आठवड्याचे भविष्य : 21सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2019

3030

>> मानसी इनामदार

मेष – नवा प्रकल्प

कामाच्या ठिकाणी एखाद्या  महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर येण्याची शक्यता आहे.  देवघरातील लक्ष्मी प्रतिमेचे पूजन करा. लाल रंग शुभ ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

शुभ परिधान – कमरपट्टा, जानवे

वुषभ – प्रतिकुलतेतही अर्थप्राप्ती

नवीन मित्रांपासून सावध राहा. अवास्तव विश्वास ठेवू नका. घरातील ज्येष्ठांचे मत विचारात घ्या. त्यापासून फायदा होईल. जुनी येणी वसूल होतील. केशरी रंग जवळ बाळगा. प्रतिकूलतेतही अर्थप्राप्ती होईल. मन शांत ठेवा. कामाच्या ठिकाणी वादापासून दूर राहा.

शुभ परिधान – रेशमी वस्त्र, चमेलीचा गजरा

मिथुन – नात्यांत गोडवा

एखादे नवीन काम सुरू कराल. यात कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे सर्व संकटांवर मात कराल.  मुलांचा सहयोग अनपेक्षित लाभेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. कोनफळी रंग महत्त्वाचा ठरेल.

शुभ परिधान – शालू, उपरणे

कर्क – नव्या संधी

डोक्याला असलेल्या कटकटीचा अंत होणारा आहे.सुखद सुरुवात अनुभवाल. आयुष्य भरभरून जगावेसे वाटेल. कामाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.  गुलबक्षी रंग  जवळ बाळगा.

शुभ परिधान – चांदीचा अलंकार, काळा धागा

सिंह – आपुलकी, जिव्हाळा

नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे मनःस्थिती छान राहील. अर्थप्राप्तीचे संकेत आहेत. घरातील माणसे तुमची खूप काळजी घेतील. त्यांच्याबरोबर जास्त रहा. हिरवा रंग परिधान करा. कुलदेवतेची उपासना करा.

शुभ परिधान – शेवंतीची फुले, मंगळसूत्र

कन्या – फिरायला चला

घरात चांगले वातावरण राहील. एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देण्याचा योग आहे. त्यामुळे मन आनंदी होईल. अवास्तव खर्चानन लगाम घाला. त्यातून पुढे आर्थिक समस्या उद्भवू शकतील. वेळीच काळजी घ्या. अबोली रंग जवळ ठेवा.

शुभ परिधान – पाश्चिमात्य पोशाख , रुद्राक्ष

तूळ – अडचणींवर मात

काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवण्यात शहाणपणा असतो. आपल्या खासगी गोष्टींबाबत गुप्तता बाळगा. घरात थोडय़ाफार अडचणी उद्भवतील, पण त्यावर सहज मात द्याल.  खंडोबाची  देवघरातील प्रतिमेचे पूजन करा. पिवळा रंग शुभ ठरेल.

शुभ परिधान – नऊवार साडी, नथ

वृश्चिक – शुभ संकेत

सुखाची बरसात होईल. अनेक चांगल्या गोष्टींचे संकेत मिळू लागतील.  विवेकाने काम घ्या. स्वतःवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. विशेषतः कुटुंबीयांवर बोलताना चिडू नका. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आकाशी रंग शुभ ठरेल.

शुभ परिधान – साडी, कुर्ता

धनु – नियोजन करा

घरात तुम्ही अत्यंत लोकप्रिय ठराल.  विशेषतः लहान मुलांत.  त्यांच्यात मन रमेल. जवळच्या एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याळ. पैसे जपून वापरा. कार्यालयीन कामाचे नियोजन करा म्हणजे कामावर ताण येणार नाही. राखाडी रंग जवळ ठेवा.

शुभ परिधान – मनगटी घडय़ाळ, रुमाल

मकर – हुरुप वाढेल

काम वेळेत पूर्ण झाल्याने स्वतःच स्वतःवर खूश व्हाल. नवीन कामाच्या संधी येतील आणि त्या स्वीकारण्यास तुम्हीही उत्सुक असाल. मनाचा हुरूप वाढेल. एक वेगळे चैतन्य जाणवेल. लाल रंग जवळ ठेवा. स्वामी समर्थांची उपासना करा.

शुभ परिधान – खरा दागिना, ठेवणीतील साडी

कुंभ – यशाच्या पायऱया

जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. घरात थोडेफार ताणतणाव उद्भवतील. मुलांच्या प्रगतीच्या बाबतीत काळजी कराल,कामात यश मिळेल. निळा रंग शुभ ठरेल. गणपतीची उपासना करा.

शुभ परिधान – पैठणी, सुगंध

मीन – आवडीचे काम

कामाच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत.  त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. खेळात प्रगती होईल. चंदेरी रंग जवळ बाळगा. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील. मारुतीची उपासना करा.

शुभ परिधान – चंदेरी साडी, हिरा

आपली प्रतिक्रिया द्या