भविष्य – रविवार 3 ते शनिवार 9 मे 2020

5046

>> नीलिमा प्रधान
मेष : विचारांचा गुंता वाढेल
मेषेच्या एकदशात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य बुध युती होत आहे. तुमचे वाढलेले महत्त्व काहींना सहन होणार नाही. व्यवसायात दिशाभूल होण्याची शक्यता. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग होईल. विचारांचा गुंता वाढेल. परंतु प्रश्न सुटतील. टीकेला महत्त्व देऊ नका.
शुभ दिनांक : 3, 6

वृषभ : फाजील आत्मविश्वास नको
स्वराशीत बुध, वृषभेच्या दशमेबाबत मंगळ राश्यांतर, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी फाजील आत्मविश्वास नको. राजकीय सामाजिक क्षेत्रात तुमच्या अधिकारांचा गैरवापर होईल. धंद्यात नमते धोरण ठेवा. वरि…ांचा दबदबा राहील. कलाक्षेत्राला नवा विषय मिळेल.
शुभ दिनांक : 8, 9

मिथुन : सामाजिक प्रति…ा वाढेल
मिथुनच्या भाग्येषात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य बुध युती होत आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात प्रति…ा वाढेल. कठोर वक्तव्य टाळा. प्रवासात धोका वाढेल. सावध राहा. कुटुंबात नाराजी होईल. कायद्याच्या कक्षा ओलांडू नका. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसनाला दूर ठेवा.
शुभ दिनांक : 3, 6

कर्क – वादाचे प्रसंग टाळा
कर्केच्या अष्टमेषात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य, बुध युती होत आहे. बुद्धीचातुर्याने वादाचे प्रसंग टाळा. जनहिताच्या कार्यात पुढे राहाल. लोकप्रियता लाभेल. व्यवसायात नवा विचार फायद्याचा ठरेल. कला-साहित्यात प्रेरणा देणाऱया घटना घडतील. नाविन्यपूर्ण विचार कराल.
शुभ दिनांक : 3, 5

सिंह – विचारांना चालना मिळेल
सिंहेच्या सप्तमेषात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य बुध युती आहे. राजकारणात सौम्य वागून खंबीर नेतृत्व दर्शवाल. विरोधकांना शह देता येईल. प्रवासात सावध राहा. नोकरीत वरि… खुश होतील. विचारांना चालना मिळेल. कला-साहित्यात कल्पनाशक्तीचा उपयोग कराल.
शुभ दिनांक : 5, 6

कन्या – कामावर लक्ष केंद्रित करा
कन्येच्या ष…sशात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. राजकीय सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत अधिकारी वर्गाचा दबदबा राहील. नवीन परिचय होतील.
शुभ दिनांक : 5, 6

तूळ – कामाचा व्याप वाढेल
तुळेच्या पंचमेषात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य बुध युती होत आहे. आठवडयाच्या सुरुवातीला सावधपणे निर्णय घ्या. राजकीय सामाजिक क्षेत्रात खरं खोटं वागणारी माणसं ओळखा. अधिकाराचा गैरवापर नको. भावना व कर्तव्याचा योग्य मेळ घाला.
शुभ दिनांक : 7, 8

वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा
वृश्चिकेच्या सुखेषात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीका होईल. व्यवसायात नियमांचे पालन करा. कलाक्षेत्रात नवीन कल्पना सुचतील. मोठय़ांचा दबाव वाढेल.
शुभ दिनांक ; 3, 4

धनु – ओळखीचा लाभ होईल
धनुच्या पराक्रमात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य बुध युती होत आहे. मनावरील दडपण वाढेल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या ओळखीचा इतरांना लाभ होईल. नवीन परिचयावर विश्वास ठेवू नका. नोकरी, व्यवसायात तुमचा प्रभाव वाढेल. मैत्रीत तणाव जाणवेल.
शुभ दिनांक : 3, 5

मकर – प्रेरणादायी घटना घडेल
मकरेच्या धनेषात मंगळ, वृषभेत बुध राश्यांतर, सूर्य बुध युती होत आहे. साडेसाती सुरु आहे. कोणतेही वक्तव्य सावधपणे करा. वागण्या-बोलण्यावर संयम ठेवा. सामाजिक क्षेत्रात सहकारी मदत करतील. कलाक्षेत्रात प्रेरणा देणारी घटना घडेल.
शुभ दिनांक : 5, 6

कुंभ – व्यवसायातील समस्या सोडवाल
स्वराशीत मंगळ राश्यांतर, वृषभेत बुध प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. स्वत:चे हित साधणाऱया व्यक्तींना संधी देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पष्ट बोलणे वादग्रस्त ठरेल. व्यवसायातील समस्या सोडवाल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील.
शुभ दिनांक : 6, 7

मीन – प्रगतीची संधी लाभेल
मीनेच्या व्ययेष्यात मंगळ राश्यांतर, सूर्य बुध युती होत आहे. प्रगतीची नवी संधी लाभेल. सहनशीलता व संयम बाळगा. अतिउत्साह त्रासदायक ठरेल. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य सुरु ठेवा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. कलाक्षेत्रात नावीन्याला वाव मिळेल.
शुभ दिनांक : 5, 8

आपली प्रतिक्रिया द्या