभ दिनांक – 13, 14

कर्क – कलाक्षेत्रात यश मिळेल

स्वराशीत सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी कठीण परिस्थितीवर मात कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तहाची भाषा करतील. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत इतरांना मदत कराल. कलाक्षेत्रात यश मिळेल.
शुभ दिनांक – 16, 18दुश्च्प्

सिंह – रागावर ताबा ठेवा

सिंहेच्या व्ययेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात षडयंत्र रचवण्याचा प्रयत्न होईल. रागावर ताबा ठेवा. नोकरीत अचानक बदल होण्याचा संभव. वरिष्ठांसोबत मिळतेजुळते धोरण ठेवा. कलासाहित्यात नव्या गोष्टी घडतील.
शुभ दिनांक – 13, 15

कन्या – कौटुंबिक जबाबदारी वाढेल

कन्येच्या एकादशात सूर्य राश्यांतर, सूर्य-गुरू प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजनांना पुढे न्या. क्षेत्र कोणतेही असो. प्रत्येक क्षेत्रात कायद्यानुसार वागा. वरिष्ठांची मर्जी होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कला-साहित्यात कल्पकता आणता येईल.
शुभ दिनांक – 12, 16

तूळ – अडचणीवर मात कराल

तुळेच्या दशमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरु त्रिकोणयोग होत आहे. अडचणीवर मात करण्याची जिद्द ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी संपर्क वाढवा. सहकारी, नेते यांना व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत प्राबल्य वाढेल. मोठे काम मिळेल.
शुभ दिनांक – 14, 15

वृश्चिक – विरोधकांना शह देता येईल

वृश्चिकेच्या भाग्येशात सूर्य राश्यांतर, सूर्य- गुरू प्रतियुती होत आहे. व्यवसायात मोठी संधी उपलब्ध होईल. कोणताही वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देता येईल. नोकरीतील तणाव कमी होईल. कला-साहित्यात प्रगती होईल.
शुभ दिनांक – 16, 17

धनु – बेसावध राहू नका

धनुच्या अष्टमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. व्यवसायात मोठे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होईल. आरोग्याची नीट काळजी घ्या. वाटाघाटीच्या चर्चेत अडचण येऊ शकते. व्यवहारात बेसावध राहू नका.
शुभ दिनांक – 12, 13

मकर – कायदा मोडू नका

मकरेच्या सप्तमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात चर्चा सफल होतील. कोणत्याही प्रसंगात कायदा मोडू नका. गुप्त कारवायांवर करडी नजर ठेवा. नोकरीत कायद्याचे पालन करा. कलाक्षेत्रात विशेष कलाकृती बनवाल.
शुभ दिनांक – 15, 16

कुंभ – संयम बाळगा

कुंभेच्या षष्ठsशात सूर्य राश्यांतर, चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, परिस्थितीचा योग्य आढावा घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयम ठेवा. विरोधक तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात नवी संधी मिळेल.
शुभ दिनांक – 14, 16

मीन – शेअर्समध्ये लाभ होईल

मीनेच्या पंचमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना महत्त्व द्या. लोकांच्या मदतही उभे राहा. त्यातच समाधान मिळेल. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. कायद्याच्या कामात प्रगती होईल. शेअर्समध्ये लाभ होईल.
शुभ दिनांक – 14, 15

आपली प्रतिक्रिया द्या