आठवड्याचे भविष्य – 24 मे ते 30 मे 2020

5795

>> नीलिमा प्रधान

मेष – शेअर्समध्ये फायदा होईल
मेषेच्या पराक्रमात बुध राश्यांतर, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे या आठवडयात मार्गी लावता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेचांनी यश मिळेल. व्यवसायात साहाय्य मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. कलासाहित्यात नाविन्याचा विचार करा. कुटुंबाची काळजी घ्या.
शुभ दिनांक – 24, 25

वृषभ – योजनांना गती द्या
वृषभेच्या धनेशात बुध राश्यांतर, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. अडचणीत आलेली काम करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनहिताचे काम करण्याची संधी सोडू नका. कायदा पाळत योजनांना गती द्या. कुटुंबातील तणाव दूर होईल. सुखद समाचार मिळेल.
शुभ दिनांक – 25, 27

मिथुन – उत्साहाचा अतिरेक नको
स्वराशीत बुध राश्यांतर, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. उत्साहाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. राग आवरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध ऐकावे लागेल याची तयारी ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. मोह नुकसानकारक ठरेल हे लक्षात ठेवा. कुटुंबात तणाव होईल.
शुभ दिनांक – 27, 28

कर्क – स्पष्ट बोलणे घातक
कर्केच्या व्ययेषात बुध राश्यांतर, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. रागाचा पारा वाढवणारी घटना घडेल. नियमाचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पष्ट बोलणे घातक ठरेल. प्रवासात सावध राहा. कलासाहित्य क्षेत्रात आनंद देणारे विचार सुचतील.
शुभ दिनांक – 28, 29

सिंह – सुखद घटना घडतील
सिंहेच्या एकादशात बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र युती होत आहे. नम्रपणा, लाघवी बोलणे तुमच्या कार्याला पुढे नेणारे ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सुखद घटना घडेल. कठोर बोलणे टाळा. आर्थिक मदत मिळेल. व्यवसाय, नोकरीत टिकून राहता येईल.
शुभ दिनांक – 24, 25

कन्या – व्यवसायात सुधारणा होईल
कन्येच्या दशमेशात बुध राश्यांतर, चंद्र गुरु युती होत आहे. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत जबाबदारी वाढेल. तुमचे वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी मोठे कार्य कराल. साहित्य विचारांना चालना मिळेल.
शुभ दिनांक – 24, 25

तूळ – वादाचे प्रसंग येतील
तूळ राशीच्या भाग्येशात बुध राश्यांतर, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. नोकरीत सहनशीलता ठेवा. वादाचे प्रसंग येतील. कायद्याचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण काम तुमच्याकडे दिले जाईल. तटस्थ राहून समस्यांचा विचार कराल. अतिउत्साह दूर ठेवा.
शुभ दिनांक – 25, 26

वृश्चिक – वेळेला महत्त्व द्या
वृश्चिकेच्या अष्टमेषात बुध राश्यांतर, चंद्र शुक्र युती होत आहे. चिडचिडेपणामुळे गोष्टी बिघडतील याकडे लक्ष द्या. व्यवसायात नवे संबंध जोडले जातील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकसंग्रह वाढेल. वेळेस महत्त्व देऊन काम केल्यास कौतुक होईल.
शुभ दिनांक – 27, 28

धनु – मैत्रीत तणाव होईल
धनुच्या सप्तमेशात बुध राश्यांतर, बुध शनी षडाष्टक योग होत आहे. तुमच्या बोलण्याचा गैरअर्थ काढला जाईल. व्यवसायात भागीदार अडवणूक करतील. प्रकृतीची काळजी घ्या. प्रतिक्रिया देण्याचा उतावळेपणा नको. मैत्रीत तणाव होईल.
शुभ दिनांक – 25, 26

मकर – जनहिताच्या कार्यात पुढे जाल
मकरेच्या षष्ठsशात बुध राश्यांतर, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. बोलण्याचा उद्देश चांगला असला तरी चुकीचा समज केला जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. जनहिताच्या कार्यात पुढे जाल. कलासाहित्यात नव्या विषयाचा विचार कराल.
शुभ दिनांक – 24, 27

कुंभ – मनस्ताप होईल
कुंभेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, मंगळ हर्षल लाभयोग होत आहे. उत्साहाच्या भरात भलते धाडस नको. व्यवसायात नियमांचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांकडे लक्ष द्या. इतरांच्या स्वार्थी निर्णयाचा मनस्ताप होईल.
शुभ दिनांक – 25, 26

मीन – जबाबदारी पूर्ण कराल
मीनेच्या सुखेशात बुध राश्यांतर, चंद्र शुक्र युती होत आहे. व्यवसायात चर्चा करून प्रश्न सोडवाल. नोकरीत वरिष्ठांना मदत केल्याने महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांच्या कारवायांवर मात करून ध्येय गाठता येईल. कुटुंबाची जबाबदारी पूर्ण कराल.
शुभ दिनांक – 24, 28

आपली प्रतिक्रिया द्या