रविवार १५ एप्रिल ते शनिवार २१ एप्रिल २०१८

103

>>नीलिमा प्रधान

मेष – वर्चस्व सिद्ध होईल
क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कार्याच्या कक्षा व्यापक स्वरूप घेतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध होईल. अक्षयतृतीयेदिवशी तुमच्या सामाजिक कार्याचा आरंभ करा. व्यवसायात मोठी संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नामवंताचा सहवास लाभेल.
शुभ दिनांक – १७, १८

वृषभ – मनोबल वाढवा
आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमच्या अडचणी वाढतील. राजकीय क्षेत्रात अधिकार मिळण्याची शक्यता असली तरी विरोधक आक्रमक होतील. सामाजिक कार्यात घेतलेली जबाबदारी पूर्ण करणे सोपे नाही. कोर्ट केसमध्ये अडचणी वाढतील. व्यवसायात गुंतवणूक करण्याची घाई नको. कौटुंबिक समस्या वाढेल. शुभ दिनांक – २०, २१

मिथुन – अधिकार लाभतील
आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. अधिकार मिळेल. सामाजिक क्षेत्रात आर्थिक मदत मिळेल. व्यापक स्वरूपात कार्य करून तुमचा प्रभाव वाढवा. लोकप्रियता मिळेल. व्यवसायात फायदा होईल. कलाक्षेत्रात मनाप्रमाणे कामे होतील.
शुभ दिनांक – १५, १७

कर्क – नव्या कार्याचा आरंभ
राजकीय क्षेत्रात तुमच्या कार्याची प्रशंसा होईल. मान-सन्मान मिळेल. सामाजिक क्षेत्रात नवीन दर्जेदार लोकांचा परिचय उत्साहवर्धक ठरेल. नव्या कार्याचा आरंभ अक्षयतृतीयेच्या दिवशी करू शकाल. व्यवसायात मोठा बदल होऊन नवे काम मिळेल. कोर्ट केसमध्ये सावध रहा.
शुभ दिनांक – १७, १८

सिंह – डावपेच यशस्वी होतील
सामाजिक कार्याची अंमलबजावणी तुमच्या मतानुसार होईल. मान-प्रतिष्ठा वाढेल. राजकीय क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. लोकप्रियता वाढेल. व्यवसायात नवीन गुंतवणूकदार मिळतील. शेअर्समध्ये लाभ मिळेल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. केस संपवण्याचा आटोकाट प्रयत्न करा.
शुभ दिनांक १८, १९

कन्या – संयमाने बोला
कन्येच्या भाग्येषात शुक्र प्रवेश, सूर्य-हर्षल युती होत आहे. राजकीय क्षेत्रात परस्पर विरोधी घटना घडण्याची शक्यता आहे. मिळालेला मान-सन्मान टिकविण्याचा प्रयत्न करा. उलटसुलट डावपेच टाकण्यापेक्ष सामाजिक कार्याचा वेग वाढवा. लोकांच्या उपयोगी येतील अशा योजना करा. संयमाने बोला.
शुभ दिनांक – १८, २०

तूळ – संमिश्र कालावधी
रेंगाळत राहिलेली कामे करता येतील. राजकीय क्षेत्रात तुमचे महत्त्व वरिष्ठांच्या लक्षात येईल. अधिकार मिळेल. खरेदी-विक्रीत फायदा होईल. व्यवसायात जम बसेल. कोणताही करार करताना कायदेशीर सल्ला घ्या. कुटुंबात किरकोळ वाद होतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – १७, २१

वृश्चिक – निर्णयात सावधगिरी बाळगा
तुम्हाला तुमच्या ध्येयपूर्तीसाठी भरपूर परिश्रम घ्यावयाचे आहेत. राजकीय क्षेत्रात तुमचे निर्णय चुकीचे ठरतील. सामाजिक क्षेत्रात खर्च वाढेल. हिशेबात चोख रहा. व्यवसायात नवे तंत्र समोरून तुमच्याकडे येईल. कला-क्रीडा क्षेत्रात अचानक कलाटणी मिळेल. कोर्ट केससंबंधी कामात जबाबदारी वाढेल.
शुभ दिनांक – १८, १९

धनु – पदाधिकार लाभतील
कौटुंबिक कार्यात जबाबदारी स्वीकारावी लागेल. राजकीय क्षेत्रात तुमचा निर्णय कौतुकास्पद ठरेल. पदाधिकार मिळेल. सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारे प्रतिष्ठत लोक सहकार्य करतील. तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे याची खात्री पटेल. कोर्ट कसेमध्ये गुप्त कारवाया होतील.
शुभ दिनांक – १७, २१

मकर – प्रेरणादायी घटना घडतील
तुमच्या मदतीसाठी मोठय़ा व्यक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहतील. राजकीय क्षेत्रात धाडसी निर्णय घेण्याची वेळ विरोधक आणतील. सामाजिक कार्यात व्यापक स्वरूपाचे कार्य होईल. प्रेरणादायी घटना घडतील. कौटुंबिक वाटाघाटीसंबंधी प्रश्न निघेल. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. कलाक्षेत्रात नावीन्य देण्याचे ठरवाल.
शुभ दिनांक – १८, १९

कुंभ – नवीन योजना राबवाल
ठरविलेल्या कार्यक्रमाची पूर्तता कराल. राजकीय क्षेत्रात तुमचे अस्तित्व अधिक उठून दिसेल. बौद्धिक चमक दिसेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. सामान्य जनतेसाठी कशा प्रकारे योजना राबवता येईल यावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायाला गती मिळेल. नोकरीत चांगला बदल शक्य होईल.
शुभ दिनांक – २०, २१.

मीन – वरिष्ठांचे सहकार्य लाभेल
नवा दृष्टिकोन तुमच्या कार्यासाठी तुम्हाला मिळेल. व्यवसायात जम बसेल. भागीदार मिळतील. राजकीय क्षेत्रात तुमच्या कार्याचा आढावा घेऊन पद देण्याची घोषणा वरिष्ठ करतील. सामाजिक कार्यात थोरा-मोठय़ांचे सहकार्य मिळेल. नावलौकिक मिळेल. परदेश प्रवासाची संधी मिळेल.
शुभ दिनांक – १८, १९

आपली प्रतिक्रिया द्या