आठवड्याचे भविष्य : रविवार 1 ते शनिवार 7 मार्च 2020

9858

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रयत्नांत सातत्य ठेवा
मकरेत प्लुटोचा प्रवेश, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. वर्तमानकाळात तुम्ही स्वतःला सिद्ध करत आहात. प्रगतीचा महामार्ग तयार केला आहे. त्यावरून भविष्यासाठी अधिक उंचीचे यश मिळवण्यासाठी प्रयत्नपूर्वक धावा. नोकरी-व्यवसायात जम बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योजना आखा. शुभ दिनांक ः 3, 4

वृषभ – व्यवसायात संयम बाळगा
मकर राशीत प्लुटोचे राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात वाढ कराल. भागीदाराच्या बरोबर संयमी धोरण ठेवा. नोकरीत अवलंबून राहू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. व्यावहारिक दृष्टिकोन उपयोगी पडेल. शुभ दिनांक ः 4, 5

मिथुन – सावध रहा
मकर राशीत प्लुटोचे राश्यांतर बुध शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात दूरदृष्टी महत्त्वाची ठरेल. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत बदल केल्याने फायदा होईल. अचानक काही व्यक्तींना मोठा धनलाभ होऊ शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे प्रस्थ वाढेल. दगाफटका सांगून होणार नाही. शुभ दिनांक ः 5, 6

कर्क – व्यवहाराचे गणित नीट आखा
मकर राशीत प्लुटोचे राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, क्षुल्लक चूकसुद्धा महात्रासदायक ठरेल. व्यवसायात व्यवहाराचे गणित नीट करा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या विरोधात बोलल्यास समस्या वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कायद्याचे भान ठेवून कोणतेही वक्तव्य करा. शुभ दिनांक ः 1, 2

सिंह – अनावश्यक टीका होईल
मकरेतील प्लुटोचे राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुम्ही घेतलेला तुमच्या क्षेत्रातील निर्णय योग्य ठरेल. आठवडय़ाच्या शेवटी राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या वक्तव्यावर अनावश्यक टीका होईल. व्यवसाय-नोकरीमध्ये वर्चस्व वाढेल. थोरा-मोठय़ांच्या परिचयाने उत्साह वाढेल. शुभ दिनांक ः 3, 4

कन्या – प्रसंगावधान राखा
सूर्य-चंद्र षडाष्टकयोग, मकर राशीत प्लुटोचे राश्यांतर होत आहे. मनाचे सामर्थ्य टिकून राहिल्याने कोणताही कठीण गंभीर प्रसंग निभावून नेता येईल. कुटुंबात अचानक तणाव, दुरावा निर्माण होईल. वादाचे प्रसंग टोकाला जातील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नामुष्की होईल. तुमचे बोलणे वादग्रस्त ठरेल. शुभ दिनांक ः 3, 4

तूळ – लाभदायी काळ
बुध-शुक्र लाभयोग, मकरेत प्लुटोचे राश्यांतर होत आहे. व्यवसायात जम बसेल. फायदेशीर काम मिळेल. नोकरीत तुमच्या नावाची शिफारस महत्त्वाच्या कामासाठी होईल. परिचयाचा फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. शुभ दिनांक ः 4, 5

वृश्चिक – अनाठायी खर्च टाळा
चंद्र-गुरू प्रतियुती, मकरेत प्लुटोचे राश्यांतर होत आहे. आप्तेष्ट, मित्र यांच्यासाठी धावपळ होईल. अनाठायी खर्च टाळा. व्यवसाय-नोकरीत सावध रहा. कुटुंबात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात त्रुटी राहू शकतात. पैशांची गुंतवणूक करण्यात फसगत होऊ शकते. शुभ दिनांक ः 2, 3

धनु – रागावर नियंत्रण ठेवा
बुध-शुक्र लाभयोग, मकरेत प्लुटोचे राश्यांतर होत आहे. व्यवसाय-नोकरीत समस्या येईल, परंतु प्रगतीची संधी मिळेल. मन अस्थिर होईल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर दबाव राहील. जुने मित्र तुमचे स्वागत करतील. कोणतीही स्पर्धा कठीण असली तरी तुमचे यश उजळून निघेल. शुभ दिनांक ः 4, 5

मकर – प्रयत्नांत कसूर नको
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, स्वराशीत प्लुटोचे राश्यांतर होत आहे. अचानक तुमच्या कार्याला वेगळेच प्रसिद्धीचे वळण लागेल. तुम्ही कुठेही कमी पडू नका. व्यवसायातील समस्या सोडवण्याची संधी मिळेल. नोकरीत टिकून राहाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात पद्धतशीर नियोजन करा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात प्रगती होईल. शुभ दिनांक ः 3, 6

कुंभ – दूरदृष्टीने निर्णय घ्या
चंद्र-गुरू प्रतियुती, मकरेत प्लुटोचे राश्यांतर होत आहे. साडेसाती सुरू आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अंदाज बरोबर येतील. विरोधकांचा डाव लक्षात येईल मात्र शत्रुत्वही तयार होईल. त्यावरही चौफेर नजर ठेवा. धाडसी असावे, पण दूरदृष्टीसुद्धा ठेवावी. मान-प्रतिष्ठा वाढवणाऱया घटना घडतील. शुभ दिनांक ः 4, 5

मीन – अतिशयोक्ती नको
चंद्र-गुरू प्रतियुती, मकरेत प्लुटोचे राश्यांतर होत आहे. व्यवहार व भावना यांची गल्लत करू नका. मनाच्या सामर्थ्यावर समस्या बाजूला सारू शकाल. अतिशयोक्ती व उतावळेपणा उपयोगी पडणार नाही. व्यवसाय-नोकरीत सावध भूमिका घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चुकीचे वक्तव्य त्रासदायक ठरेल. शुभ दिनांक ः 2, 3

आपली प्रतिक्रिया द्या