साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 16 ते शनिवार 22 ऑगस्ट 2020

>>  नीलिमा प्रधान 

विचारांना चालना मिळेल

मेष : स्वराशीत मंगळ, मेषेच्या पंचमेशात सूर्य- बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात आल्या तरी त्यावर खंबीरपणे मात करू शकाल. मत व्यक्त करताना घाई करू नका. व्यवसायात नवा विचार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. विचार व कार्याला चालना मिळेल.

शुभ दिनांक : 19, 20

नियमांचे पालन करा

वृषभ : वृषभेच्या व्ययेशात मंगळ, सुखेशात सूर्य- बुध राश्यांतर होत आहे. सर्व सण नियमांचे पालन करूनच साजरे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दडपण येईल. तुमच्या संयमी स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.  कला-साहित्य क्षेत्रात विचारांना प्रेरणा देणारी घटना घडेल.

शुभ दिनांक : 21, 22

व्यवसायात जम बसेल

मिथुन : मिथुनेच्या एकादशात मंगळ, पराकमात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. प्रत्येक कार्यात अग्रेसर राहाल, व्यवसायात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिक उत्तम प्रकारे कार्य करता येईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नोकरीत वर्चस्व वाढेल. चित्रपट, कला, साहित्य क्षेत्रात प्रसिद्धी वाढेल.

शुभ दिनांक : 20, 22

वाद वाढवू नका

कर्क : कर्केच्या दशमेशात मंगळ, धनेशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात नियमांचे पालन  करा. भूमिका संयमी ठेवा. वाद वाढवू नका. भावनांचा अतिरेक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना वेग येईल. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्याने अधिक महत्त्वपूर्ण कार्य करून  दाखवाल.

शुभ दिनांक : 20, 21

लोकप्रियतेत भर पडेल

सिंह : सिंहेच्या भाग्येशात मंगळ, स्वराशीत सूर्य- बुध राश्यांतर तुमच्या कार्याला अधिक तेजस्वी बनवणार आहे. प्रक्षोभक प्रतिक्रिया देऊ नका. व्यवसायात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यातील छुप्या गुणांची ओळख सर्वांना होईल. लोकप्रियतेत भर पडेल असेच कार्य होईल.

शुभ दिनांक : 21, 22

रागाचा समतोल बिघडेल

कन्या : कन्या राशीच्या अष्टमेशात मंगळ, व्ययेशात सूर्य- बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी आल्याने रागाचा समतोल बिघडेल. नकळत चूक होण्याची शक्यता असल्याने उतावळेपणा नको. व्यवसायात तणाव होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या.

शुभ दिनांक : 16,  22

वरिष्ठांची मर्जी सांभाळा

तूळ : तुळेच्या सप्तमेशात मंगळ, एकादशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या कार्याला व्यापक स्वरूप देता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा. भावनेच्या भरात कायद्याचे उल्लंघन करू नका. कला, साहित्य क्षेत्रात नावीन्याचा वापर करा.

शुभ दिनांक : 16, 20

विरोधक अडचणी आणतील

वृश्चिक : वृश्चिकेच्या षष्ठsशात मंगळ, दशमेशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुमचे महत्त्व चौफेर वाढेल. विरोधक तुमच्या कार्यात अडचणी आणतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याबाबत टीकात्मक चर्चा होईल. चित्रपट, कला-साहित्यात नवा परिचय हेईल.

शुभ दिनांक : 21, 22

योजनांना गती मिळेल

धनु : धनुच्या पंचमेशात मंगळ, भाग्येशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रातील समस्या कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडतील. तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल. व्यवसाय व नोकरीत प्रगती होईल. योजनांना गती मिळेल.

शुभ दिनांक : 20, 21

गुंतवणुकीत सावध रहा

मकर : मकरेच्या सुखेशात मंगळ, अष्टमेशात सूर्य- बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात विचार परिवर्तनाची गरज निर्माण होईल. चांगली वाटणारी योजनाही अडचणीत आणू शकते. गुंतवणूक करताना सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वक्तव्य प्रक्षोभक ठरू शकते. कोणताही वाद टोकापर्यंत नेऊ नका.

शुभ दिनांक : 21, 22

ध्येयावर लक्ष केंद्रित करा

कुंभ : कुंभेच्या पराक्रमात मंगळ, सप्तमेशात सूर्य- बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रातील किचकट काम करताना अडचणी निर्माण होतील. व्यवसाय, नोकरीत नवे आव्हान घ्यावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेsत्रात तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. योग्य संधीची वाट पहा. विचारांना चालना देणारी घटना घडेल.

शुभ दिनांक : 16, 20

संयम बाळगण्याची गरज

‘मीन : मीनेच्या धनेशात मंगळ, षष्ठsशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. या आठवडय़ात सहनशीलता, संयम, जिद्द बाळगण्याची गरज. कोणताही वाद वाढू शकतो. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. अहंकाराची भाषा विद्रोह वाढवेल. कोणताही अट्टहास न ठेवता समोरच्याचे मत ऐकून घ्या. वाहन जपून चालवा.

शुभ दिनांक : 21, 22

आपली प्रतिक्रिया द्या