भविष्य : रविवार १२ ते शनिवार १८ ऑगस्ट २०१८

42

>> नीलिमा प्रधान

मेष – मतभेद होतील
मेषेच्या पंचमेषात सूर्य-चंद्र-गुरू युती होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्या डावपेचांना थोडा विलंब झाला तरी यश मिळेल. सामाजिक कार्यात मतभेद होतील. व्यवसायाला नवी दिशा लाभेल. कोर्टकेसमध्ये सबुरी ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रांत मेहनत घ्या.
शुभ दिनांक : १६, १७.

वृषभ – दूरदृष्टी बाळगा
वृषभेच्या षुखेषात सूर्य प्रवेश, चंद्र-शुक्र युती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच महत्त्वाचा निर्णय घ्या. व्यवसायात सातत्य ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत दूरदृष्टिकोन ठेवा. नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. कोर्टकेसमध्ये योग्य मुद्दे मांडा.
शुभ दिनांक : १४, १५.

मिथुन – अधिकार लाभतील
मिथुनेच्या पराक्रमात सूर्य प्रवेश, चंद्र- शुक्र युती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत अधिकार वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही योजलेल्या कार्यात मनाप्रमाणे यश मिळेल. व्यवसायात मोठा फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रांत घेतलेले परिश्रम सत्कारणी लागतील. खरेदी-विक्रा होईल.
शुभ दिनांक : १३, १४.

कर्क – महत्त्वाचा प्रश्न निकालात काढाल
कर्केचा धनेषात सूर्य प्रवेश, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी संकटातून मार्ग शोधता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचा प्रश्न धसास लावता येऊ शकतो. व्यवसायात प्रगती व फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कलाक्षेत्रांत पुरस्कार मिळेल.
शुभ दिनांक : १३, १४.

सिंह – संधीची वाट पाहा
स्वराशीत सूर्य प्रवेश, चंद्र-शुक्र युती होत आहे. तुमच्या कर्तृत्वाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तडफदार धोरण स्वीकारण्याची वेळ तुमच्यावर येईल. व्यवसायात संधीची वाट पाहा. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करा. कलाक्षेत्रांत कल्पनाशक्तीचे कौतुक होईल.
शुभ दिनांक : १६, १७.

कन्या – महत्त्वाचा निर्णय घ्याल
कन्येच्या व्ययेषात सूर्य प्रवेश, चंद्र-गुरू युती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आठवडय़ाच्या सुरुवातीला एखादा तिढा वाढू शकतो. तुमच्यावर टीकात्मक आरोप होईल. प्रराजकारणाला नवी दिशा मिळेल. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय याच आठवडय़ात घ्या. सुखद समाचार मिळेल.
शुभ दिनांक : १४, १५.

तूळ – प्रयत्नांचा वेग वाढवा
तुळेच्या एकादशात सूर्य प्रवेश, चंद्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. ग्रहांची साथ असताना तुम्ही प्रयत्नांचा वेग वाढवण्याची गरज असते. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमची प्रतिष्ठा वाढेल. जबाबदारी स्वीकारून कार्य करावे लागेल. व्यवसायात जम बसण्यास सुरुवात होईल. कलाक्षेत्रांत उन्नती.
शुभ दिनांक : १२, १३.

वृश्चिक – चुका सुधारण्याचा प्रयत्न करा
वृश्चिकेच्या दशमेषात सूर्य प्रवेश, चंद्र-शुक्र युती होत आहे. दुसऱयावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या कार्यपद्धतीत चांगला बदल करून पूर्वीच्या चुका राजकीय-सामाजिक क्षेत्रांत सुधारण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात सुधारणा होतील.. कोर्टकेसमध्ये सावध रहा.
शुभ दिनांक : १३, १४.

धनु – योजना गतिमान होतील
धनुच्या भाग्येषात सूर्य प्रवेश, चंद्र-शुक्र युती होत आहे. व्यवसायात निश्चित धोरण ठरवता येणे कठीणच आहे. प्रयत्न करणे हाच उपाय असू शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वेगळीच दिशा मिळेल. तुमच्या योजनेला गतिमान करता येईल. स्वतःचे अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करा. ताणतणाव कमी होईल.
शुभ दिनांक : १६, १७.

मकर – व्यवसायात संधी मिळेल
मकरेच्या अष्टमेषात सूर्य प्रवेश, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचा निर्णय घ्या. चर्चा करून योजनांची आखणी करा. साडेसातीच माणसाला वेगवेगळय़ा प्रकारचे शहाणपण शिकवत असते. कुणालाही कमी लेखू नका. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात चांगली संधी मिळेल.
शुभ दिनांक : १४, १५.

कुंभ – सकारात्मक घडामोडींचा काळ
कुंभेच्या षष्टमेषात सूर्य प्रवेश, चंद्र-गुरू युती होत आहे. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. व्यवसायात अस्थिरता राहील. प्रगतीची संधी समोर दिसेल, परंतु निर्णय घेता येणार नाही. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत हळूहळू मार्ग खुला होईल. चौफेर यशाची घोडदौड करण्यासाठी सिद्ध राहा. संधी सोडू नका.
शुभ दिनांक : १७, १८.

मीन – खंबीर राहा
मीनेच्या षष्ठेत सूर्य प्रवेश, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. व्यवसायाची गती मंदावण्याची शक्यता आहे. जवळचे प्रतिस्पर्धी निष्कारण समस्या निर्माण करतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत गैरसमज करून देण्याचा प्रयत्न होईल. मात्र सावध व खंबीर राहा. योग्य पद्धतीनेच पुढे जा.
शुभ दिनांक : १४, १५.

आपली प्रतिक्रिया द्या