साप्ताहिक राशिभविष्य 02 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2019

3388

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – लोकप्रिय व्हाल
धर्म, अध्यात्म, राजकारण या गोष्टींकडे ओढ वाढेल, पण राजकारणापासून सुरक्षित अंतर ठेवा. विरोधकांना मात द्याल. आपल्या कामात यश मिळेल. गायीला गूळपोळीचा गोग्रास द्या. पिवळा रंग जवळ बाळगा. सहकाऱ्यांमध्ये लोकप्रियता वाढेल.
शुभ परिधान – चांदीचे दागिने, मलमलचा कुर्ता

वृषभ – नव्या ओळखी
नशिबाची उत्तम साथ या आठवडय़ात लाभणार आहे. जे नवीन काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. नव्या ओळखीतून नवा मित्रपरिवार जोडला जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – धोतर, झब्बा

मिथुन – पगार वाढेल
अत्यंत उत्साहाचे वातावरण राहील. आरोग्यही उत्तम राहील. त्यामुळे प्रत्येक कामात उत्साह वाढेल. वरिष्ठ कामावर खूश राहतील. त्यामुळे आर्थिक लाभही होईल. वेतन वाढण्याची शक्यता. गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके घेऊन द्या. लाल रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पैठणी, पर्स

कर्क – उत्तम साथ
नव्या वर्षात अनेक नव्या बदलांना सामोरे जाल. त्यामुळे घरीदारी प्रसन्नतेचे वातावरण राहील. पती-पत्नीमधील नाते भावनिक पातळीवर खुलेल. एकमेकांना उत्तम साथ द्याल. गप्पागोष्टींचा आस्वाद घ्याल. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – शिफॉनची साडी, मोती

सिंह – मदत मिळेल
हातची संधी दवडू नका. महत्त्वाच्या कामात मित्रांची मदत लाभेल. या मदतीचे दूरगामी सकारात्मक परिणाम होतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल, पण पैशाचा अपव्यय होऊ देऊ नका. घरच्यांचा पाठिंबा लाभेल. लिंबाचा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – डिझायनर दागिने, माणिक

कन्या – मनसामर्थ्य वाढेल
एखादा संकल्प मनाशी जरूर बाळगा. नशिबाची साथ लाभेल. अचानक धनलाभ होईल. रागावर नियंत्रण ठेवा. घरातील शंखाची पूजा करा. मनसामर्थ्य वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. सकाळी चालायला जाण्याचा नेम ठेवा. गुलाबी रंग शुभ ठरेल.
शुभ परिधान – बांगडी, कडे

तूळ – आर्थिक नफा
कुटुंबासमवेत वेळ मजेत जाईल. केलेल्या परिश्रमांचे सार्थक होईल. घरातील व्यवसाय, उद्योगात चांगला आर्थिक नफा होईल. त्यामुळे मनास उभारी मिळेल. नावडत्या माणसांना टाळण्यात यशस्वी व्हाल. भगवा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – हिरा, मंगळसूत्र

वृश्चिक – नव्या योजना
तरुणाईने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. मनोवंचित फळ मिळणार आहे. फक्त प्रयत्नात कसूर नको. लोकरी वस्त्र्ाांचे दान करावे. खूप फायदा होईल. निळा रंग जवळ बाळगा. घरात आनंदी वातावरण राहील. सगळे एकत्र नव्या योजनांना सामोरे जाल.
शुभ परिधान – शालू, सोन्याचे वळे

धनु – दागिने खरेदी
शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीस या आठवडय़ात उत्तम अर्थप्राप्ती होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतील यश त्यांचेच आहे. एखाद्या आजारी गरजू व्यक्तीस मदत करा. घरातील स्त्रियांसाठी दागिना खरेदीचा योग आहे. सोनेरी रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – सुवर्णालंकार, नथ

मकर – जमीन खरेदी
मासिक उत्पन्नात वाढ होईल. त्यातूनच वास्तू खरेदीचा योग आहे. छोटीशी जमीन खरेदी कराल. त्यानिमित्ताने शहराबाहेर जाणे झाल्याने मन प्रसन्न होईल. सुवार्ता कानावर येतील. लाल रंग जवळ बाळगा. आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करा.
शुभ परिधान – घडय़ाळ, रुमाल

कुंभ – भरघोस यश
मनात उत्साह भरून राहील. हा आठवडा परोपकाराचा आहे. गरजूंची मदत अवश्य करा. स्पर्धा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळेल. अभ्यासात कसूर नको. हिरवा रंग जवळ बाळगा. व्यायामात सातत्य ठेवा.
शुभ परिधान – लिपस्टिक, रेशमी वस्त्र

मीन – उत्साह मिळेल
या आठवडय़ात बाहेरगावी जाण्याचा योग आहे. मनपसंत ठिकाणी जाल. त्यामुळे मरगळलेल्या मनास उत्साह मिळेल. घरात एखादे शुभकार्य होईल. वातावरण पवित्र आणि प्रसन्न राहील. मारुतीची उपासना करा. लक्ष्यावर ठाम राहा. शेंदरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – अष्टगंध, सुगंध

समस्या –
घरात शांतता नाही. सतत भांडणं होतात.- राजीव धोकटे
तोडगा – सर्वांनी मिळून रोज रात्री देवासमोर बसून रामरक्षा म्हणावी. देवघरात रामायणाचा ग्रंथ ठेवा आणि त्याची पूजा करा.

समस्या, प्रश्न, अडचणी मानवी जगण्याचा भाग… थोडी उपायांची दिशा मिळाली की प्रश्नही आपसूकच सुटतात. आपल्या समस्या, प्रश्न ‘bhavishyafulora1234 @gmail.com’ या ईमेल आयडीवर किंवा दै. ‘सामना’च्या पत्त्यावर आपल्या छायाचित्रासह पाठवा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या