साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 19 ते शनिवार 25 जुलै 2020

>> नीलिमा प्रधान

राजकारणात महत्त्व वाढेल

‘मेष – चंद्र-गुरु प्रतियुती, बुध-हर्षल लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी संयम ठेवून बुद्धिचातुर्याचा वापर करा. राजकारणात तुमचे महत्त्व वाढत जाईल. विरोधकांना शह देता येईल. जुने अनुभव उपयुक्त ठरतील. नोकरीत ताणतणाव येतील. संयम व सहनशीलतेने यश मिळवता येईल.
शुभ दिनांक – 23, 24

कायद्याचे पालन करा

वृषभ – चंद्र-बुध युती, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात मनाप्रमाणे वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याचे पालन करा. लोकांना समस्येतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीत तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. कला-साहित्य क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण असेल.
शुभ दिनांक ः 21, 22

शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायी

मिथुन – चंद्र-बुध युती, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. नवे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना ओळखून निर्णय घ्या. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. व्यवहारात लाभ होईल. कुटुंबात किरकोळ तणाव होईल. साहित्याला नवी प्रेरणा मिळेल.
शुभ दिनांक – 21, 23

सावध रहा

कर्क – चंद्र, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसाय व नोकरीतील समस्या कमी होतील. कोणतीही काम करताना कायद्याचे पालन करा. कोणताही व्यवहार व वक्तव्य सावधपणे करा. कलाक्षेत्रात चालना देणारी घटना घडेल. कौटुंबिक तणाव कमी होतील.
शुभ दिनांक – 24, 25

अहंकार दूर ठेवा

सिंह – बुध, हर्षल लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेताना काळजी घ्या. नकळत चूक होण्याचा संभव आहे. अहंकार दूर ठेवा. नोकरीत कामाचा दबाव राहील. वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. व्यवसायात वाढ होईल.
शुभ दिनांक – 24, 25

जनहिताचे कार्य घडेल

कन्या – चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात जास्त मेहनत घ्या. जनहिताचे कार्य घडेल. तुम्ही मांडलेल्या मुद्यांचा विचार होईल. नोकरीत वरिष्ठांच्या बाजूने निर्णय द्यावा लागेल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. कला-साहित्यात प्रसिद्धी मिळेल.
शुभ दिनांक – 21, 22

कार्याला दिशा मिळेल

तूळ – चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग तुमच्या प्रत्येक कार्याला योग्य दिशा देण्यास मदत करेल. कठीण प्रसंगांवर मात कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा वेग वाढवा. नोकरीत प्रगती कराल. कुटुंबातील किरकोळ अडचणी दूर होतील. नवीन लेखन प्रसिद्ध होईल.
शुभ दिनांक – 21, 22

सुखद घटना घडतील

वृश्चिक – चंद्र, गुरू प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, चिंता कमी होतील. विरोधकांना आवरताना अहंकार दूर ठेवा. व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवूनच निर्णय घ्या. नोकरीत सुखद घटना घडेल. कुटुंबात सुखद समाचार मिळतील.
शुभ दिनांक – 21, 22

रागावर नियंत्रण ठेवा

धनु – चंद्र, गुरु प्रतियुती, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला खंबीर राहावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा प्रभावी असला तरी प्रतिसाद मिळणार नाही. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक चर्चा होतील. नोकरीत तुमच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल.
शुभ दिनांक – 23, 24

प्रगतीची संधी मिळेल

मकर – चंद्र, मंगळ त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. प्रगतीची संधी मिळेल; परंतु अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील, परंतु विरोधकांचा सामना करावा लागेल. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. कोणताही करार करताना सावध रहा.
शुभ दिनांक – 21, 22

संयम बाळगा

कुंभ – चंद्र, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. उतावळेपणा, अहंकार यामुळे चांगल्या कामाचे महत्त्व कमी होते हे लक्षात असू द्या. तेव्हा संयम बाळगा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्यावर टीका होईल. मात्र कोणतीही कृती सावधपणे करा. कोणताही व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहून करा.
शुभ दिनांक – 23, 24

व्यवसायात प्रगती होईल

मीन – चंद्र, गुरु प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळतील. व्यवसायात प्रगती कराल. चर्चा करताना संयम बाळगा. नोकरीत प्रभाव वाढेल. शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल. कला-साहित्यात प्रेरणा मिळेल. कौटुंबिक समस्या कमी होतील.
शुभ दिनांक – 21, 22

आपली प्रतिक्रिया द्या