भविष्य – २७ मे ते २ जून २०१८

18

>> नीलिमा प्रधान

मेष – शेअर्समध्ये लाभ
राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधकांची बेकी ओळखून एकी करण्याचा प्रयत्न करा. एकोपा यशदायी ठरेल. व्यवसायात फायदा होईल. नवे कंत्राट मिळेल. शेअर्समध्ये लाभ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. कौटुंबिक ताणतणाव कमी करता येतील. वाटाघाटीत यश मिळेल. परदेशगमनाची संधी मिळेल.
शुभ दिनांक – ३१, १.

वृषभ – वर्चस्व निर्माण कराल
सामाजिक क्षेत्रात ‘एकता’ करणे जेवढे कठीण असते तेवढेच ‘एकता’ टिकवणे अधिक कठीण असते. तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. संयम व मैत्री या गणितावर तुम्ही तुमचे वर्चस्व निर्माण करू शकता. मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायातील समस्या सोडविण्याची आशा निर्माण होईल.
शुभ दिनांक – २९, ३०.

मिथुन – व्यवहारात चौकस राहा
राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्य करताना ‘एकोपा’ विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात फायद्याचे मृगजळ दिसेल. सावधपणे निर्णय घ्या. व्यवहारात चौकस बुद्धी ठेवा. गर्विष्ठपणा ठेऊन चालणार नाही. वाद वाढेल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. कायद्याचे पालन करा.
शुभ दिनांक – ३१, १.

कर्क – गैरसमज उद्भवतील
लोकांच्या गरजेचा एक एक धागा प्रेमाने गुंफून ‘एकीने’ कार्य करून राजकीय-सामाजिक क्षेत्रात व्यापक यश मिळवा. कुटुंबात अचानक तणाव होईल. वाटाघाटीत आठवडय़ाच्या शेवटी गैरसमज होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात तुमची आक्रमकता कौतुकास्पद ठरेल.
शुभ दिनांक – २८, २९.

सिंह – एकोपा कायम ठेवा
राजकीय-सामाजिक क्षेत्रात एकीने कार्य करा. बेकीचे राजकारण करणाऱयांना कदाचित वेगळा रस्ता दाखवण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. एकोपा भंग होऊ देऊ नका. लोकसंग्रह मोठय़ा प्रमाणात वाढवा. व्यवसायात फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल.
शुभ दिनांक – २७, २८.

कन्या – चौफेर प्रगती होईल
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. क्षेत्र कोणतेही असो चौफेर प्रगती होईल. व्यवसायात जम बसवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात ‘एकीचे’ ध्येय ठेवून कार्यभाग महत्त्वाचा ठरेल. नव्या कार्याचा आरंभ एकीच्या तत्त्वाने केल्यास यश संपादन करता येईल. कुटुंबातील तणाव दूर होतील.
शुभ दिनांक – २८, २९.

तूळ – निर्णयात घाई नको
क्षेत्र कोणतेही असो उतावळेपणा करू नका. निर्णय घेण्याची घाई नको. अविश्वास न दाखवता राजकीय-सामाजिक क्षेत्रात चर्चा करा. विचारांचा समतोल राखा. एकीमध्ये बेकी करणारे लोक ओळखा. रागावर नियंत्रण ठेवा. स्वत:च्या निर्णयाचा पुन्हा विचार करा अन्यथा निर्णय फसू शकतो.
शुभ दिनांक – २९, १.

वृश्चिक – प्रत्यक्ष कृतीकडे लक्ष द्या
वाटाघाटीत फायदा होईल. घर, जमिनीसंबंधी कामे लवकर करून घ्या. एकवटलेले मुंग्याचे बळ बलशाली हत्तीलासुद्धा हतबल करू शकते. बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त लक्ष द्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील यश सोपे नाही, जिद्द ठेवा. प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायवुद्धी होईल. शेअर्समध्ये फायदा दिसेल.
शुभ दिनांक – ३१, १.

धनु – कामाचा व्याप वाढेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात संघर्ष करावा लागेल. सामाजिक उन्नतीसाठी एकत्वाचे सूत्र धरणे फार महत्त्वाचे आहे. लोकांच्या एकत्रित येण्यानेच तुमचे ध्येय तुम्हाला गाठता येईल. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कलाक्षेत्रात यश मिळेल.
शुभ दिनांक – २७, २.

मकर – विचारपूर्वक योजना आखा
साडेसाती सुरू आहे. साडेसातीमध्ये माणसाला विविध अनुभव घेण्यास मिळतात. त्यामुळे माणूस अधिक कणखर व जिद्दी होतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकांच्या गरजांचा विचार करून योजना बनवा. सहकारी, नेते व जनता यांच्यात जनजागृती करण्यासाठी एकत्वाची मोठी भावना जागृत करा.
शुभ दिनांक – २७, २८.

कुंभ – मतभेद जाणवतील
व्यवसायाला कलाटणी मिळेल. किरकोळ मतभेद भागिदाराबरोबर होऊ शकतात. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाच्या मनात एकसंघतेची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. मोठय़ा प्रमाणात यशाचा वाटा उचलण्यासाठी एकीच यश देऊ शकते. कला-क्रीडा, मतभेद व वादाचे प्रसंग येतील.
शुभ दिनांक – २९, ३१.

मीन – व्यवसायात जम बसेल
घर, समाज, देश यासंबंधी कोणतेही कार्य असो एकोपा फारच महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे आपण विरोधकांना योग्य प्रकारे शह देऊ शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकसंग्रह वाढवा. एकत्रितपणे केलेले कार्य जास्त प्रभावी व उठावदार दिसेल. व्यवसायात जम बसेल.
शुभ दिनांक – २९, ३१.

आपली प्रतिक्रिया द्या