साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 26 जुलै ते शनिवार 1 ऑगस्ट 2020

>> नीलिमा प्रधान

मेष – रागावर नियंत्रण होईल

मेषेच्या पराक्रमात शुक्र, सुखेशात बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात कार्य करताना सहनशीलता ठेवा. व्यवसाय व नोकरीत तणाव जाणवू शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. जुन्या अनुभवाचा उपयोग होईल. रागावर नियंत्रण होईल. प्रवासात दगदग होईल. सावध राहा. शुभ दिनांक – 27, 1

वृषभ – सुखद समाचार मिळतील
वृषभेच्या धनेशात शुक्र, पराक्रमात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसाय, नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. चर्चा यशस्वी होतील. नवीन परिचयाचा उद्योगधंद्यात उपयोग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती द्या. कुटुंबात सुखद समाचार मिळतील. कला- साहित्यात नावीन्य दाखविता येईल. शुभ दिनांक – 29, 30

मिथुन – कार्याला गती येईल
स्वराशीत शुक्र, मिथुनेच्या धनेशात बुध राश्यांतर तुमच्या प्रत्येक कार्याला गती देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेता येतील. व्यवसायात सुधारणा होईल. गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. कला-साहित्याला प्रेरणा देणारी घटना घडेल. शुभ दिनांक – 26, 27

कर्क – व्यवसायात पर्याय शोधा
कर्केच्या व्ययेष्यात शुक्र, स्वराशीत बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात नवा पर्याय शोधा. नोकरीतील चूक सुधारता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. मात्र व्यवहारात सावध राहा. फसगत टाळा. कौटुंबिक तणाव व समस्या कमी होतील. साहित्याला नवा विषय मिळेल. शुभ दिनांक ः 28, 29

सिंह – प्रकृतीला जपा
सिंहेच्या एकदशात शुक्र, व्ययेष्यात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात अहंकाराची भाषा दूर ठेवा. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दौऱयात काळजी घ्या. प्रकृतीची हेळसांड नको. राजकारणात राग वाढवणारी घटना घडेल. नोकरीच्या कामात दक्ष राहा.
शुभ दिनांक – 26, 27

कन्या – कला-साहित्यात प्रगती होईल
कन्येच्या दशमेशात शुक्र, एकादशात बुध राश्यांतर होत आहे. या आठवडय़ात महत्त्वाची कामे करून टाका. परिचयातून नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांना मदत करताना सावध राहा. कला-साहित्यात प्रगती होईल. शुभ दिनांक – 27, 28

तूळ – प्रगतीची संधी मिळेल
तुळेच्या भाग्येशात शुक्र, दशमेशात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायाला गती मिळेल. क्षेत्र कोणतेही असो प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विशेष घटना घडतील. जनहिताचे कार्य सुरूच ठेवा. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. कला-साहित्यात चांगले काम होईल. शुभ दिनांक – 28, 29

वृश्चिक – व्यवहारात सावध राहा
वृश्चिकेच्या अष्टमेशात शुक्र, व्यवसायाला नवे वळण मिळेल. भावनेच्या आहारी जाऊन व्यवहारात फसू नका. कायदा पाळा. नोकरीत महत्त्वाच्या कामात प्रगती कराल. वरिष्ठ खूष होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात फसवणूक होण्याची शक्यता. कठोर वक्तव्य करणे टाळा.
शुभ दिनांक – 31, 1

धनु – कायद्याचे पालन करा
धनु राशीच्या सप्तमेशात शुक्र, अष्टमेषात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात क्षुल्लक कारणावरून तणाव होतील. नोकरीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्या. सामाजिक क्षेत्रात तुम्ही काढलेले मुद्दे निष्प्रभ ठरतील. रागावर ताबा ठेवा. कला- साहित्यात प्रगती होईल. शुभ दिनांक – 26, 27

मकर – वेगळी वाटचाल सुरू कराल
मकरेच्या षष्ठsशात शुक्र, सप्तमेशात बुध प्रवेश करीत आहे. व्यवसायात सुधारणा करण्याची संधी मिळेल. तडजोड करून निर्णय घ्यावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. वेगळी वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल. कलाक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल.  शुभ दिनांक – 27, 28

कुंभ – मनोबल टिकवून ठेवा
कुंभेच्या पंचमेशात शुक्र, षष्ठsशात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात गैरसमज होतील. नव्या चर्चा वाद निर्माण करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व डावलण्याचा प्रयत्न होईल. टीका होईल. मनोबल टिकवून ठेवा परंतु आक्रमकता नको. शुभ दिनांक – 27, 28

मीन – सुखद घटना घडेल
मीनेच्या सुखेशात शुक्र, पंचमेशात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. जनहिताच्या कार्याला वेग येईल. आठवडय़ाच्या सुरुवातीला वाद होतील. मागील येणे वसूल करा. कुटुंबात सुखद घटना घडेल. शुभ दिनांक – 26, 29

आपली प्रतिक्रिया द्या