साप्ताहिक राशिभविष्य – 29 फेब्रुवारी ते 6 मार्च 2020

5213

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष
जोडीदारासोबत राहा
परिस्थितीनुरूप स्वभावात लहरीपणा येईल. त्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या जोडीदाराला वेळ द्या. नात्याचे भावबंध दृढ होतील. पोवळे जवळ बाळगा. शुभ अलंकार – पोवळय़ाचे मंगळसूत्र, ब्रोच.

वृषभ
मोलाचा सल्ला
विचारपूर्वक गुंतवणूक करा. घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. खूप दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील. शुभ रत्न हिरा.
शुभ अलंकार – बोरमाळ, नथ.

मिथुन
अमूल्य गोष्ट
जुन्या आठवणींमध्ये रमाल. शुभ रत्न पाचू. कामाचा वेळ फुकट घालवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मौल्यवान गोष्ट गवसेल.
शुभ अलंकार – सुवर्णफूल, चांदीचे कडे.

कर्क
पुढील तरतूद
कामाचा ताण आणि वरिष्ठांचे दडपण जाणवेल. मोती रत्न शुभ आहे भविष्यकालीन तरतूद कराल. चित्तवृत्ती प्रसन्न राहतील.
शुभ अलंकार – मोत्याच्या कुडय़ा, भिकबाळी.

सिंह
यश तुमचेच
सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. योग्य दिशेने प्रयत्न सुरू ठेवा. यश तुमचे आहे. संधीचा लाभ अवश्य घ्या. शुभ रत्न माणिक.
शुभ अलंकार – कंगन, अंगठी.

कन्या
लाभ होणार
कोणतीही गोष्ट शांत डोक्याने करा. गृहिणीने घरातील व्यक्तींसाठी उत्तम स्वयंपाक करावा. अनपेक्षित लाभ होतील. शुभ रत्न पाचू.
शुभ अलंकार – तन्मणी, बिंदी.

तूळ
नवे काम
घरातील लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील. विठोबाची उपासना मनोभावे करा. आर्थिक लाभ होतील. नवे काम मिळेल. शुभ रत्न हिरा.
शुभ अलंकार – झुमके, पैंजण.

वृश्चिक
पैसे येतील
जुनी देणी परत येतील. नव्या कल्पना अमलात आणाल. आत्मविश्वास वाढेल. पोवळे रत्न शुभ ठरेल.
शुभ अलंकार – तांब्याचे कडे, चांदी.

धनु
वेळ पाळा
मन शांत राहील. घरात छोटीशी पूजा करा. सकारात्मक ऊर्जा वाढेल. कामाच्या ठिकाणी वेळ पाळा. पुष्कराज जवळ बाळगा.
शुभ अलंकार – कमरपट्टा, गोफ.

मकर
घरच्यांची काळजी
व्यावसायिक सबंध सुधारतील. घरातील कुटुंबीयांची काळजी घ्या. योग्य ठिकाणी पैसे खर्च करा. शुभ रत्न नीलम.
शुभ अलंकार- सोनेरी घडय़ाळ, नेकलेस.

कुंभ
प्रेमाचा आठवडा
मन शांत ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. नवविवाहितांसाठी प्रेमाचा आठवडा. जोडीदाराला वेळ द्या. हिरा जवळ बाळगा.
शुभ अलंकार – सोन्याची अंगठी, कडे.

मीठ
संधीचा फायदा
नवी ऊर्जा मिळेल. स्वतःकडे लक्ष द्या. आलेली संधी दवडू नका. पुष्कराज रत्न जवळ ठेवा.
शुभ अलंकार – डिझायनर दागिने, गणपतीचे पेंडंट.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या