साप्ताहिक राशिभविष्य- 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर

3374

>> मानसी इनामदार

मेष – मजेचे दिवस
जुने मित्र भेटतील. त्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला कामात मिळेल. त्यामुळे बऱयाच अवघड गोष्टी सुलभ होतील. आठवडा मजेत जाईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांशी वागताना नम्रपणाने वागा. त्यामुळे त्यांचे सहकार्य मिळवणे सोपे जाईल. पिवळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – ओढणी, घुंगरू.

वृषभ – यशस्वी भव
नव्या कामाची जबाबदारी घ्याल आणि यशस्वीपणे पारही पडेल. हा आठवडा सगळ्याच बाबतीत यश देणारा आहे. विरह काल दूर होऊन प्रेमीजनांच्या भेटीगाठी होतील. हिरवा रंग जवळ बाळगा. पिण्याच्या पाण्यात रोज दोन तुलसी पत्र टाका. शुभ परिधान – जोडवी, डिझायनर घडय़ाळ.

मिथुन – चांगली बातमी
घरातील लहान मुलांकडून शुभ समाचार कानी पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. देवधर्माचे कार्य हातून पार पडेल. घरात भावंडांशी थोडेफार मतभेद होतील. अलिप्तता ठेवा. पांढरा रंग महत्त्वाचा ठरेल.
शुभ परिधान – लिपस्टिक, पाश्चात्य कपडे.

कर्क – देवधर्म कराल
आपल्या मूळ गावी जाण्याचे योग आहेत. तेथे अनेक सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. पण त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकडे दुर्लक्ष नको. कुटुंबासमवेत तीर्थयात्रेवर जाण्याचे योग आहेत. मोतिया रंग नेहमीप्रमाणे शुभ ठरेल.
शुभ परिधान – रेशमी वस्त्र, मोत्याची अंगठी.

सिंह – मेहनतीचे फळ
सुवार्ता कानी पडेल. आधी घेतलेल्या मेहनतीचे फळ आता मिळेल. त्यामुळे मन आनंदी राहील, पण त्याचबरोबर हा आठवडा खूप धावपळीचा असेल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. निळा रंग जवळ बाळगा. चंदन तिलक कपाळी लावा.
शुभ परिधान – पंजाबी ड्रेस, झुमके.

कन्या- बदल महत्त्वाचा
बऱयाच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. जिभेवर नियंत्रण ठेवा. खाणे आणि बोलणे दोन्हींसाठी. आपल्या कामाची जागा शक्य झाल्यास तात्पुरती बदला. सकारात्मक बदल जाणवतील. कोणालाही पैसे उधार देऊ नका. चंदेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – शालू, आभूषण.

तूळ – लक्ष्मी प्रसन्न
जवळच्या व्यक्तीच्या आनंदात सामील व्हाल, उद्योगात थोडी प्रतिकूलता निर्माण होण्याचे संकेत आहेत. सावध पावले उचला. लक्ष्मी पूजन करा. तिला वाहिलेले शेवंतीचे फुल स्वतःजवळ ठेवा. लाल रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – सुगंध, अत्तर.

वृश्चिक – वाहनसौख्य लाभेल
वादविवादांपासून दूर राहा.  वाद सुरू असेल तर तिथून दूर निघून जा. वाहन सौख्य लाभेल. पैशाची देवाणघेवाण करू नका. मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. तांब्याच्या भांडय़ातून पाणी पिण्याचा नेम ठेवा. तांब्याचा रंग लाभदायी.
शुभ परिधान – तांब्याचे कडे, सुती कपडे.

धनु – नवी खरेदी
मनोरंजनाच्या कार्यक्रमांना जाल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. घरात दुरुस्ती काढाल. पैशाचा अपव्यय ताला. त्याऐवजी नव्या वस्तूची खरेदी करा. विद्यार्थ्यांना संधी चालून येतील. त्याचा फायदा घ्या. आकाशी रंग परिधान करा.
शुभ परिधान – पुष्कराज, ब्रेसलेट.

मकर – कामे पूर्ण
कलावंत नव्या कलाकृतीची निर्मिती करतील. त्यातून सर्जनशीलता वाढेल. गणपतीची उपासना करा. कायदेशीर बाबी पूर्ण होतील. वास्तुविषयक रखडलेली कामे पूर्ण होतील. लाल रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – धोतर, झब्बा.

कुंभ – प्रेमाला बहर
परदेशगमनाचा योग आहे. तेथे मानसिक शांतता लाभेल. मनातील विचार प्रकट होऊ द्या. कुढत बसू नका. वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. जोडीदारासाठी भरपूर खरेदी कराल. त्यामुळे प्रेमाला बहार येईल. आमरशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – खादीचा कुर्ता, टाय.

मीन – प्रयत्न सुरू ठेवा
खेळाडूना गुडघेदुखी सतावेल. पथ्य सांभाळा. नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. मन प्रसन्न ठेवा. लहान मुलांत रमाल. गुलबक्षी रंग जवळ बाळगा. हरिपाठाचे अभंग ऐका.
शुभ परिधान – सुगंध, मेकअप.

समस्या – घरातील खर्च कमीच होत नाहीत कमाईचा आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. – रजिता नाईक, अंबरनाथ

तोडगा –रोज रात्री देवासमोर भीमसेनी कापुर लावून व्यंकटेश स्तोत्र म्हणा. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. अवास्तव खर्च टाळा.

 

आपली प्रतिक्रिया द्या