साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 25 ते शनिवार 31 ऑक्टोबर 2020

>> नीलिमा प्रधान

मेष

ध्येयावर लक्ष केंद्रित करा

सूर्य-बुध युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग तुमच्या कार्याला वेगाने पुढे नेण्यास सहाय्य करेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील रेंगाळत पडलेल्या समस्या सोडवाल. मान, प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. राग वाढवणाऱया घटना घडतील. संयम बाळगा. नोकरीत प्रभाव वाढेल.
शुभ दिनांक – 25, 26

वृषभ

नव्या योजनांना प्रारंभ कराल

सूर्य-चंद्र षडाष्टक योग, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दुसऱयावर आरोप करताना सावध रहा. दसऱयाच्या दिवशी नव्या योजनांना प्रारंभ करता येईल. नोकरीच्या कामात चुका टाळा. कला क्षेत्रात नवे परिचय होतील.
शुभ दिनांक – 25, 26

मिथुन

नव्या कामांची संधी मिळेल

सूर्य-बुध युती, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढवणाऱया कामांची संधी मिळेल. किचकट प्रश्नांवर मार्ग काढाल. व्यवसायात कंत्राट मिळेल. रेंगाळत राहिलेले काम कराल. शिक्षणात यश मिळवाल. कला, साहित्यात नावलौकिक मिळेल.
शुभ दिनांक – 26, 27

कर्क

शेअर्समध्ये फायदा होईल

सूर्य-बुध युती, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पूर्ण कराल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. कला, साहित्य क्षेत्रात नवे परिचय होतील. चुकीच्या वाटेने यश मिळत नाही हे लक्षात असू द्या.
शुभ दिनांक – 28, 29

सिंह

कार्याला नवे वळण येईल

सूर्य-बुध युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग तुमच्या कार्याला नवे वळण देईल. या आठवडय़ात राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक समस्यांचा विचार करावा लागेल. मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल. व्यवसायात जिद्दीने प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा.
शुभ दिनांक – 26, 27

कन्या

रागावर नियंत्रण ठेवा

सूर्य-बुध युती, चंद्र-मंगळ युती होत आहे. या आठवडय़ात ठरवलेली कामे होतील. रागावर नियंत्रण ठेवा. किरकोळ वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या मान, प्रतिष्ठsत वाढ होईल. नोकरीतील समस्या सोडवण्यात यश मिळेल. व्यवसायातील चर्चा संयमाने करा.
शुभ दिनांक – 28, 29

तूळ

वादविवादापासून दूर रहा

सूर्य-बुध युती, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वादविवाद, अरेरावी करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. जवळचे लोक स्पर्धा करतील. व्यवसायात जास्त मोह ठेवू नका. शिक्षण, साहित्यात मागे राहू नका.
शुभ दिनांक – 26, 27

वृश्चिक

प्रकृतीकडे लक्ष द्या

चंद्र-गुरू लाभयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या हातून नकळत चूक होईल. कायद्यात राहून संभाषण करा. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध जाणे त्रासदायक ठरेल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करा.
शुभ दिनांक – 25, 28

धनु

कलाटणी देणारी घटना घडेल

सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. दसऱयाच्या शुभ मुहूर्तावर नव्या कार्याचा आरंभ कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याची उत्तम मांडणी करा. कठीण कामे मार्गी लावा. कुटुंबात सुखद समाचार मिळतील. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. मोठय़ांचे सहकार्य लाभेल.
शुभ दिनांक – 26, 27

मकर

सकारात्मक काळ

सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. तुमच्या कार्याला गती मिळेल. प्रत्येक दिवस आत्मविश्वास देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारपूर्वक योजना बनवा. दौऱयात यश मिळेल. प्रेरणा देणारी घटना घडेल. मुलांचे सहकार्य लाभेल. कला, साहित्य क्षेत्रात प्रगती होईल.
शुभ दिनांक – 25, 28

कुंभ

लोकप्रियता जपा

सूर्य-बुध युती, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. किरकोळ वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा दरारा वाढेल. लोकप्रियता जपा. खर्चावर नियंत्रण ठेवणे अशक्य होईल. नोकरीत तुमच्या कार्याशी तुलना केली जाईल. अनाठायी गुंतवणूक करू नका. कला क्षेत्रात अडचण येईल.
शुभ दिनांक – 28, 29

मीन

संयम बाळगा

सूर्य-चंद्र षडाष्टक योग, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला सहनशीलता, संयम ठेवा. तरच यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देणे जड जाईल. इतरांवर आरोप करताना सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप राहील. वेळेला महत्त्व द्या.
शुभ दिनांक – 25, 28

आपली प्रतिक्रिया द्या