साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 3 ते शनिवार 9 नोव्हेंबर 2019

6000

>> नीलिमा प्रधान

मेष – डावपेच प्रभावी ठरतील

मेषेच्या भाग्येषात मोठा ग्रह गुरू प्रवेश करीत आहे. बुध तुळेत वक्री होत आहे. तुमच्या क्षेत्रातील प्रत्येक समस्येवर तुम्हाला उपाय शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच अत्यंत प्रभावी ठरतील. व्यवसायाला दिशा मिळेल. कुटुंबात तडजोडीचे धोरण ठेवा. आर्थिक सुधारणा होईल.
शुभ दिनांक – 5, 6

वृषभ – जबाबदारी वाढेल

या सप्ताहात वृषभेच्या अष्टमेषात गुरू महाराज 4 नोव्हेंबर रोजी प्रवेश करीत आहेत. धनु राशीत येणारा गुरू तुम्हाला आर्थिक सहाय्य करेल. धंद्यात मोठे काम मिळेल. नोकरीत घाईत निर्णय घेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी वाढेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात धावपळ वाढेल.
शुभ दिनांक – 3, 4

मिथुन – प्रगतीकारक काळ

4 नोव्हेंबर रोजी गुरू महाराज धनु राशीत म्हणजे मिथुनेच्या सप्तमेषात प्रवेश करीत आहेत. व्यवसायात फायदेशीर निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भरधाव वेगाने तुमची प्रगती होईल. उतावळेपणा कुठेही दिसू देऊ नका. डावपेच यशस्वी होतील. नोकरीत बदल करता येईल.
शुभ दिनांक – 6, 7

कर्क – प्रसंगानुरूप निर्णय घ्या

कर्केच्या षष्ठेषात गुरू महाराज प्रवेश करीत आहेत. चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून निर्णय घ्यावा. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वत-चा विचार व चालू परिस्थिती यांचा योग्य मेळ घाला. रागावर ताबा ठेवा. आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल.
शुभ दिनांक – 3, 4

सिंह – नव्या संधीचा लाभ

सिंह राशीच्या पंचमेषात गुरू महाराज प्रवेश करीत आहेत. 4 नोव्हेंबर रोजी सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात मोठे काम मिळेल. जिद्द ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. कलाक्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवी संधी मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल.
शुभ दिनांक – 6, 7

कन्या – दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील

कन्या राशीच्या चतुर्थात गुरू ग्रहाचे राश्यांतर होत आहे. चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. चातुर्याने बोलणे फायदेशीर ठरेल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासाने वागता येईल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवाल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल.
शुभ दिनांक – 3, 4

तूळ – अधिकारप्राप्ती होईल

तुळेच्या पराक्रमात गुरू ग्रहाचे राश्यांतर 4 नोव्हेंबर रोजी होत आहे. बुध तुळेत वक्री होत आहे. व्यवसायात जम बसेल. कर्जाचे काम होईल. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे विचार प्रभावी ठरतील. अधिकारप्राप्ती मिळेल. घर, वाहन खरेदी-विक्री करता येईल. मनाप्रमाणे घटना घडतील.
शुभ दिनांक – 5, 6

वृश्चिक – मनोबल राखा

वृश्चिकेच्या धनेषात गुरू ग्रहाचे राश्यांतर, तुळेत बुध वक्री होत आहे. व्यवसायात काम मिळण्याचे मोठे आश्वासन मिळेल. कुठेही उतावळेपणा दिसू देऊ नका. स्थिर रहा.  राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या हिताचा पूर्ण डाव पडेल असे समजू नका. कुटुंबात महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल.
शुभ दिनांक – 8, 9

धनु – प्रगतीचा टप्पा गाठाल

स्वराशीत 4 नोव्हेंबर रोजी 29.18 वाजता गुरू ग्रह प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. साडेसातीचा कालावधी सुरू आहे. समस्या सोडवता येईल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव पडेल. वेळेला महत्त्व द्या, म्हणजे तुम्ही नक्कीच तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठाल.
शुभ दिनांक – 6, 7

मकर – विचारपूर्वक निर्णय घ्या

गुरू ग्रह 4 नोव्हेंबर रोजी मकरेच्या व्ययेषात प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. व्यवसायात महत्त्वाची फायद्याची घटना घडेल. गुंतवणूक करणारे येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढेल. कुटुंबात सुखद घटना घडेल. क्षेत्र कोणतेही असो, निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ दिनांक – 3, 8

कुंभ – व्यापक स्वरूपाचे काम मिळेल

गुरू ग्रह 4 नोव्हेंबर रोजी उत्तररात्री धनु राशीत प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. गुरुबल उत्तम राहील. व्यवसायात नव्या वाटेने जाता येईल. व्यापक स्वरूपाचे काम मिळेल.  राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठरविलेला विचार पूर्ण होण्याची आशा निर्माण होईल. आत्मविश्वासाने तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल.
शुभ दिनांक – 7, 8

मीन – नमते धोरण ठेवा

धनु राशीत 4 नोव्हेंबर रोजी प्रवेश करणारे गुरू महाराज तुम्हाला लाभदायक फल देतील. तुळेत बुध वक्री होत आहे. सुरुवातीला सर्वच ठिकाणी अडचण येऊ शकते. व्यवसायात नमते धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मत वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नम्रता ठेवा.
शुभ दिनांक – 3, 9

 

आपली प्रतिक्रिया द्या