साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 ते शनिवार 19 ऑक्टोबर 2019

3861

>> नीलिमा प्रधान

मेष – रागावर नियंत्रण ठेवा
मेषेच्या सप्तमेषात सूर्य प्रवेश, बुध-शनी लाभयोग होत आहे. रविवारी उतावळेपणा करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. नवीन परिचय उपयुक्त ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिक वेगाने प्रगती होईल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक तणाव कमी होईल. महत्त्वाचा निर्णय घेता येईल.
शुभ दिनांक – 15,19

वृषभ – कामात अडचणी येतील
वृषभेच्या षष्ठेशात सूर्य राश्यांतर, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. ठरविलेल्या कामात अडचणी येतील. व्यवसायात खरेदी-विक्रीत सावध रहा. कामगार समस्या निर्माण करतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जिद्दीने काम करावयाचे आहे. दबाव, तणाव राहिल. महत्त्वाचे काम पूर्ण करताना कष्ट पडतील.
शुभ दिनांक – 13,19

मिथुन – उत्साह वाढेल
मिथुनेच्या पंचमेषात सूर्य राश्यांतर, बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. नोकरी-व्यवसायातील अडचणी कमी होतील. उत्साहवर्धक वातावरण पुटुंबात राहिल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. योजनांच्या पूर्ततेकडे लक्ष द्या. शेअर्समध्ये फायदा होईल. गुंतवणूक वाढेल.
शुभ दिनांक – 14,15

कर्क – योग्य निर्णय घ्याल
कर्कच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. व्यवसायात योग्य निर्णय घेता येईल. मोठे पंत्राट मिळेल. नोकरीत बदल करता येईल. राजकीय क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाता येईल. कामाचे नियोजन कराल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कल्पनाशक्तीला चालना देणारी घटना घडेल. शुभ दिनांक – 13,14

सिंह – प्रवासाचा बेत ठरवाल
सिंह राशीच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. व्यवसायात जम बसेल. कोणताही प्रश्न सोडवता येईल. नोकरीतील तणाव कमी झाल्याने वरिष्ठ खूश होतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. राजकीय क्षेत्रात चौफेर कार्य करता येईल. प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.
शुभ दिनांक – 14,15

कन्या – परदेशी जाण्याची संधी लाभेल
कन्येच्या धनेषात सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. संतापजनक घटना घडेल. प्रवासात सावध रहा. व्यवसायात चांगली वाढ होई&ल. सहकारी चांगली साथ देतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी व आपुलकी मिळेल. कार्य वेगाने पूर्ण करा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. बढती मिळेल. शुभ दिनांक – 13,18

तूळ – शेअर्सचा अंदाज योग्य ठरेल
स्वराशीत सूर्य राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती तुमच्या प्रत्येक कार्याला योग्य दिशा देणारी ठरेल. व्यवसायातील समस्या सुटेल. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी जिंकता येईल. लोकप्रियता, मान-प्रतिष्ठा मिळेल. कार्य वेगाने पूर्ण करा. कलाक्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. शुभ दिनांक – 15,16

वृश्चिक – विचारपूर्वक बोला
वृश्चिकेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. ठरविलेला कार्यक्रम जिद्दीने पूर्ण करावा लागेल. अडचणी येतील. चर्चा करताना बोलणे विचारपूर्वक करा. काम रेंगाळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व जाचक वाटेल. अति विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष पृती करा.
शुभ दिनांक – 13,18

धनु – जबाबदारी स्वीकाराल
धनुच्या एकादशात सूर्य प्रवेश, बुध नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यवसायात वाढ करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योजनांना गती देता येईल. पुटुंबात आपलेपणा मिळेल. मुलांच्या प्रगतीसाठी विचार कराल. शुभ दिनांक – 13, 14

मकर – उन्नतीचा मार्ग लाभेल
मकरेच्या दशमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे उन्नतीचा नवा मार्ग तुम्हाला मिळेल. समस्या कमी होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव दिसेल. मन स्थिर ठेवा. यश मिळेल. घर, वाहन, जमीन घेण्याबाबत निर्णय घ्याल. कलाक्षेत्रात मनाप्रमाणे कामगिरी घडेल.
शुभ दिनांक – 13,14

कुंभ – रेंगाळलेली कामे होतील
रेंगाळलेली व्यवसायातील कामे होतील. मोठे काम मिळाल्याने उत्साह वाढेल. घर-जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नियोजन केल्याप्रमाणे कामे होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी बदल करता येईल. व्यवसाय वृद्धी होईल. शुभ दिनांक – 13,14

मीन – वाद वाढवू नका
मीनेच्या अष्टमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सहकाऱ्यांना प्रेमाने जिंका. नवीन परिचय झालेल्या व्यक्तीशी व्यवहार करतांना काळजी
शुभ दिनांक- 13, 14

आपली प्रतिक्रिया द्या