भविष्य – रविवार 23 ते शनिवार 29 डिसेंबर 2018

93

>> नीलिमा प्रधान

मेष -उत्साह नियंत्रित ठेवा!
मेषेच्या व्ययेषात मंगळ राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय व सामाजिक कार्याच्या दिशा विस्तारण्यात यश येईल. उत्साह नियंत्रित ठेवा. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. व्यवसायातील संघर्ष कमी होईल. मात्र बेसावध राहू नका. जीवनसाथीला खूश ठेवता येईल. शुभ दिनांक- 23, 27.

वृषभ – कायद्याला कमी लेखू नका
वृषभेच्या एकादशात मंगळ, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात वरिष्ठांचा दुरावा तुमचे मानसिक खच्चीकरण करील. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकेल. कायद्याला कमी लेखू नका. कुटुंबात समस्या येईल, धावपळ वाढेल. मदतीची अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका. शुभ दिनांक – 24, 25.

मिथुन – मुलांकडून सुखद समाचार
आठवडय़ाची सुरुवात उत्साहवर्धक होईल. मिथुनेच्या दशमेषात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. कुटुंबातील समस्या व नाराजी दूर करता येईल. त्याला वेळ लावू नका. नाटय़, चित्रपट क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. मुलांकडून सुखद समाचार मिळेल. परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होईल. शुभ दिनांक – 25, 26.

कर्क -प्रतिष्ठा पणाला लावू नका
कर्केच्या भाग्येषात मंगळ, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात तुम्हाला विरोध करणारे आणि तुमच्या बाजूने असणारे लोक एकत्र येतील. गुप्त कारवायांचा त्रास होईल. प्रतिष्ठा पणाला लावू नका. कोर्टाच्या कामास विलंब होईल. मदत करणाऱया व्यक्तीचा उद्देश तपासून घ्या. शुभ दिनांक – 27, 28.

सिंह – प्रकृतीकडे दुर्लक्ष नको
सिंहेच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. मंगळवारी धावपळ वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. व्यवसायात गोड बोलून कामे करून घ्या. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. दुसऱयाने केलेली चूक आपल्याला त्रासदायक ठरते. शुभ दिनांक – 28, 29.

कन्या – संमिश्र घटना
कन्येच्या सप्तमेषात मंगळ, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात एखादा निर्णय खंबीरपणे घेण्याची वेळ येईल. कुटुंबात तणाव होईल. बुधवारी व्यवसायात किरकोळ मतभेद होतील. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. वरिष्ठांकडून मोठे आश्वासन मिळेल. शुभ दिनांक – 24, 25.

तूळ – स्वप्न पूर्ण होईल
तुळेच्या षष्ठात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. अर्धवट राहिलेली सर्व कामे होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नोकरीत चांगला बदल होईल. प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल. योजनांना गती द्या. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात उच्च यश मिळेल. तुमचे स्वप्न पूर्ण होईल. वास्तू खरेदी करता येईल. शुभ दिनांक – 25, 26.

वृश्चिक – कुटुंबीयांना दुखवू नका
वृश्चिकेच्या पंचमेषात मंगळ, शुक्र, प्लुटो लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होईल. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व जवळच्या नेत्यांना, सहकारी वर्गाला सहन होणार नाही. कुटुंबात कुणालाही दुखवू नका. मैत्री सांभाळा. शुभ दिनांक – 25, 26.

धनु – रागावर नियंत्रण ठेवा!
धनुच्या सुखस्थानात मंगळ, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. कुटुंबातील वाटाघाटींचा मुद्दा तुम्ही दुसऱयावर सोपवाल तेव्हाच त्यांना तुमची किंमत कळेल. जवळचे लोक विरोधात असले तरी काही लोक तुमच्या बाजूने असतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. कोणताही प्रश्न क्षुल्लक समजू नका. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ दिनांक – 25, 26.

मकर – बुद्धी व चातुर्याने वागा
मकरेच्या पराक्रमात मंगळ, चंद्र, गुरू त्रिकोण योग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, आक्रमक वागण्यापेक्षा बुद्धी व चातुर्याने निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्याचा फायदा इतर घेतील. मात्र तुमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल. शुभ दिनांक – 25, 29.

कुंभ – प्रतिष्ठा व लोकप्रियता लाभेल
कुंभेच्या धनेषात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. डोळय़ांना उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा व लोकप्रियता यात फरक असतो, पण तुम्हाला दोन्हीही मिळेल. तुमच्या योजनांना गती द्या. गुप्त कारवाया होतीलच. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात वर्चस्व वाढेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. शुभ दिनांक – 23, 27.

मीन -सहनशीलता ठेवा!
स्वराशीत मंगळ, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याचा उपयोग मात्र गरज असेल तिथेच करा. व्यवसायात मोठी उलाढाल होईल. क्षुल्लक व्यक्ती अडचणी निर्माण करतील. सहनशीलता ठेवा. वडीलधाऱया व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. शुभ दिनांक – 24, 25.

आपली प्रतिक्रिया द्या