साप्ताहिक राशिभविष्य- 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2019

5343

>> नीलिमा प्रधान 

मेष – मन अस्थिर होईल

मेषेच्या सप्तमेषात  बुध, शुक्र राश्यांतर तुमच्या कार्याला प्रेरणा देणारे आहे. व्यवसायातील अडचणी कमी होतील. नवीन कंत्राट मिळण्याची शक्यता निर्माण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विसंगती होईल. मन अस्थिर होईल. परिस्थितीचा अंदाज घेणे कठीण होईल. संघर्ष अटळ आहे.
शुभ दिनांक – 4, 5

वृषभ – महत्त्वाची कामे करा
वृषभेच्या षष्ठेशात बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे करून घ्या. वसुली करा. नवे काम लवकर मिळवा. कुटुंबातील समस्या वाढणार नाहीत याकडे लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करू नका. नाटय़-चित्रपट, क्षेत्रांत तत्परता दाखवा.
शुभ दिनांक – 29, 3

मिथुन – लोकप्रियता वाढवा

मिथुनेच्या पंचमेषात बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. व्यवसायात सुधारणा करू शकाल. नोकरासंबंधी प्रश्न सोडवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यापेक्षा कार्यावर भर द्या. लोकप्रियता वाढवा. मार्ग निर्वेध करण्याचा प्रयत्न करा. नवीन परिचयाचा फायदा होऊ शकेल.
शुभ दिनांक – 29, 5

कर्क – सुखद घटना घडतील

कर्केच्या सुखेषात बुध, शुक्र राश्यांतर. नवरात्र उत्सवात तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. प्रेरणादायी घटना व्यवसायात घडेल. नोकरीत नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. लोकसंग्रह वाढतो तो प्रेमाने व सहकार्यानेच, अरेरावी करून नाही. कुटुंबात सुखद घटना घडेल.
शुभ दिनांक – 29, 2

सिंह – वाटाघाटीत यश मिळेल

सिंहेच्या पराक्रमात बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. नवरात्र उत्सवात तुमच्या क्षेत्रात तुम्ही प्रगती कराल. मान प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायात महत्त्वाची कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खंबीरपणे कार्य होईल. वाटाघाटीत यश मिळेल. वरिष्ठ खूश होतील. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल.
शुभ दिनांक – 29, 5

कन्या – नोकरीत बदल होईल

कन्या राशीच्या धनेषात बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करून दाखवाल. कोणताही कठीण प्रश्न सोडवता येईल. संधी मिळेल ती सोडू नका. व्यवसाय, नोकरीत फायदेशीर बदल होईल. मोठे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा प्रश्न सोडवाल.
शुभ दिनांक – 3, 4

तूळ – जबाबदारी वाढेल

स्वराशीत बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. व्यवसायातील अडचणी कमी करता येतील. नवे काम ओळखीतून मिळवता येईल. मतभेद संपवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी वाढेल. सामाजिक कार्यात क्षुल्लक वाद होईल. कोर्ट केसमध्ये अडचण येऊ शकते. कलाक्षेत्रांत स्पर्धा वाढेल.
शुभ दिनांक – 4, 5

वृश्चिक – गैरसमज दूर ठेवा

वृश्चिकेच्या व्ययेषात बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. श्री अंबामातेची आराधना फलदायी ठरेल. अडचणी कमी होतील. व्यवसायात व्यत्यय येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. सहकारी, नेतेमंडळी यांना तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. नाटय़-क्रीडा क्षेत्रांत प्रभाव दिसेल.
शुभ दिनांक – 29, 2

धनु – अडचणी कमी होतील

धनुच्या एकादशात बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. नवरात्रीत चांगली घटना घडेल. दौऱयात वर्चस्व वाढेल. लोकसंग्रह वाढेल. लोकप्रियता मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच टाकताना चर्चा करा. अप्रिय वागणूक मिळू शकते. कुटुंबातील अडचणी कमी होतील. प्रेरणा देणारी घटना घडेल.
शुभ दिनांक – 29, 30

मकर – योजना पूर्ण करा

मकरेच्या दशमेषात बुध, शुक्र राश्यांतर होत आहे. व्यवसायात लवकरच चांगला निर्णय घ्या. समस्या सोडवा. गुंतवणूकदार, भागीदार समोरून येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वास वाढेल. लोकसंग्रह वाढवा. योजना पूर्ण करा. वेळेला महत्त्व द्या. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. कला क्षेत्रांत कामगिरी होईल.
शुभ दिनांक – 29, 30

कुंभ – कामांचा व्याप वाढेल

कुंभेच्या भाग्येषात बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी तणाव संभवतो. सावधपणे कामे करा. नोकरीत कामांचा व्याप वाढेल. क्षुल्लक कारणाने वाद होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्याचा गैर अर्थ घेतला जाईल. प्रतिष्ठsवर टीका होईल. तुमचे मनोधैर्य टिकून राहील.
शुभ दिनांक – 4, 5

मीन – परदेशी जाण्याची संधी

मीनेच्या अष्टमेषात बुध, शुक्राचे राश्यांतर होत आहे. घटस्थापना मनोभावे होईल. मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. व्यवसायात तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना मार्गी लावा.  नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत प्रेरणादायी घटना घडेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक – 29, 2

आपली प्रतिक्रिया द्या