साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 27 ऑक्टोबर ते शनिवार 2 नोव्हेंबर 2019

4904

>>  नीलिमा प्रधान

मेष – व्यवसायात संधी लाभेल

मेषेच्या अष्टमेषात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती होत आहे. व्यवसायात मोठी संधी येईल. फायदा वाढेल. शेअर्समध्ये अंदाज घ्या. नोकरीत तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत परिश्रमांना चांगला प्रतिसाद मिळेल. चर्चा संयमाने करा, पुढे संधी मिळेलच. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत दिग्गज भेटतील. शुभ दिनांक – 28, 29

वृषभ – निर्णयात सावधगिरी बाळगा

वृषभेच्या सप्तमेषात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती तुमच्या व्यवसायातील समस्या सोडवण्यात उपयोगी ठरेल. काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत यश मिळेल. नोकरीत घाईत कोणताही निर्णय वरिष्ठांच्या सल्ला-मसलतीशिवाय घेऊ नका. कायदा पाळा.

शुभ दिनांक – 27, 30

मिथुन – प्रवासात घाई नको

मिथुनेच्या षष्ठेषात शुक्र राश्यांतर, मंगळ-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. व्यवसायात वाद वाढू शकतो. कौटुंबिक वाटाघाटीत तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जवळचेच लोक करतील.  प्रवासात घाई करू नका. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा टिकून राहील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत प्रगती होईल.

शुभ दिनांक – 1, 2

कर्क – महत्त्वाच्या भेटी होतील

कर्केच्या पंचमेषात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, महत्त्वाची गाठ-भेट, चर्चा याच आठवडय़ात करा. व्यवसायात मोठे काम मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाच्या व्यक्तीचा रोष ओढवू शकतो. नोकरीत बदल करताना योग्य विचार करा.

शुभ दिनांक – 27, 30

सिंह – परदेशी जाण्याचा बेत ठरेल

सिंहेच्या सुखेषात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती होत आहे. व्यवसायात अचानक समस्या निर्माण होईल. मानसिक दडपण येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा मिळेल, वाटाघाटीत तुम्हाला तडजोड करण्याची वेळ येईल. कलाक्षेत्रांत पुरस्कार मिळेल. परदेशात जाण्याचे ठरवाल.

शुभ दिनांक – 27, 28

कन्या – कार्याला दिशा मिळेल

कन्या राशीच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कोणतेही कठीण वाटणारे काम याच आठवडय़ात करा. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या कार्याला दिशा मिळेल. घर, जमीन यासंबंधी प्रश्न सोडवा.  शुभ दिनांक – 27, 28

तूळ – लोकप्रियता लाभेल

तुळेच्या धनेषात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती होत आहे. व्यवसायात जम बसेल. शेअर्समध्ये नुकसान भरून निघेल. कार्याला योग्य वळण मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळेल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत उज्ज्वल यश मिळेल.

शुभ दिनांक – 29, 30

वृश्चिक – कामाचा व्याप वाढेल

स्वराशीत शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती होत आहे. व्यवसायात येणारी समस्या कमी होईल. नोकरीमध्ये कामाचा व्याप राहील. राजकीय क्षेत्रात मतप्रदर्शन करताना काळजी घ्यावी. आर्थिक देवघेवीत चौफेर सावध राहा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नवीन व्यक्तींचा परिचय होईल.

शुभ दिनांक – 31, 1

धनु – खरेदी करताना सावध राहा

धनुच्या व्ययेषात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात मोठी अडचण निर्माण होईल.  राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा वाढेल. जवळचे लोक, सहकारी यांची कुरबुर राहील. खरेदी करताना महत्त्वाची वस्तू सांभाळा. नोकरीत वर्चस्व वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रांत मोठी संधी हुकण्याची शक्यता. शुभ दिनांक – 27, 28

मकर – वाटाघाटीत यश मिळेल

मकरेच्या एकादशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू युती होत आहे. याच आठवडय़ात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून व्यवसायातील समस्या सोडवा. प्रश्न रेंगाळत ठेवू नका. नोकरीत जम बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे प्रस्थ वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. मिळालेली प्रत्येक क्षेत्रातील संधी मोलाची ठरेल.

शुभ दिनांक – 27, 28

कुंभ – आत्मविश्वास वाढेल

कुंभेच्या दशमेषात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती होत आहे. व्यवसायाला अधिक योग्य कलाटणी देता येईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा वाढवणारी, आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल. विरोधकांना शह देता येईल. खरेदीच्या विचाराला चालना मिळेल.   शुभ दिनांक – 28, 29

मीन – संयम राखा

मीन राशीच्या भाग्येषात शुक्र राश्यांतर, बुध-शुक्र युती मनावरील ताण हलका करेल. व्यवसायातील चूक सुधारता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत यशाचे कौतुक कमी होईल. वाटाघाटी करताना उणादुणा शब्द जाऊ नये याकडे लक्ष ठेवा. सहनशीलता ठेवा. नोकरीत तटस्थ धोरण ठेवा.

शुभ दिनांक – 30, 1

आपली प्रतिक्रिया द्या