आठवड्याचे भविष्य – रविवार 24 फेब्रुवारी ते शनिवार 2 मार्च 2019

>> नीलिमा प्रधान

मेष – उद्योगात प्रगती होईल
मेषेच्या दशमेषात शुक्र, द्वादशात बुध प्रवेश करीत आहे. मंगळवार, बुधवार इतरांच्या बोलण्याचा त्रास होईल. संताप अनावर होऊ शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्ही दूरदृष्टिकोन ठेवता. प्रतिष्ठा टिकवता येईल. उद्योगधंद्यात प्रगती होईल. नोकरीत वर्चस्व राहील. नावलौकिक होईल. शुभ दि. ः 24,28.

वृषभ – कार्याचा वेग वाढेल
वृषभेच्या भाग्येषात शुक्र, एकादशात बुध प्रवेश करीत आहे. ग्रहांची साथ असली तरी मानसिक संतुलन सांभाळणे गरजेचे असते. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे कार्य वेगाने पुढे नेता येईल. स्वतःच्या विचारांशी स्थिर राहा. कुटुंबातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कुणालाही दुःखवू नका. शुभ दि. 26,27.

मिथुन – ठोस निर्णय घ्या
मिथुनेच्या अष्टमेषात शुक्र, दशमेशात बुधाचे राश्यांतर होत आहे. व्यवसायात चांगला बदल करता येईल. ठोस निर्णय घेऊन स्थिरता आणता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत स्थान अधिक बळकट करू शकाल. मेहनत घेतल्यास तुमचे वर्चस्व नोकरी, उद्योग सर्वच ठिकाणी राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. शुभ दि. 28, 1

कर्क – विचारांना चालना मिळेल
कर्केच्या सप्तमेषात शुक्र, नवमेषात बुधाचे राश्यांतर यामुळे मनावरील एखादे दडपण कमी होण्यास मदत होईल. विचारांना चालना मिळेल. कुटुंबातील नाराजी संपवता येईल. व्यवसायात वेगाने कामे होतील. राजकारणात डावलले जाईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्या. गुप्त कारवायांकडे लक्ष द्या. शुभ दि. 26, 27.

सिंह – प्रतिष्ठा जपा
सिंह राशीच्या षष्टेशात शुक्र, अष्टमेषात बुधाचे राश्यांतर होत आहे. महत्त्वाची कामे याच आठवडय़ात करून घ्या. विचारपूर्वक शब्द द्या. अन्यथा आपसांत गैरसमज होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा फार महत्त्वाची ठरणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. चर्चा करताना सावध राहा. शुभ दि. 24, 28.

कन्या – मनोबल राखा
कन्येच्या पंचमेषात शुक्र, सप्तमेषात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात येणारी अडचण दूर करू शकाल. स्वतःचेच प्रयत्न उपयोगी येतील. प्रतिष्ठत लोकांचे सहकार्य मिळणे कठीण आहे. परिस्थितीचा आढावा घेऊनच महत्त्वाची चर्चा करा. खरेदी करताना सावध राहा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. 26,27.

तूळ – निर्णयात दूरदृष्टी ठेवा
तुळेच्या सुखेषात शुक्र, षष्ठsषात बुध राश्यांतर होत आहे. माणसाला सर्व सुख मिळत असले तरी उपभोगणे शक्य होणेच असे नाही. व्यवहारात बोलण्यातून तणाव होऊ शकतो. दूरदृष्टी ठेवून उद्योग, धंद्यात, नोकरीत निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जबाबदारी वाढेल. तुमच्याशी स्पर्धा करणारे वाढतील. शुभ दि. 27, 28.

वृश्चिक – बदललेल्या धोरणांचा लाभ होईल
वृश्चिकेच्या पराक्रमात शुक्र, पंचमेषात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. धावपळ वाढेल. मोठे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्ही बदललेले धोरण स्वागतार्ह ठरेल. नव्याने स्थान बळकट करण्याची संधी मिळेल. शुभ दि. 28, 1

धनु – योजनांना गती द्या!
धनुच्या धनेषात शुक्र, सुखेषात बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. विचार करून कार्यक्षेत्रात बदल करावयाचा निर्णय घेता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत स्वतःचे मत मांडता येईल. लोकसंग्रह तयार करता येईल. योजनांना गती द्या. उद्योग-व्यवसायात सुधारणा करून प्रगती करा. शुभ दि. 24,25.

मकर – प्रभावीपणे कार्य करा!
मकरेच्या पराक्रमात बुध, स्वराशीत शुक्र प्रवेश करीत आहे. व्यवसायात बदल करण्याची संधी येईल. चौफेर विचार करून त्यासंबंधी करार करून घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचे विचार त्यांना पटवून द्या. प्रतिमा उजळेल अशी योजना तयार करा. परदेशातील व्यवसायात वाढ होईल. नोकरी मिळेल. शुभ दि. 26,27.

कुंभ – प्रयत्नांत सातत्य ठेवा
कुंभेच्या व्ययेषात शुक्र, धनेषात बुध प्रवेश करीत आहे. प्रत्येक दिवस तुमच्या उत्साहाला, आत्मविश्वासाला, यशाला कारणीभूत ठरू शकतो. प्रयत्नांची कास मात्र सोडू नका. कोणताही कठीण प्रश्न सोडवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत दूरदृष्टिकोनातून निर्णय घ्याल. व्यवसायाकडे उन्नतीच्या दिशेने झेप घ्या. शुभ दि. 24, 27

मीन – लोकांचे सहकार्य लाभेल
मीनेच्या एकादशात शुक्र, स्वराशीत बुध प्रवेश करीत आहे. व्यवसायात बदल करताना घाई नको. नवीन संधी येईल.प्रामाणिकपणे कार्यावर लक्ष केंद्रित करा. लोकांचे सहकार्य निश्चितपणे तुम्हाला मिळेल. प्रश्न सुटेल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत तणाव वाढवू नका. कोर्टकेसमध्ये सल्ला घ्या. शुभ दि. 26, 27.

आपली प्रतिक्रिया द्या