भविष्य- रविवार ८ ते शनिवार १४ एप्रिल २०१८

50

>>नीलिमा प्रधान

मेष -कार्याला दिशा मिळेल
तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. राजकीय क्षेत्रात तुम्ही टाकलेले डावपेच प्रभावी ठरतील. सामाजिक कार्यात लोकांना प्रेमाने जिंकता येईल. योजना गतिमान होतील. नोकरीत सप्ताहाच्या शेवटी कटकटी वाढतील. क्रीडा क्षेत्रात एखादा विक्रम होईल. नवीन परिचय उन्नतीकारक ठरेल.
शुभ दिनांक – ९, १०.

वृषभ -जिद्द बाळगा

आठवडय़ाच्या सुरुवातीपासून महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. अनाठाई खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. राजकाrय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे पटवून देता येतील. कोर्ट पेससंबंधी कामे होतील. कला, क्रीडा क्षेत्रात जासत धावपळ होईल. प्रपृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते.
शुभ दिनांक – ९, १०.

मिथुन – अधिकारांचा वापर करा

क्षेत्र कोणतेही असेल, तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध करा. तुमचे स्थान तयार करा. संधी कमी वेळ असते. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकाराचा योग्य वापर करा. व्यवसायात जम बसेल. मोठे भागीदार मिळतील. व्यापक दृष्टीकोन ठेवा. स्वप्ने पूर्ण होतील.
शुभ दिनांक – ८, १२.

कर्क – सकारात्मक काळ

कौटुंबिक वाटाघाटीचा तणाव होईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. मोठय़ा लोकांचा सहवास उत्साहवर्धक राहील. सामाजिक कार्याचा विस्तार करता येईल. आर्थिक सहाय्य मिळू शपेल. कला, क्रीडा क्षेत्रात विशेष यश व प्रगती. नावलौकिकात भर पडेल. नोकरीसंबंधी कामे होतील.
शुभ दिनांक – ९, १०.

सिंह – मनोबल राखा

राजकीय क्षेत्रात तुम्ही तुमच्या पद्धतीने कार्याची आखणी करा. नवीन मुद्दे तयार करा. वरिष्ठांची मर्जी राखणे कठीण आहे. सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. तुमचा आत्मविश्वास खचविण्याचाप्रयत्न होईल. मन अस्थिर राहील. नवीन काम मिळेल.
शुभ दिनांक – ८, १२.

कन्या – डावपेच ओळखा

तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाचे काम प्रथम मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात जवळची माणसे तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात लोकांच्या भूमिका समजून घ्या. व्यवसायात खर्च वाढेल. कुटुंबात तुमच्यावर आरोप होईल. कोर्टाच्या कामात तत्परता दाखवा.
शुभ दिनांक – ९, १०.

तूळ -कामाचा व्याप वाढेल

राजकीय क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. तुमची निवड महत्त्वाच्या कामासाठी होईल. सामाजिक कार्यात कामाचा व्याप वाढेल. तुमचे वर्चस्व कमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न होईल. सर्वच ठिकाणी संयमाने वागा. एखादे धंद्यातील मार्गी लागणारे काम कधी पूर्ण होईल अशी चिंता वाटेल.
शुभ दिनांक – ८, १२.

वृश्चिक – योजनांची आखणी करा

या आठवडय़ामध्ये महत्त्वाची कामे करून घ्या. आप्तेष्ठांच्या कामात मदत आर्थिक सहाय्य करावे लागेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाची चर्चा करा व निर्णय घ्या. सामाजिक कार्याचा आढावा घेऊन योजनांची पूर्ती करा. लोकांचा विरोध हळूहळू वाढणार आहे. प्रगतीची संधी कुठेही सोडू नका.
शुभ दिनांक – ८, ९.

धनु – इतरांचे सहकार्य लाभेल

तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. विरोधकांना सौम्य शब्दांत बोलून गप्प करता येईल. थोरामोठय़ांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तुम्ही ठरवलेला राजकीय कार्यक्रम साजरा होईल, यश मिळेल. सामाजिक कार्यात आर्थिक सहाय्य मिळाल्याने योजना मार्गी लागतील.
शुभ दिनांक – १२, १४

मकर – रागावर नियंत्रण ठेवा

आठवडय़ाच्या प्रत्येक दिवसाला प्रगतीचा उच्चांक वाढू शकतो. तुमच्या रागाचा पारा वाढेल. सामाजिक कार्यात लोक उलटसुलट बोलतात. राजकीय क्षत्रात तुमचे महत्त्व वाढेल. थोरामोठय़ांच्या सहकार्याने योजना व कामे करून घेता येतील. क्रीडा क्षेत्रात तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक – ११, १२.

कुंभ – वर्चस्व वाढेल

आठवडय़ाच्या मध्यावर तुमच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न होईल. सामाजिक कार्याला गती मिळेल. तुमची लोकप्रियता वाढवण्यासाठी चौफेर प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. क्षेत्र कोणतेही असले तरी प्रगतीचा मार्ग विस्तीर्ण होईल. त्याचा फायदा कला-क्रीडा क्षेत्रात करून घ्या.
शुभ दिनांक – ८, १४.

मीन – अधिकार लाभतील

व्यवसायात जम बसेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोकांच्या उपयोगी पडेल अशा पद्धतीचे कार्य तुमच्याकडून होईल. राजकीय क्षेत्रात अधिकार मिळण्याची शक्यता दिसेल. वरिष्ठ तुमच्या बाजूने बोलतील. कार्याचे कौतुक होईल. जमिनीच्या खरेदी-विक्रीत मोठा फायदा होईल.
शुभ दिनांक – ९, १४.

आपली प्रतिक्रिया द्या