साप्ताहिक राशिभविष्य – 8 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी 2020

5422

>> मानसी इनामदार

मेष – ज्येष्ठांचा सल्ला
तुमचे प्रभावी व्यक्तिमत्त्व या आठवडय़ात झळाळून उठेल. व्यावसायिक कामकाजात ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. घरातील गृहिणीने प्रकृतीस जपावे. चुलीजवळ वावर जपून असावा. अबोली रंग जवळ बाळगा. प्रत्येक कामात यश मिळेल.
शुभ परिधान – नेलपेंट, शाल

वृषभ – कौतुक होईल
नव्या कल्पना सुचतील. त्यातून सन्मान, मान, प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयात कामाचे कौतुक होईल. बरीचशी प्रलंबित कामे या आठवडय़ात पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदार महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी असेल. त्याची उणीव जाणवेल. लाल रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – चमेलीचा गजरा, अत्तर

मिथुन – यश तुमचेच
शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी फार चांगला आठवडा. विद्यार्थ्यांसाठीही उत्तम कालखंड. जोमाने नव्या अभ्यासास लागा. यश तुमचेच आहे. नव्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील. आर्थिक व्यवहार जपून करावेत. पांढरा रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – रेघांचा शर्ट, सोन्याचा अलंकार .

कर्क – मातीशी जवळीक
कुटुंबीयांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरेल. त्यांना विश्वासात घ्या. काही महत्त्वाची कामे ही सामान्य, अनपेक्षित माणसांकडून होतील. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. सर्दी पडशाचा त्रास संभवतो. तपकिरी रंग जवळ बाळगा. मातीशी संपर्क येऊ द्या.
शुभ परिधान – खादीची वस्त्रे, मोती.

सिंह – महत्त्वाचे व्यवहार
कोणावरही अतिरिक्त विश्वास ठेवू नका. घरातच अशी व्यक्ती असेल जिला तुम्ही विश्वासात घेऊ शकता, पण बाहेर जपून वावर. काही महत्त्वाचे व्यवहार पार पडतील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. ज्येष्ठांची काळजी घ्या. पिवळा रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – कुर्ता, मंगळसूत्र.

कन्या – शुभ समाचार
बऱयाचशा कौटुंबिक समस्या तुमच्यामुळे सुटतील. त्यामुळे तुमचे कौतुक होईल. घरात मान वाढेल. शुभ समाचार कानावर येतील. त्यामुळे मन प्रसन्न होईल. तुळशीचे पूजन करा. हिरवा रंग महत्त्वाचा. रखडलेली कामे होतील.
शुभ परिधान – शालू, काचेच्या बांगडय़ा.

तूळ – आनंदी क्षण
दूरचा प्रवास घडेल. कुटुंबीयांसमवेत आनंदाचे क्षण अनुभवाल. त्यामुळे वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. मेहनत वाया जाणार नाही. घरात नवी खरेदी होईल. लहानांचे हट्ट पुरवाल. केशरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – मोठय़ा काठाची साडी, कुंकू.

वृश्चिक – मेजवानी घडेल
या आठवडय़ात आप्त-स्वकियांना भेटण्याचा योग येईल. मेजवानीचा प्रसंग येईल. तुम्हीही त्यात सक्रिय सहभागी व्हाल. त्यामुळे वेळ सत्कारणी लागल्यासारखे होईल. निळा रंग महत्त्वाचा. रोज रात्री रामरक्षा म्हणा.
शुभ परिधान – डिझायनर गाऊन, चांदीचे कडे.

धनु – नवी ऊर्जा
क्रोधापासून लांब राहा. उगीच चिडचिड होईल. घरात, बाहेर रागावर नियंत्रण ठेवा. त्यातून तुमचाच फायदा होईल. कृतीवर भर द्या. नव्या ऊर्जेचा संचार होईल. त्यामुळे कामात उत्साह जाणवेल. नेहमीपेक्षा जास्त चांगले काम हातून होईल. नारिंगी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – कमरपट्टा, आवडीचे कपडे

मकर – महत्त्वाचे निर्णय
मन उगाच द्विधा होईल, पण त्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय घ्याल. घरातील मुलींकडे लक्ष द्या. त्यांना तुमची गरज असेल. त्यांचा मानसिक आधार व्हा. त्यामुळे मनास समाधान लाभेल. चंदेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पैंजण, रेशमी झब्बा

कुंभ – मानसिक बळ
आत्मविश्वास वाढेल. त्यातून महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम कराल. वस्तुस्थितीची जाणीव होईल. जवळची व्यक्ती दुरावेल. मनाचे श्लोक म्हणा. त्यामुळे मानसिक बळ वाढेल. त्यातून सामर्थ्य वाढेल. शत्रूच्या कारवायांवर लक्ष ठेवा. पिस्ता रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – ब्लेझर, सुगंध

मीन – काम आटोक्यात
कामाचा ताण वाढेल, पण तुमच्या धडाकेबाज कृतीने काम आटोक्यात आणाल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. यश मिळेल. शारीरिक ताण वाढेल, पण काळजी नको. पायांची काळजी घ्या. त्यावर ताण वाढेल. मर्दन करून घ्या. आमरशी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – खेळाचे कपडे, स्पोर्टस् शूज

समस्या – खूप वर्ष जागेचा खटला न्यायालयात रखडलेला आहे. खूप पैसे खर्च झाले आहेत. काही उपाय सांगा.
-सुमंगला कानेटकर, दापोली
तोडगा – खटल्याची कागदपत्रे एकत्र करुन देवघरात देवाच्या समोर ठेवा.

आपली प्रतिक्रिया द्या