साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2020

>> नीलिमा प्रधान

मेष – मनोबल टिकवून ठेवा
चंद्र, मंगळ युती, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. मनोबल टिकवून ठेवा, तरच मार्ग निघेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मत वादग्रस्त वाटेल, परंतु लोकप्रियता वाढेल. नोकरीत वरिष्ठांचा सल्ला घ्या. व्यवसायात किरकोळ समस्या येतील. चर्चेने वाद निर्माण होईल. कायद्याचे पालन करा.
शुभ दिनांक – 11, 12

वृषभ – महत्त्वाच्या कामाला प्राधान्य
चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला तणाव होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. चित्रपट, कला-साहित्य क्षेत्रात नवीन परिचय होतील. विचारांना चालना मिळेल. वर्चस्व टिकवता येईल.
शुभ दिनांक – 14, 15

मिथुन – अधिकारप्राप्ती होईल
चंद्र, गुरु त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या सहवासात राहाल. जनहिताच्या कार्यात तत्परता दाखवाल. स्वतःचे स्थान मजबूत करा. कायद्यासंबंधी समस्या सोडवा. नोकरीत प्रभाव वाढेल. कुटुंबात तणाव राहील. अधिकारप्राप्ती होईल.
शुभ दिनांक – 9, 11

कर्क – अतिउत्साह दूर ठेवा
चंद्र, मंगळ युती, बुध, गुरु षडाष्टक योग होत आहे. अतिउत्साह, दादागिरी यामुळे वाद निर्माण होतील. व्यवसायात सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मत विचारात घेतले जाईल. जवळचे लोक टीका करतील. कौटुंबिक वाटाघाटीत नाराजी होऊ शकते.
शुभ दिनांक – 14, 15

सिंह – अतिशयोक्ती नको
चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य नेपच्युन षडाष्टक योग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, अतिशयोक्त बोलणे टाळावे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात क्रोध वाढवणाऱया घटना घडतील. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. व्यवसायात चर्चेत वाद होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची हेळसांड नको.
शुभ दिनांक – 11, 12

कन्या – प्रवासात सावध राहा
चंद्र, मंगळ युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. प्रवासात सावध राहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या मुद्यांना विशेष महत्त्व येईल. नोकरीत किचकट कामात तुमचे बुद्धिचातुर्य चमकेल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल.
शुभ दिनांक – 13, 14

तूळ – नवीन संधीचा लाभ
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, शुक्र युती होत आहे. व्यवसायात संधीचा फायदा घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. लोकांच्या समस्या समजून घ्या. मान, प्रतिष्ठा वाढवणाऱया घटना घडतील. प्रवासात काळजी घ्या. तुम्ही योजलेले कार्य संपन्न करता येईल.
शुभ दिनांक – 11, 15

वृश्चिक – डावपेचांना शह द्या
चंद्र, बुध केंद्रयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. कोणतेही काम करताना अडचणीतून जावे लागेल. व्यवसायातील चर्चा यशस्वी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठत व्यक्तींचा सहवास लाभेल. समोरचे डावपेच वेळीच ओळखा. कुटुंबात तडजोडीचे धोरण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ दिनांक – 12, 13

धनु – जनहिताचे कार्य सुरू ठेवा
चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य प्लुटो षडाष्टक योग होत आहे. आत्मविश्वास वाढेल; परंतु अहंकार दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा कमी पडेल. प्रसिद्धीच्या मागे न लागता जनहिताचे कार्य सुरूच ठेवा. नोकरीत कायद्याच्या चौकटीत राहून काम करा.
शुभ दिनांक – 11, 15

मकर -कायद्याच्या कामात यश
चंद्र, मंगळ युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. तुमच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रयत्न होईल, परंतु जिद्द बाळगा. वाद होईल अशा गोष्टींपासून दूर राहा. कायद्याच्या कामात यश मिळेल.
शुभ दिनांक – 9, 11

कुंभ – कार्यपद्धतीचे कौतुक होईल
सूर्य, नेपच्यून षडाष्टक योग, चंद्र, शुक्र युती होत आहे. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. मात्र टीकाही सहन करावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप अधिक वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक – 11, 15

मीन – पदाधिकार लाभतील
बुध, हर्षल केंद्रयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. रेंगाळलेली कामे वेगाने पूर्ण करा. प्रत्येक दिवस तुमच्या कार्याला गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार लाभतील. नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यवसायात जम बसेल. दिग्गजांचा परिचय होईल.
शुभ दिनांक – 11, 13

आपली प्रतिक्रिया द्या