आठवड्याचे भविष्य : रविवार 16 ते शनिवार 22 जून 2019

121

>> नीलिमा प्रधान

मेष : अधिकारप्राप्ती होईल
मेषेच्या सुखेशात बुध, मंगळ राश्यांतर आणि बुध-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. रविवारी धावपळ, दगदग वाढेल. मंगळवारी धंद्यात नवे कंत्राट मिळवा. ओळखीचा उपयोग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे प्रामाणिक प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. प्रतिष्ठा राहील. अधिकारप्राप्ती होईल.
शुभ दिनांक – 18, 20

वृषभ : नव्या दिशेने प्रगती
या आठवडय़ात वृषभेच्या पराक्रमात बुध, मंगळ राश्यांतर होत आहे. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. परदेशात उद्योग नेता येईल, कायद्याचे पालन मात्र करा. मंगळवार, बुधवार अचानक खर्च आणि तणाव वाढेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नव्या दिशेने प्रगती होईल.
शुभ दिनांक – 20, 21

मिथुन : प्रवासात सवध रहा
मिथुनेच्या धनस्थानात बुध, मंगळ राश्यांतर होत आहे. व्यवसायात सुधारणा होईल. मनाप्रमाणे प्रगती करता येईल. भागीदारासोबत क्षुल्लक वाद होईल. कौटुंबिक चिंता वाढेल. गैरसमज होईल. गुरुवार, शुक्रवार चर्चा अयशस्वी होईल. प्रवासात सावध रहा. मित्रपक्ष अडवणूक करील.
शुभ दिनांक- 17, 18

कर्क : विलंबाने यश मिळेल
स्वराशीत बुध, मंगळ प्रवेश होत आहे. चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या क्षेत्रात विलंबाने यश मिळेल. वादविवादाला वेगळाच रंग येईल. सावध भूमिका ठेवा. गुप्त हितशत्रू कट करतील. कुटुंबातील समस्या सोडवाल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात धाडस त्रासदायक ठरेल. परदेशी जाण्याचा योग येईल.
शुभ दिनांक – 20, 21

सिंह : मुलांची प्रगती
सिंह राशीच्या व्ययेशात बुध, मंगळ राश्यांतर आणि सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची चर्चा करा. भेट घ्या. मैत्री दृढ झाली तरी गुरुवार, शुक्रवार वाटाघाटी चिघळण्याची शक्यता आहे. मुलांची प्रगती आनंद देणारी ठरेल. घरातील वाद लवकर संपवा.
शुभ दिनांक – 17, 18

कन्या : कलाटणी देणारा आठवडा
कन्या राशीच्या एकादशात बुध, मंगळ राश्यांतर होत आहे. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. व्यवसाय, नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता मिळेल. वादविवादात सरशी होईल. प्रसंग, वेळ यानुसार धोरण ठरवा. जीवनाला कलाटणी देणारा आठवडा ठरू शकतो.
शुभ दिनांक – 16, 20

तूळ : आत्मविश्वास बळावेल
तुळेच्या दशमेशात बुध, मंगळ राश्यांतर होत आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल. एखादे मानसिक दडपण राहील. इतरांच्या समस्येत जास्त गुंतू नका. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल. योग्य गुंतवणूक करा. शेअर्सचा लाभ होईल. नोकरी लागेल. स्पर्धा करणारे लोक वाढतील.
शुभ दिनांक ः 16, 17

वृश्चिक : बोलण्यात चुकू नका
वृश्चिकेच्या भाग्येशात बुध, मंगळ राश्यांतर होत आहे. आत्मविश्वास आणि उत्साह शाबूत राहील, परंतु वरिष्ठांचा दबाव राहील. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी योग्य प्रयत्न करा. बोलण्यात चूक करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. प्रवासात धोका देण्याचा कट रचला जाईल.
शुभ दिनांक – 18, 19

धनु : कामे रेंगाळत ठेवू नका
धनु राशीच्या अष्टमेशात बुध, मंगळ राश्यांतर होत आहे. महत्त्वाची कामे याच आठवडय़ात करा. रविवारी चहाच्या पेल्यातील घरगुती वादळ होईल. ते दुर्लक्षित करू नका. समस्या सोडवा. वाटाघाटीत तडजोड करण्याचे तुम्हाला सुचविले जाईल. उद्योग आणि नोकरीत वर्चस्व राहील, पण कामे रेंगाळत ठेवू नका.
शुभ दिनांक – 20, 21

मकर : अरेरावी त्रासदायक ठरेल
मकरेच्या सप्तमेशात बुध, मंगळ राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. आठवडा कटकटीचा वाटेल. मात्र जवळचे लोक तुम्हाला समजून घेतील. क्षेत्र कोणतेही असले तरी अरेरावी त्रासदायक ठरेल. राग वाढेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठत लोकांची ओळख होईल. नव्या कामासाठी निवड होईल.
शुभ दिनांक – 21, 22

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल
कुंभेच्या षष्ठय़ेशात बुध, मंगळ राश्यांतर, चंद्र-गुरु प्रतियुती होत आहे. तुमच्या आत्मविश्वासाला वेगळे वळण देता येईल. उद्योग-नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची चर्चा करा. निर्णय घ्या. आठवडय़ाच्या शेवटी मनस्ताप देणारी घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. घर, जमिनीसंबंधी काम करून घ्या.
शुभ दिनांक – 16, 17

मीन : भ्रमात राहू नका
मीनेच्या पंचमेशात बुध, मंगळ राश्यांतर, चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. उद्योग-नोकरीत प्रगतीची नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. हलक्या कानाचे राहू नका. तसेच भ्रमातही राहू नका. समस्या सोडवाल. परदेशी जाण्याचा योग येईल. शुभ दिनांक – 17, 18

आपली प्रतिक्रिया द्या